Saturday 22 June 2013

पुरातही मी कोरडा !!

भीती पुराची वाटत नाही 
पूर ओसरायची वाटते 
पोरं उराशी कवटाळून 
मेलेल्या प्रेतांना बघायची वाटते !! 

धडधड काळे आकाश बघून वाढत नाही 
आकाशात घिरट्या घालणाऱ्या हेलीकॉपटरला बघून वाढते 
पुराचेही जन्मभर पुरेल असे राजकारण करणाऱ्या 
राजकारण्यांना बघून वाढते !!

Saturday 8 June 2013

गिव मी सम सनशाईन .....

" Life is race if you don't run fast , you will be like broken anda "  असे म्हणत अनेक विरु सहस्रबुद्धे १० वी , १२वी  मध्ये कमी गुण मिळालेल्या राजू रस्तोगी , फरहान वर बरसत असतील . पाऊस बरसायच्या काळात आपला बाप का बरसतोय ? कसेबसे गणित सोडवले . . आता आई आपला bank balance किती त्यातील आधीचे कर्ज , मोठ्या -भाऊ बहिण यांचे लग्न , तुझ्या शिक्षणाचा वाढीव खर्च करून आमच्या म्हातारपणात आमच्या हाती काय असा ' ड ' गटातला प्रश्न घालून का घाबरवते ?? निकाल लागल्यापासून आई -बाबा म्हणतात ' नाक कापलं कार्ट्यान "  त्यांचे नाक तर जागेवरच आहे मग ते अस का म्हणतात ? ताई पण माझ्याशी नीट बोलत नाही . . कारण काय म्हणे मी तिचा अपेक्षाभंग केला . . माझ्या आवडीच्या अ ब क कॉलेज मध्ये मला जायचय . . काका म्हणाला तुझी लायकी नाही . बाबा म्हणाले डोनेशन भरायची माझी लायकी नाही . काय चुकलो मी ? ८५ % गुण कमी आहेत का ? सगळ्यांना माझ्यामुळे त्रास होतो . . मी इतरासारखा माझ्या घराला आनंद देऊ शकत नाही . . मीच नालायक आहे . . काय करू मी ??