Wednesday 29 February 2012

खुदा जाने के......


चित्रपट आणि मानवी स्वभाव यात एक अतूट ऋणानुबंध असतो...आपले आयुष्य .आयुष्यात घडणाऱ्या घटना ,काल्पनिक विश्व प्रत्यक्षात उतरल्याचा आनंद आणि स्वप्नसुंदरी /स्वप्न कुमार याला पाहण्याचे पूर्ण झालेले स्वप्न ! चित्रपट हा मानवी विचारांचा ,जीवनाचा ,कल्पनाविश्वाचा आणि वास्तविकतेचा एक आरसा असतो ...जो आपलेच प्रतिबिंब दाखवत असतो.. आणि समाधान देत असतो... ७० एम एम चा पडदा ,प्रदर्शित व्हायच्या आधी झालेली हवा ,आमी ना "तो " सिनेमा पाहायला जातोय म्हणून केलेला गाजावाजा , गर्दीतून तीकीट हातात पडल्यावर जणू "ऑस्कर " हातात पडलाय असा झालेला आनंद ,स्वप्नातील राजकुमार/राजकुमारी याला प्रत्यक्ष आयुष्यातील कुमार/कुमारी सोबत पाहताना झालेली निराशा ( काय स्वप्ने पाहिलेली अन काय पदरात पडलंय -एक डोळा स्क्रीन वर आणि एक जोडीदारावर .असो पदरात पडलं अन पवित्र झाल असे म्हणून मनाची मनाची घातलेली समजूत ) ,घातलेले पैसे वसूल होतील ना याची काळजी ,आमी सिनेमा पाहायला आलोय म्हंटल्यावर घरी सासू सासरे काय काथ्याकुट करत असतील याची चिंता ...लग्न झाले नसेल तर आपल्या जागेपासून समोरच्या ३-४ रांगात "कोणी आहे का ?"पाहण्यासाठी चाललेली धडपड ...आणि युगुलांचा "कॉर्नर सीट" मिळावी म्हणून चाललेला खटाटोप ....आणि इतका सगळा "ड्रामा " चालू असताना "विकतचा ड्रामा " पाहण्याची उत्सुकता ........पुढचे २-३ तास प्रेक्षकाला हे सगळं विसरायला लाऊन सिनेमाच्या विषयाशी "बांधून " ठेवणे कि कला आहे ....ती ज्याला जमते तोच सगळ्यात यशस्वी दिग्दर्शक असतो....

Tuesday 28 February 2012

श्रीखंडाची गोळी !!

श्रीखंडाची गोळी  !!

डोळे बघू डोळे, आई कोठे आहे आई,दात  बघू दात,भूभू कुठाय भूभू ....भोलानाथ  म्हण भोलानाथ ....शिवाजी महाराज करून दाखव...रामरक्षा म्हण..२ X ४ किती ?...वाचून  दाखव , गाऊन दाखव ,हसून दाखव ,चिडवून दाखव ,इनजेक्शन घे  पासून ,दात पाडून  घे ,पर्यंत काहीही करून   घायचा म्हंटला कि आमिष एकच.. " श्रीखंडाची गोळी"....शहाण्या मुलाने शहाण्या सारख वागाव आणि आगाऊ मुलानेही  शहाणे पणाचा आव आणावा,खुदखुदणार्या ने हसावे आणि भोकाड पसरलेल्या ने खुद खुदावे,शांत बसलेल्याने दंगा करावा आणि कडमडी कार्ट्याने शांत बसावे ,पाहुण्यासमोर मोठ्या सारखे वागावे अन आजी आजोबांनी कोठे गेला होता ?विचरले कि लहान मुलासारखे गबाळ्या सारखे हसावे  हे सर्व साध्य करणारी "श्रीखंडाची गोळी "

Monday 27 February 2012

मराठी" दीन"

हातामध्ये चेतन भगत/ जे.के.रोलिंग असताना....कानात अकोन /मडोना असताना...डोळ्यासमोर स्पीलबर्ग असताना ..मनात अंजेलिना /नताली असताना कानाखाली जेवा "खळ फटाक" आवाज आला तेवा कोठेतरी आठवले कि हातामध्ये केवातरी पुलं/वपू होते...कानात बालगंधर्व होते...डोळ्यासमोर दादासाहेब फाळके होते आणि मनात स्मिता पाटील /दुर्गा खोटे होती....अरे कधीतरी माझी मातृभाषा ..राज्यभाषा हि "मराठी " होती....इंग्रजांनी आणलेले इंग्रजी वारे आपल्या प्रांतात धुमाकूळ घालत आहे अर्थात ज्यांना अवकाशात झेप घायची आहे त्यांना वाऱ्यावर स्वर होणे क्रमप्राप्त आहे पण त्या वाऱ्याच्या प्रभावाने आमच्या लेखकांनी ,कवींनी ,संतानी ,विचारवंतानी कष्टाने बांधलेली ,उत्साहाने वाढवलेली ,प्रेमाने सारवलेली घरे उध्वस्त होत आहेत याचे राहून राहून वाईट वाटते .......

पराभव संघाचा का संघाच्या मानसिकतेचा ?




भारत हा अनेक धर्माने ,धर्मीय लोकांनी आणि परंपरांनी नटलेला देश आहे ..शतकानुशतके त्या परंपरांचे पालन केल्याने एक वैचारिक आणि धार्मिक बैठक समाजातील मोठ्या वर्गाची तयार होते आणि ती येणाऱ्या पिढ्यांमध्ये संक्रमित होत असते...भारतीय परंपरेमध्ये उगवत्या सूर्यास अर्घ्य देण्यास अमूल्य साधारण महत्व आहे ..सूर्याची ,तेजाची ,पराक्रमाची उपासना करणारे लोक तोच सूर्य मावळतीला लागला कि त्याच्याकडे पहायचे  कष्ट  सुद्धा घेत नाहीत चंद्राच्या शीतलते मध्ये रमून जातात ....सूर्यास ना याची तमा असते ना काळजी कारण उद्या सकाळी हेच लोक पळी -ताम्हण घेऊन आपला जयजयकार करणार आहेत याची त्याला खात्री असते !! सध्या भारतीय संघात असेच चालू आहे ... गेली अनेक वर्षे सूर्याप्रमाणे तळपणारी सिनिअर खेळाडूंची कारकीर्द आता उतरणीला लागली आहे ...ज्याप्रमाणे माणूस सूर्य मावळला कि चंद्राच्या चांदण्यात आणि दिव्याच्या उजेडात सर्व महत्वाची कामे उरकून घेऊ अशा मिथ्या मिजासीत वावरत असतो तसेच भारतीय कप्तानाचे आणि निवड समितीचे झालेले आहे ... त्यामुळे होणारे पराभव हे संघाचे आहेत का संघाच्या पराभूत मानसिकतेचे आहेत यावर विचार निश्चितपणे केला पाहिजे....

Sunday 26 February 2012

"शिवशाही आणि लोकशाही "


"त्या अनोळखी प्रदेशात केव्हातरी
घनदाट अरण्याने वेढलेल्या किल्ल्यांच्या परिसरात
हिंडताना मानवेंद्र शिवाजी राजा ...
तुझ्या मनात विचार चमकला असेल
शतखंड झालेल्या भारताच्या या तुकड्यांना मी भरून टाकेन
श्रींचे राज्य उभारेन..........