''एक माणूस होता. तरुणाईत त्यानं ठरविलं की, आपण पूर्ण विश्वामध्ये बदल घडवायला पाहिजेत. तरुणाईचा उत्साह आणि आत्मविश्वासामुळेच त्याला वाटलं की, आपण हे शिवधनुष्य पेलू शकू. दिवस सरले. तो गृहस्थ रानात शिरला. तेव्हा वाटलं विश्वाच्या बाबतीत हे करणं अवघड आहे, पण देशामध्ये मात्र नक्कीच काही तरी आमूलाग्र बदल करता येऊ शकतो. तो कामाला लागला. पन्नाशीत जाणवलं की, अवघड आहे, राज्यावर फोकस करावं, देश फार मोठा आहे. मग साठीमध्ये कळलं की, राज्यातही काही करू शकलो नाही. मग जिल्हा स्तरावर काही करावं असं त्यानं ठरवलं. सत्तरीमध्ये लक्षात आलं की, काही झालेलं नाही. आता सत्तरीत होता तो. गात्रं गलित झाली. मग लक्षात आलं की, आपण गावामध्येच काही केलं असतं तर बरं झालं असतं, काही तरी व्यवस्थित बदल करू शकलो असतो. तसंच काही प्रशासनाचं आहे. '' अनेक वर्षांचा संचित कचरा एकाच खेपेत साफ करण्याचा झाडू उचललेले अरविंद केजरीवाल यांची सुरुवात जरी दणक्यात झाली असली तरी यापुढचा त्यांचा मार्ग 'आम' राजकीय पक्षासारखा असणार आहे . . .
सुलभा : पुरुषा राजन सततं प्रियवादिन :! अप्रियस्य तु पथ्यस्य वक्ता श्रोता च दुर्लभ:!!
Saturday, 1 February 2014
Sunday, 15 December 2013
लक्षात राहिलेला . . लक्ष्या !!
आयुष्यातल्या जिंदगीत कधी महेश कोठारे यांच्याशी 'ग्रेट भेट ' झाली तर त्यांना एक प्रश्न विचारणार आहे . महेश सर तुम्हाला कधी 'महेश महेश ' अशी हाक मारून बोलावतंय असा भास होतो का हो ?? याचे उत्तर कदाचित होयच असेल . . . याच 'महेश ' ने अन नेहमी अडचणीत सापडणाऱ्या लक्षाने आम्हाला हसायला शिकवले . . आज लक्षाचा स्मृतीदिवस . . अगदी विस्मृतीत गेलेला . 'अरे यार ,आज लक्षा असता तर . . . ' असे म्हणत अनेक कट्टे भावनांनी अन आठवणीनी ओलसर केले . त्याचेच संवाद कसेबसे त्याच्याच स्टाइलने फेकायचे केविलवाणे प्रयत्न करत हास्याचे कारंजे उडवले . तो बनवाबनवी करत असताना स्वतःला बनवून घेतले . तात्या विंचू म्हणजेच तो गोष्टीतला बागुलबुवा समजून लहान वयात माहित असलेल्या सगळ्या देवांचे स्मरण केले . . पण तो आपल्यातून कधी गेला हा दिवस मात्र सपशेल विसरलो . . हा दिवस रंगभूमीला अन चित्रपटसृष्टीला आठवणीत असेल पण प्रेक्षकांना आठवण करून दिली तरी पटणार नाही . . कारण लक्षा गेलाय हे कोणाला पटणारच नाही . . तो इथेच कुठेतरी आहे . . जवळपास . . अजूनही हसवतोय . . चौकोनी चेहेरे हलवतोय . . चेहेऱ्यावर रंग लाऊन आयुष्याचे रंग बदलतोय . . तो जाणे शक्यच नाही . . याच 'भावनेला अन भासाला ' आज ९ वर्षे पूर्ण झाली . . .
Saturday, 14 December 2013
भय इथले संपत नाही
Now, should we treat women as independent agents, responsible for themselves? Of course. But being responsible has nothing to do with being raped. Women don’t get raped because they were drinking or took drugs. Women do not get raped because they weren’t careful enough. Women get raped because someone raped them.
― Jessica Valenti
काही घटना या केवळ घटना नसतात . तर त्या जखमा असतात . एखाद्या व्यक्तीच्या शरीरावर अन संपूर्ण समाजाच्या मानसिकतेवर , दांभिकतेवर , नैतिकतेवर अन मुल्यांवर पडलेल्या . . . जखमा !! कालांतराने या जखमांचीही प्रतीके होतात , अस्मिता जन्माला येतात , भगभगणाऱ्या वेदना अन ठसठसणाऱ्या संवेदना शांत होतात . . व्यक्ती सावरते . . समाज विसरतो . . पण या जखमांची सुद्धा एक वेगळीच वेदना असते . . ज्या दिवशी त्या घडल्या त्याच दिवशी लोकांना अचानक स्मरण होते . . " अरे बरोबर अमुक वर्षापूर्वी तमुक घडले होते '' पुनश्च आठवणी ताज्या होतात . 'त्या ' दिवसापासून ते 'या ' दिवसापर्यंत काय घडले याचा वार्षिक आढावा घेण्यात येतो . इतर देशांपेक्षा भारत किती उदासीन आहे याबाबत चूकचूक पचपच होते . कालांतराने तीही नाहीशी होते . . हे असेच अनेक वर्षे सुरु आहे . . अव्याहत . . मग ती फाळणी असो , भारत -पाकिस्तान भारत -चीन युद्धे असो , बाबरी मशीद असो , कारगिल युद्ध असो , संसद भवन हल्ला असो , २६ /११ चा दहशतवादी हल्ला असो वा . . . १६ डिसेंबर २०१२ असो . . . घटना घडल्यावर नजीकच्या भविष्य काळा बद्दल प्रत्येक भयभीत होतो . . कालांतराने आश्वस्त किंवा निर्भय होतो . . पण . . ' भय इथले संपत नाही ' . . येणारा प्रत्येक 'उद्या ' एका नवीन प्रश्नाला जन्म देतो . . नव्या जखमांसह समाजाला रुजा देतो , माणसातले माणूसपण खच्ची करतो अन समस्त मानवजातीला प्रश्न विचारतो . . 'मानसा मानसा कधी होशील रे माणूस ?''
― Jessica Valenti
काही घटना या केवळ घटना नसतात . तर त्या जखमा असतात . एखाद्या व्यक्तीच्या शरीरावर अन संपूर्ण समाजाच्या मानसिकतेवर , दांभिकतेवर , नैतिकतेवर अन मुल्यांवर पडलेल्या . . . जखमा !! कालांतराने या जखमांचीही प्रतीके होतात , अस्मिता जन्माला येतात , भगभगणाऱ्या वेदना अन ठसठसणाऱ्या संवेदना शांत होतात . . व्यक्ती सावरते . . समाज विसरतो . . पण या जखमांची सुद्धा एक वेगळीच वेदना असते . . ज्या दिवशी त्या घडल्या त्याच दिवशी लोकांना अचानक स्मरण होते . . " अरे बरोबर अमुक वर्षापूर्वी तमुक घडले होते '' पुनश्च आठवणी ताज्या होतात . 'त्या ' दिवसापासून ते 'या ' दिवसापर्यंत काय घडले याचा वार्षिक आढावा घेण्यात येतो . इतर देशांपेक्षा भारत किती उदासीन आहे याबाबत चूकचूक पचपच होते . कालांतराने तीही नाहीशी होते . . हे असेच अनेक वर्षे सुरु आहे . . अव्याहत . . मग ती फाळणी असो , भारत -पाकिस्तान भारत -चीन युद्धे असो , बाबरी मशीद असो , कारगिल युद्ध असो , संसद भवन हल्ला असो , २६ /११ चा दहशतवादी हल्ला असो वा . . . १६ डिसेंबर २०१२ असो . . . घटना घडल्यावर नजीकच्या भविष्य काळा बद्दल प्रत्येक भयभीत होतो . . कालांतराने आश्वस्त किंवा निर्भय होतो . . पण . . ' भय इथले संपत नाही ' . . येणारा प्रत्येक 'उद्या ' एका नवीन प्रश्नाला जन्म देतो . . नव्या जखमांसह समाजाला रुजा देतो , माणसातले माणूसपण खच्ची करतो अन समस्त मानवजातीला प्रश्न विचारतो . . 'मानसा मानसा कधी होशील रे माणूस ?''
Wednesday, 4 December 2013
टाटा नॅनो ' प्रॉमिस इज प्रॉमिस '
कर्जाच्या गराड्यात अन हप्त्याच्या विळख्यात
माणसानं स्वप्न तरी कस बघाव ?
चार जणांच्या पोटाची जबाबदारी असलेल्यानं
संसाराच्या गाड्याला गाडीच चाक कसं जोडाव ?
माणसानं स्वप्न तरी कस बघाव ?
चार जणांच्या पोटाची जबाबदारी असलेल्यानं
संसाराच्या गाड्याला गाडीच चाक कसं जोडाव ?
''आज छोटी म्हणाली , बाबा उद्यापासून तुम्ही मला शाळेत सोडायला येऊ नका . तीला कमीपणा वाटतो . माझा अन आपल्या स्कूटरचा . . तिच्या मैत्रिणी गाडीतून येतात . चिडवतात तीला . एक 'साधी ' गाडी नाही म्हणून . साध्या माणसाकडे कशी असणार ग गाडी ?? दूरच्या शाळेत जाताना माझी पोरगी माझ्यापासून दूर जात आहे . . . '' भावनांनी ओलावलेल्या रात्रीला आश्रुनी चिंब करणारे शब्द प्रत्येकाने ऐकले , अनुभवले असतील . कधी स्वतःच्या घरात तर कधी शेजाऱ्याच्या . . कधी ट्रेन मध्ये शेजाऱ्या कडून तर कधी ऑफिस मधल्या सहकाऱ्या कडून . शब्दांची पेरण वेगळी असली तरी वास्तवाची दाहकता सारखीच असते . आपण 'गाडी ' घेऊ शकत नाही याचे दुक्खच वेगळे असते . अनेक प्रौढ सायकलच्या दांडीवर किंवा पेट्रोलच्या टाकीवर बसलेल्या पोरासोबत लहान होतात . समोरून चाललेल्या चकचकीत गाडीकडे हरखून बघतात . पोराची आणि पोरसवदा मनाची समजूत घालत रस्ता संपवू बघतात . अशी अनेक कुटुंबे , अनेक कुटुंब प्रमुख आहेत ज्यांना पद्मिनीच्या जमान्यापासून गाडी घ्यायची असते पण जमाना गेला तरी त्यांचे स्वप्न 'अबाधित ' असते . कधी बस मध्ये लोंबकळत , ट्रेन मध्ये लटकत , टमटम मध्ये कोंबत , टेक्सी मध्ये गुदमरत रोजचा प्रवास करत करत असतात . जीवासाठी . . जीव धोक्यात घालून . अशा अनेक लोंबकाळलेल्या , लटकलेल्या , कोंबलेल्या , गुदमरलेल्या आणि घुसमटलेल्या जीवांकडे लक्ष कोण देणार ? आताच्या 'संस्कृतीत ' काच बंद केली किंवा दरवाजा जोरात आपटला की सगळे प्रश्न 'आपल्यापुरते ' संपतात . . या संकुचित जगात असा एकतरी जीव असतो जो इतरांची घुसमट समजू शकतो . त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी झटणारा असतो . निराशेला आशेत आणि नाही रे ला आहे रे मध्ये बदलण्याची क्षमता राखून असतो . . गरज असते योग्य 'वेळ ' येण्याची .
Saturday, 30 November 2013
तरुणांचा आदर्श कोण ??
वलयांकित क्षेत्र हे बहुदा कलंकीत 'च ' असते असे सर्वसामन्यांचे ठाम मत असते . त्यामुळे अशा क्षेत्रात आपली मुले -मुली स्वहस्ते पाठवायला तो अजूनही बिचकतो . . या वलयांकित क्षेत्राला आपल्या घराच्या बाहेर ठेवायचा सर्वतोपरी प्रयत्न करतो . . हा द्वेष बोलण्यातून सुद्धा जाणवतो . आमची ती संस्कृती त्यांचे 'कल्चर ' . आमची 'जीवनशैली ' आणि त्यांची 'लाईफ स्टाईल ' . आमची 'मुल्ये ' आणि त्यांचे 'मॉरल्स ' . इत्यादी . या वलयांकित क्षेत्रातील लोकांनाही खाजगी सुसंकृत आयुष्य असते असे मानायला पापभिरू कुटुंबे तयार नसतात . . या क्षेत्रात वर जाताना पैशा सोबत बरेच काही द्यायला लागते असा सार्वत्रिक गैरसमज असतो . सिनेमा अन बातम्या यामुळे तो अधिक बळकट होतो . या बरेच काही ला अनेक पर्याय आहेत . कुछ पाने के लिये कुछ 'खोना ' पडता है . इस हाथ से ले उस हाथ से 'दे ' . अजून बरेच काही . या सर्व शब्दांचा लसावी काय तर काहीतरी कमवत असताना काहीतरी ' गमवावे ' लागते . इथे काहीतरी गमावणारी 'स्त्री ' असेल तर तिचे काहीतरी गमावणे सामाजिक चिंतेचा अन चिंतनाचा विषय होतो . जेव्हा काहीतरी गमावलेली स्त्री जाहीरपणे म्हणते , ' आपण केवळ एकनिष्ठता अन आपल्या शरीरावर आपलाच अधिकार आहे हे दाखवून देण्यासाठी लढत आहोत .' तेव्हा पत्रकारीतेसारख्या वलयांकित क्षेत्रामध्ये सतत प्रकाशझोतात वावरणाऱ्या , नैतिकतेचा अन सामाजिक मुल्यांचा झेंडा आपल्याच खांद्यावर आहे या अविर्भावात वावरणाऱ्या , त्या 'क्षेत्रात ' येऊ पाहणाऱ्या काही शे मुला मुलींच्या 'आदर्श ' असलेल्या व्यक्तींची कलंकित मानसिकता देशासमोर येते अन प्रश्न उभा राहतो तरुणांचा आदर्श कोण ??
Saturday, 23 November 2013
नामांतर - एक वाद . . एक संधी !
'नावात काय आहे ? ' असा सवाल निर्माण करून थोर नाटककार शेक्सपिअर सोळाव्या शतकात निवर्तला . तोच जर विसाव्या शतकात अन त्यातल्या त्यात भारतात जन्माला आला असता अन नावात काय आहे ? असे काहीबाही बोलता झाला असता , तर निश्चित 'प्रतिगामी ' ठरवला गेला असता . चौका चौकात त्याच्या नावाने शिमगा झाला असता , त्याचेच साहित्य जाळून त्या भोवती सुधारणावादी पुरोगामी कार्यकर्त्यांनी फेर धरला असता , शाई आणि डांबराच्या रंगात तो न्हावून निघाला असता . तो तिकडेच महान म्हणून (होऊन ) गेला ते बरे झाले . . भारतापुरता विचार करावयाचा झाला तर नावात काय नसते ?? नावात वर्ण ,वर्ग , वलय , वर्चस्व , जात ,धर्म , राग ,द्वेष , अनुनय ,असूये पासून अस्मिते पर्यंत सर्वकाही असते . म्हणूनच भारतीय 'नावावर ' चालतो , विकतो अन खपतो सुद्धा . . याच नावाला एकदा आडनाव चिटकले की आडमार्गाने वेगळेच राजकारण सुरु होते . आमचे अन तुमचे या भांडणात ते 'आपलेच ' आहेत हा विस्तृत दृष्टीकोन संकुचित होतो . अमुक एक नावा आडनावाची व्यक्ती म्हणजे तमुक जातीची /धर्माची अस्मिता . . इतरांना त्यावर बोलायचा किंवा तात्विक विरोध करायचा अधिकार नाही . . कारण . . कार्याला अडगळीत टाकून केवळ नावाचे भांडवल करणे , अस्मितेचा मुद्दा बनवून समाजाला एकमेकात झुंजवणे , व्यक्तीची प्रतीके बनवून त्यांचे अमर्याद कार्य ठराविक जाती धर्माच्या 'मर्यादित ' चौकटीत बंदिस्त करणे अन त्या बंदिस्त चौकटीचा एकमेव रखवालदार , वारसदार म्हणून बहुसंखेने समाजात वावरणे किंबहुना समाजात आपल्यासारख्याच संकुचित विचारसरणीच्या लोकांचा समूह तयार करून सामाजिक स्वास्थ्य बिघडवणे हेच या शतकाचे ' नामी ' राजकारण आहे . . . .
Monday, 18 November 2013
'नकळत दिसले सारे . . . '
ती एक प्रशांत सायंकाळ होती . घड्याळात किती वाजले होते आठवत नाही . कारण डोळे निकामी झाले होते . कान दुप्पट वेगाने कार्यरत झाले होते .. समोरून कोणीतरी येतंय , बाजूने कोणीतरी सरकतंय , मागून कोणीतरी ढकलतय , पुढून कोणीतरी ओरडतय हे सारे जाणवत होते पण दिसत नवते . . . मी अंधळा झालो होतो का ?? डोळ्यासमोर केवळ अंधार . . ओळखीचा रंग एकच . . सोबतीचा रंग एकच . . ज्ञात असलेला रंग एकच . . 'काळा ' . . कधीपासून होतंय मला असे ?? समोरचे दिसूनही दिसत नाही , असूनही जाणवत नाही , बघूनही बघवत नाही . . . का ?? माझी दृष्टी गेली होती का डोळसपणा हरपला होता ? मी माझ्या आयुष्याकडे शेवटी कधी 'डोळसपणे ' डोकावून पहिले होते ? माझे आजपर्यंतचे आयुष्य कधी 'डोळ्याखालून ' घातले होते ? मला सुंदर डोळे दिल्या बद्दल मी ईश्वराचे कधी आभार मानले होते ? ज्यांना डोळे नाहीत त्यांना मी कधी मदत केली होती ? डोळे मिटण्या पूर्वी जर डोळेच काम करेनासे झाले तर आयुष्य कसे असेल याचा मी कधी विचार केला होता ? या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचे उत्तर म्हणजे भावनांना हात घालून सामाजिक कर्तव्याची जाणीव करून देणारे नाटक ' नकळत सारे दिसले . . . '
Subscribe to:
Posts (Atom)






