Saturday 23 June 2012

मोघल दीदी ....



हिंदुस्तानावर मोघलांनी अनेक शतके राज्य केले ....मोघालांचे क्रौर्य ,द्वेषाचे राजकारण ,धर्मांधता ,मूर्ती भंजनक वृत्ती ,पाशवी प्रवृत्ती आणि रणांगणावर तळपणारी शमशेर या सर्वात "चिकाच्या पडद्याला " अनन्य साधारण महत्व होते ....समोर जरी आलमगीर ,जहापना, बादशाह बसलेला असायचा तरी त्याचे बहुतांश निर्णय आणि आखणी हि चिकाच्या पडद्या आडून व्हायची .... अगदी महसुलापासून ते युद्धापर्यंत सर्व निर्णय या चिकाच्या पडद्या आडून व्हायचे ...त्यास नकार देण्याची कोणाचीही प्राज्ञा /वकूब नसायचा ....या पडद्या आड एक आक्रस्ताळी ,आत्मकेंद्री ,स्वार्थी ,शीघ्रकोपी ,उन्मत्त ,घमेंडी ,हलक्या कानाची ,पोकळ बुद्धीची ,कावेबाज ,जबरदस्त उपद्रवमूल्य असलेली बेगम बसून सर्व साम्राज्य आपल्या नजरेच्या आणि इशाऱ्याच्या धाकावर चालवायची ... कालांतराने मोघल गेले ....इंग्रज आले .... इंग्रज गेले ....काळे इंग्रज आले .... लोकशाही कि काय नवीन शाही उदयास आली ... इंदिरा गांधी यांनी लोकशाहीत मोघल तत्वे जपायचा मनापासून प्रयत्न केला ....परंतु त्यांचे दुर्दैवी देहावसान झाल्याने लोकशाहीत मोघली तत्वे असणारी जागा रिकामीच राहिली ...ती आता भरून निघाली असे वाटत आहे ... देल्ही आणि रायटर्स बिल्डींग यामध्ये पुन्हा चिकाचा पडदा बांधला आहे कि काय आणि १०० वर्षानंतर देशाची राजधानी पुन्हा कोलकाता कडे सरकत आहे कि काय असा प्रश्न सर्वांनाच पडू लागलेला आहे ... फ़क़्त काळानुसार फरक इतकाच पडला आहे कि आता चिकाचा पडदा गळून पडला आहे ..आणि हि बाई आपला आक्रस्ताळीपणा, घमेंडी स्वभाव , अल्पमती ,स्वल्प ज्ञान , स्वार्थी राजकारण याचे प्रत्यंतर सर्वांपुढे कशाची खंत न वाटता देत आहे ...आणि आपला अहं सुखाऊन घेत आहे ...

Sunday 17 June 2012

बाप ....

शाळेपासून बापाच्या धाकात तो राहात असतो 
कमी मार्क पडलेलं प्रगतीपुस्तक तो लपवत असतो 
आईच्या पाठी लपून बापाशी तो बोलत असतो 
बापाचा डोळा चुकवून हुंदडायला तो जात असतो 

शाळा संपते पाटी फुटते नवे जग मग समोर येत 
कोलेज नावाच्या भूल भूलैयात मन हरखून जात असत 
हाती आलेले मार्क घेऊन पायऱ्या झीझवत फिरत असत 
बाप पाहतो स्वप्न नवी हे मुखडा शोधत असत 

Friday 15 June 2012

"ती" ....




आज वातावरण थोडेसे ढगाळच होते ....पाऊस येणार असे वाटत होते कारण सोसाट्याचा वारा सोबत काही वाळलेली पाने घेऊन पिंगा घालत होता ,मधूनच थोडेसे अंधारून येत होते काही क्षणातच त्या काळ्याकुट्ट ढगांच्या आड लपलेला सुर्यनारायण आपले अस्तित्व दाखवत होता ... मधूनच एखादा म्हातारा डोक्यावर मुडपलेला पंजा ठेऊन पावसाचा अंदाज घेत होता ...झाले असतील संध्याकाळचे ५-६ ...अचानक अंधारून आल्याने सूर्यास आपले अस्तित्व लपवावे कागले , विजांच्या कडकडाटाने म्हाताऱ्याने मुडपलेला पंजा कानावर ठेवला ...वाराही आता पानांची संग सोडून कधी मोगऱ्याच्या तर कधी जुईच्या झाडाशी सलगी करू लागला ...झाडही हरखून आनंदाने डोलू लागले आणि संगतीची आठवण म्हणून कि काय आपल्या फुलांचा मंद सुवास वाऱ्यास भेट देऊ लागले ...आणखी एक जोरात वीज कडाडली आणि ढगातून काही थेंब जमिनीवर कोसळू लागले ...तप्त झालेल्या मातीवर पावसाचे थेंब पडल्यावर येणारा टीप टीप आवाज ...मातकट गंध सोबतीस मोगऱ्याचा सुगंध ...झाडाशी -पानाशी खेळून मातीत मिसळायला आतुर झालेले अवखळ पाण्याचे थेंब ...कुठल्याश्या झाडाच्या आश्रयाला आलेलेली गाय  आणि धावपळ करणारी माणसे अश्या धुंध वातावरणात तो शांतपणे आपल्या घराच्या ग्यालारी मध्ये बसून कॉफी च्या घुटक्याचा आस्वाद घेत निसर्गसौन्दर्य पाहत होता ...वातावरणास साजेशी गाणी आई.पॉड वर सुरूच होती ...आणि अचानक ते गाणे लागले ...भरत आलेल्या जखमा पुन्हा ताज्या झाल्या ...त्या दिवशीचा पाऊस पुन्हा आठवू लागला आणि डोळ्यासमोर उभी राहिली ...."ती ".....

Friday 1 June 2012

जिंकूनही हरलेला बाजीगर !




कष्टास नशिबाची साथ लाभल्याने काही सामान्य माणसे असामान्य कर्तुत्व घडवून जनमानसावर आपल्या कार्याचा ठसा उमटवतात ..त्यांचे त्यांच्या क्षेत्रातील यश इतके स्पृहणीय असते कि काही काळानंतर ती व्यक्ती म्हणजे ते क्षेत्र अशी ओळख निर्माण होते आणि तेव्हाच "अनभिषिक्त " हे बिरूद नावामागे लागून कार्याचा सन्मान होतो ...असे त्या क्षेत्राचे "अनभिषिक्त बादशहा " पद आणखी काही बादशहा सह वाटून घेत असताना डोक्यात कली शिरतो आणि सुरु होते ते कटाचे ,सुडाचे ,राजकारण व अस्तित्वाचे युद्ध !! राजा कितीही सामर्थ्यवान असला त्याचा प्रभाव कितीही जोरदार असला तरी सजग नागरिकास आणि सारासार विवेकबुद्धी जागृत असलेल्या मानसिकतेस शालीन ,कुलीन ,सभ्य ,नैतिक ,विचारी आणि बुद्धीप्रमाण्यास झुकते माप देणारे नेतृत्व हवे असते ...असे गुण नसलेला राजा युध्द जिंकूनही अंती पराभूत होतो कारण मान,सन्मान ,आदर आणि प्रतिष्ठा हि जिंकून /विकत घेता येत नाही तर ती सार्वजनिक जीवनातील वागण्यातून मिळत असते  ..सत्तेचे सिंहासन  हे सामन्यांच्या अपेक्षांनी बनलेले असते आणि सामन्यांच्या अपेक्षाभंग करून त्यावर बसणाऱ्या बादशहास  भौगोलिक  भूमीच प्राप्त होते बाकी काही नाही ....असाच विजयी पराभूत बादशाह म्हणजे शाहरुख खान !! हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये अगदी काल परवा पर्यंत "बादशाह " म्हणून फिरणाऱ्या आणि मिरवणाऱ्या शाहरुख खान याने उन्मत्त होऊन सामान्य नागरिकांनी मोठ्या प्रेमाने ,विश्वासाने ,अपेक्षेने दिलेले सिंहासन एकाच लत्ताप्रहाराने मोडून टाकले आणि जिंकूनही हरलेला बाजीगर ठरला !!