Friday 27 July 2012

अनुभवलेला कारगिल विजय दिवस

२६/०७/२०१२ वेळ दुपारी २.४५ ..पुण्याची प्रचंड गर्दी , गर्दीच्या मानाने नेहमीच  छोटे वाटणारे रस्ते ....मुंगी सुद्धा ओवर टेक करून जाईल इतक्या संथ गतीने पुढे सरकणारी वाहतूक ...अभ्राच्छादित आकाश आणि किरणांचा चालू असणारा खेळ ...मधूनच अंगावर पडणारा एखादा नटखट पावसाचा थेंब आणि दुरून कोठूनतरी येणारा चहा चा वास आणि शेजारून जाणाऱ्या...असो .... हे सर्व सृष्टीसौंदर्य उपभोगत असताना " ए टरका आहेस का ? पुढे बघ ...." असे ऐकवूनच पुढे जाणारा पुणेकर..  जायला  वेळ होणार हे निश्चित झाल्यावर वेळ पाहणे सोडून दिले तेव्हा कोठे पुण्याची वाहतूक आणि माणसे मला "आपलीशी " वाटू लागली   ...या सर्व नैसर्गिक आणि मानव निर्मित घडामोडींचा आस्वाद घेत "स्वरूप वर्धिनी स्पर्धा परीक्षा केंद्राकडे " मी हळू हळू सरकत होतो ... औचित्य होते " कारगिल विजय दिवस साजरा "करायचे ...प्रत्यक्ष युद्धात सहभागी झालेल्या व्यक्तींकडून त्यांचे अनुभव ऐकायचे ... ३ च्या कार्यक्रमास मी भारतीय वेळेनुसार ३.३० ला पोहोचलो तेव्हा वक्त्याच्या मागे असणारा कारगिल विजय दिवसाचा फोटो ,तिरंग्याने व्यापलेल्या भित्ती , असंख्य तरुणांच्या अस्तित्वाने सुशोभित झालेल्या खुर्चा ,वातावरणास साजेशी शांतता , वक्त्याची बोलायची पद्धत ,आणि त्यास मिळत असलेला दिलखुलास प्रतिसाद पाहून मन भारावून गेले ... बसायला जागा न्हवती परंतु गळ्यातील ओळखपत्र हातातील नोट पॅड -पेन पाहून तेथील कार्यकर्ता आदबीने हातास धरून पुढे घेऊन गेला आणि स्थानापन्न झालेल्या दुसऱ्या कार्यकर्त्यास म्हणाला " अरे पत्रकारांना जागा दे " हा आदर ( प्रथमच ) अनुभवताना अगदी "गदगदून " आले ....पण मनातील भावनेची जागा former chief  military intelligence शेकटकर यांच्या शब्दांनी घेतली आणि अश्रूच ते काय ओघळायचे राहून गेले .....

Monday 23 July 2012

I HAVE A DREAM - Martin Luther King Jr.

I am happy to join with you today in what will go down in history as the greatest demonstration for freedom in the history of our nation.
Five score years ago, a great American, in whose symbolic shadow we stand today, signed the Emancipation Proclamation. This momentous decree came as a great beacon light of hope to millions of Negro slaves who had been seared in the flames of withering injustice. It came as a joyous daybreak to end the long night of their captivity.

Sunday 22 July 2012

ठाकरे बंधू आणि राजकारण ...


दिनांक १७/०७/२०१२ .... वेळ ..मध्यान्यापासून पुढे .... वाजणाऱ्या 2 गोष्टी ... मोबाईल आणि न्यूज चेनेल... फेसबुक वर पोस्ट करणारे असंख्य हात ... " भडक मथळ्यानि सजवलेले सहचीत्र " अनेक विचार ... तयार झालेले अनेक आजचे सवाल ... आणि हे नाट्य सुरुवातीस उत्साहाने आणि नंतर बळजबरीने ( कारण अशी तगडी "कास्ट" असताना प्रसारमाध्यमांना इतर काही " टेली कास्ट " करायचे भानच नवते ) पाहत असलेला मी ... १७-२१ हाच प्रकार रोज चालू आहे ...पवार साहेबांनी वार केल्याने आणि माध्यमांचे लक्ष मुंबईतून दिल्ली कडे सरकल्याने मराठी माणूससुद्धा आपल्या विचारांची लोकल काही काळ थांबवून " राजधानी /झेलम " मधून नवीन काय येतय याची वाट पाहू लागला ... आणि फोकस " ठाकरे घराण्याच्या " इतिहासावरून " पवारांच्या नव्या राजकीय खेळीकडे " वळाल्याने /वळवल्याने माझा "अहं " थोडा सुखावला ...१७ /०७/२०१२ पासून बाळासाहेब -राज -उद्धव यांचेवर आधारित बातम्यांचा प्रसारमाध्यामानी नेहमीच्या सवयीने इतका भडीमार केला की एरवी मी मराठी आहे हे हिंदी /इंग्रजीतून सांगणारा मराठी माणूस अचानक जागा झाला आणि एकमुखाने बोलू लागला ..... " आता एकत्र या ..." अनेकांना उद्धवाच्या रथाचे सारथ्य करणाऱ्या राज मध्ये कृष्ण दिसू लागला , उद्धवाच्या डोळ्यात राज विषयी अचानक भरताचे प्रेम दिसू लागले .... राज यांनी "मातोश्रीवर " कॉफी घेतली याची ब्रेकिंग न्यूज झाली ...सेना -मनसे- भाजप यांच्यातील आमदार -खासदार आता यांनी एकत्र यावे असे उघडपणे बोलू लागले ..... कॉंग्रेस -राष्ट्रवादी यांना हॉस्पिटल मध्ये दाखल केल्याचे व्यंग चित्र वेगाने "शेअर " होऊ लागले ... टपरी पासून फेरारी पर्यंत यावर रोखठोक मत व्यक्त होऊ लागले ...आणि उभा महाराष्ट्र पुन्हा एक स्वप्न पाहू लागला ...

Saturday 14 July 2012

राष्ट्रपती निवडणूक ....सब घोडे सब घोडे बारा टक्के!



                 राजकारण आणि क्रिकेट या दोन्ही प्रकारात टायमिंग ला अनन्यसाधारण महत्व असते ...खेळाडू कितीही मातब्बर असला आणि त्याचे टायमिंग "अचूक " नसेल तर त्याचे कौशल्य असून नसल्यासारखे असते ...त्यातल्यात्यात काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधित्व करताना तर टायमिंग या कौशल्यास अधिकच मोल येते ..कारण नेते जे 
सार्वजनिक  रित्या बोलतील त्याच्या बरोबर विरुद्ध वागून त्याच्या महत्वकांक्षेचे पंख कापायची पक्षाची परंपराच आहे ..हे सर्व जाणून ज्यावेळी राष्ट्रपती निवडणुकीचा विषय "बोर्डावर " आलाही न्हवता अशा वेळी "मला मोघल गार्डन च्या हिरवळीवर चालायला आवडेल " अशा आशयाचे विधान करून आपल्या मनातील महत्वकांक्षा उघड केली होती ...प्रणव यांच्या महत्वकांक्षेचे पंख कापणे कॉंग्रेस ला परवडण्या सारखे न्हवते कारण मनमोहन जरी पंतप्रधान  असले तरी चिदंबरम यांच्याशी पंगा घेत कॉंग्रेस समोरचे सर्व प्रश्न प्रामाणिकपणाने सोडवत "संकटमोचक " अशी आपली ठाम भूमिका निर्माण करण्यात प्रणव मुखर्जी यांनी यश मिळवले होते ... त्या पाठोपाठ आपण या पुढची लोकसभा निवडणूक लढवणार नसून या टर्म नंतर राजकीय सन्यास घेणार असल्याचे जाहीर करून कॉंग्रेस नेतृत्वाला आपल्या महत्वाकांक्षेची दखल घ्यायला भाग पडले .. कॉंग्रेस पक्षानेही त्यांच्या साडेचार दशकाच्या कारकिर्दीची "जाण" ठेऊन त्यांची उमेदवारी निश्चित केली आणि सुरु झाले लोकशाहीस काळिमा फासणाऱ्या घटनांचे सत्र ....