सुलभा : पुरुषा राजन सततं प्रियवादिन :! अप्रियस्य तु पथ्यस्य वक्ता श्रोता च दुर्लभ:!!
Saturday, 22 June 2013
Saturday, 8 June 2013
गिव मी सम सनशाईन .....
" Life is race if you don't run fast , you will be like broken anda " असे म्हणत अनेक विरु सहस्रबुद्धे १० वी , १२वी मध्ये कमी गुण मिळालेल्या राजू रस्तोगी , फरहान वर बरसत असतील . पाऊस बरसायच्या काळात आपला बाप का बरसतोय ? कसेबसे गणित सोडवले . . आता आई आपला bank balance किती त्यातील आधीचे कर्ज , मोठ्या -भाऊ बहिण यांचे लग्न , तुझ्या शिक्षणाचा वाढीव खर्च करून आमच्या म्हातारपणात आमच्या हाती काय असा ' ड ' गटातला प्रश्न घालून का घाबरवते ?? निकाल लागल्यापासून आई -बाबा म्हणतात ' नाक कापलं कार्ट्यान " त्यांचे नाक तर जागेवरच आहे मग ते अस का म्हणतात ? ताई पण माझ्याशी नीट बोलत नाही . . कारण काय म्हणे मी तिचा अपेक्षाभंग केला . . माझ्या आवडीच्या अ ब क कॉलेज मध्ये मला जायचय . . काका म्हणाला तुझी लायकी नाही . बाबा म्हणाले डोनेशन भरायची माझी लायकी नाही . काय चुकलो मी ? ८५ % गुण कमी आहेत का ? सगळ्यांना माझ्यामुळे त्रास होतो . . मी इतरासारखा माझ्या घराला आनंद देऊ शकत नाही . . मीच नालायक आहे . . काय करू मी ??
Sunday, 26 May 2013
असा राहुल होणे नाही !!
यश -अपयश कोणाच्या हाती नसते स्पर्धा म्हटले की ती निकोप असलीच पाहिजे असा आपला 'अट्टाहास ' असतो . तो असलाच पाहिजे . पण स्पर्धा हि विजयापेक्षा पैशासाठी खेळली जाते तेव्हा मैदानाचे नियम मागे पडतात आणि व्यवसायाचे नियम लागू होतात . नफा आणि तोट्याच्या गणितात 'खेळ ' मागेच रहातो पण 'स्पर्धा ' मात्र सुरूच राहते . यश -अपयश कोणाच्या हाती नसते आपण केवळ प्रयत्न करायचे हे कैक पिढ्यांनी वापरलेले वाक्य आताच्या पिढीने बदलले आहे .आयुष्य जगायला 'अर्थ ' लागतो त्यामुळे आयुष्यात अधिकाधिक 'अर्थ ' मिळवण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करायचे बाकी यश -अपयश कोणाच्या हाती नसतेच . बैलांच्या शर्यती , कोंबड्यांच्या झुन्झी बंद झाल्याने श्रीमंतांनी मन आणि पैसा गुंतवायचा कोठे ? या प्रश्नाला धनाढ्य बी.सी . सी . आय ने उत्तर दिले आणि क्रिकेट चा ३ तासांचा 'सिनेमा ' सुरु केला . गावच्या जत्रेत जसे ट्रकवरच्या तमाशाचे फड असतात तसे प्रत्येक गावात आपले कलाकार ( मैदानापेक्षा जाहिरातीत जास्ती दिसणाऱ्या लोकांना काय म्हणावे ? ) आणि नृत्यांगना घेऊन धनिक हिंडत आहेत .
ख्रिस गेल च्या वादळाने गाजलेली आय . पि. एल . ६ आता स्पॉट फिक्सिंगच्या तडाख्याने (कदाचित ) लाजत आहे . गेल्या एक आठवड्या पासून श्रीशांत ,चंडीला ,विंदू , एक मराठी अभिनेत्री , श्रीनिवासन , मायाप्पन यांच्या नावाभोवती चर्चेचे फड रंगत आहेत . गल्ला भरण्यासाठीच जन्माला घातलेल्या स्पर्धेत नैतिकता असावी कि नसावी यावर राष्ट्रीय चिंतन सुरु आहे . सट्टा नियमित करावा यासाठी तमाम सट्टेबाज देव पैशात बुडवून बसले आहेत . श्रीनिवासन आयतेच अडकल्याने आपली डाळ शिजवण्यासाठी दालमिया सह सर्व मिया तयार होत आहेत असे वृत्त आहे . सट्टेबाजी विरोधात कायदा करण्यासाठी हालचाली सुरु आहेत . हे सगळे कशासाठी ? खेळात सभ्यता , नैतिकता राहावी म्हणूनच न ? पण जेव्हा क्रिकेट च्या मैदानावरील सभ्यता ,नैतिकता निवृत्ती घेते त्याची साधी दखलही कोणाला घ्यावी वाटत नाही हे खेळाचे दुर्दैव . कालच राहुल द्रविडने निवृत्ती जाहीर केली आणि आय पी एल मधला फ़ेअर प्ले संपला . राहुलच्या निवृत्तीची 'बातमी ' झालीच नाही . तो आय पी एल च्या मैदानावरुनही 'उपरा ' म्हणूनच बाहेर पडला . . . .

Saturday, 27 April 2013
चाळीशीतील ''देव "
जसे सचिन देव बर्मन यांचे संगीत अजूनही आपल्याला मोहिनी घालते तसेच सचिनचा खेळ सुद्धा आपल्याला मोहिनी घालतच राहील . . अगदी त्याच्या निवृत्ती नंतरही !
देवाला वय नसते . तो अनादी , अनंत असतो . तारुण्य -वार्धक्य यासारख्या वयाच्या अवस्था त्याच्या कार्यास अडथळा ठरू शकत नाहीत . अवतारकार्य केव्हा सुरु करायचे आणि दैवी कार्याचा अंत कधी करायचा याचा निर्णय खुद्द देव घेतो . पण देव जेव्हा मनुष्ययोनीत जन्म घेतो तेव्हा त्यालाही पृथ्वीचे नियम लागू होतात . त्याचे अनादी ,अनंतत्व पंचमहाभूतात विलीन होऊन त्यास मर्त्य स्वरूप येते . त्याचे वय त्याच्या कर्तुत्वाचा आणी अस्तित्वाचा निर्णय घेते . आपले कार्य कधी सुरु करायचे किंवा कधी संपवायचे याचा निर्णय एखादी समिती किंवा भक्तांचा मोठा गट घेतो . वय वाढले की उत्साह कमी होतो , हातापायांच्या हालचाली मंदावतात , धडाडी कमी होऊन सौम्यपणा अंगी येतो , नाही म्हंटल तरी दृष्टी अधू होते , पंचपक्वानाचे ताट सुद्धा ' शुगर फ्री ' संस्कारातून पास होऊनच समोर येते , साठीची तरतूद करून ठेवा अशा सल्ल्यांची रांग लागू लागते . . . असे प्रत्येकाच्या बाबतीत होते का ?? 'हो ' कारण चाळीशी म्हंटल की या गोष्टी आल्याच . नाही आल्या तर ती चाळीशी कसली ? . . दिल कितीही जवान असले तरी अखेर शरीर थकतेच . . मग कामाचा ताण ,धावपळ कमी नको का करायला ? या गोष्टी नव नव्या वेष्टनात अजून काही वर्षे आपल्या समोर येतील . . कारण आपला देव चाळीशीत आहे . . ! क्रिकेट हा धर्म मानला तर त्या धर्माचा देव सचिन रमेश तेंडूलकर याने २४ एप्रिल २ ०१ ३ रोजी ' चाळीशीत ' पदार्पण केले !!
चाळीशी ! मानवाच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा , बदलांचा कारखाना , गोळ्यांच्या भडीमाराने घायाळ न होता आणि दररोज विविध कारणांसाठी अंगात घुसणाऱ्या सुयांची तमा न बाळगता आनंदी राहायचे , रडणाऱ्या बायकोचे सांत्वन करत ई.म .आय चे आकडे बघत स्वतः रडायचे , चाळीशीनंतरचे काम , आरोग्य आणि जीवन यासारख्या कार्यक्रमास जोडीने आणि जातीने जायचे वय ! चाळीशीतील एखादा माणूस आपला अंदाज चुकवतो म्हणजे काय ? बर चुकवावेत ते तरी किती प्रमाणात ? थेट मैदानं गाजवावीत ? धावतो काय , पळतो काय , विश्वविक्रम करतो काय ? वयाचे भान आहे का नाही या तेंडल्याला ? रोज बायको टोमणा मारते . . नुसते सचिनला 'बघू ' नका त्याचे जरा 'अनुकरण ' करा बघावं तेव्हा चाळीशीचे कौतुक . . असे दिवसातून चाळीस वेळा ऐकावे लागते . आता तर पोरं पण 'पोक ' करायला लागलीत .. आयला खरच देव आहे तो नाहीतर आपली झेप आहे का ?असे संवाद ' फोर्टी प्लस ' क्लब मध्ये नक्की सुरु असतील . त्यामुळे सचिनची निवृत्ती ही चाळीशीची गरज आहे . .. .
सचिन ने निवृत्ती कधी घ्यावी आणि तो का घेत नाही ? हे दोन प्रश्न चघळत विशीतली पिढी चाळीशीत गेली ,तर तेंदुलकर म्हणत प्लास्टिकची बात जमिनीवर आपटणारी पिढी विशीत आली ! तरीही हा प्रश्न , सचिन नावाचे गारुड अजूनही सुरूच आहे . यशस्वी माणसाने यशाच्या सर्वोच्च बिंदूवर असताना निवृत्ती घ्यावी असा सामान्य नियम आहे . पण सामान्य नियम असामान्यांना लागू होतो का ? वय असेपर्यंत होत नाही पण वय झाल्यावर हा नियम लागू होतो . कारण देव मनुष्ययोनीत जन्माला आल्यावर त्याला पृथ्वीवरचे नियम लागू होतात . मनाचे न ऐकता लोकांचे ऐकावे लागते . वयाचा माझ्यावर परिणाम झाला नाही हे सप्रमाण सिद्ध करण्यासाठी कसरत आणि धडपड करावी लागते . आतापर्यंत टाळलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात . माझ्या वाढत्या वयाची मला जाणीव आहे याची जगाला जाणीव करून द्यावी लागते . म्हणूनच सचिन त्याच्या वाढदिनी म्हणाला "चाळीस आकडा पाहून थोडे दडपण आले " . . यानेही अनेक तर्क वितर्क सुरु झाले आणि ते अपेक्षितच होते . सचिनला महान याच टीकांनी केले आहे . वैयक्तिक यश पण सांघिक अपयश , सांघिक यश पण वैयक्तिक अपयश , दोहोंचे यश तेव्हा संघाचे श्रेय , दोहोंचे अपयश तेव्हा जागा अडवल्याचा ठपका ! या कौतुक -टीका मार्गावरून झालेला सचिनचा प्रवास स्तिमित करणारा आहे . त्याची कामगिरी आणि विश्वविक्रम प्रत्येक क्रिकेट वेड्यास जवळपास पाठ असल्याने ते पुन्हा मांडणे म्हणजे लोकांच्या स्मरणशक्तीवर शंका घेण्यासारखे आहे . ती चूक मी चुकुनही करणार नाही . थोडासा संदर्भ देतो - शतकांचे शतक ! हि कामगिरी सामान्य नाही . . सामान्य व्यक्तीचीसुद्धा नाही !! अनेक शतके खेळ सुरु असूनही असा पराक्रम करणे कोणाला जमले नाही . . म्हणूनच कदाचित त्याला ' देवत्व ' बहाल केले असेल . हे देवत्व सचिन मी देव नाही म्हणत चाळीशीत सुद्धा आनंदाने मिरवतो आहे .
सचिन ने एकदिवसीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतलीच आहे , २० -२० प्रकारात आय . पी . एल मधून खेळत आहे . पण कसोटीचा मोह सचिनला सुटत नाही की आयुष्याची कसोटी खेळायची सवय असलेल्या सचिनला २२ यार्डाची खेळपट्टी सोडवत नाही हे केवळ त्यालाच माहिती . . सचिन आंतरराष्ट्रीय स्तरावरून निवृत्ती घेणारच आहे पण ती कामगिरी खालावली म्हणून कि वय वाढले म्हणून याचा निर्णय लवकरच होईल . अर्थात त्याचे वय वाढले आहे ' अधिसारखे आता ' अशक्य आहे . . सूर्यास्त होत असताना संपूर्ण जग पहात आहे . त्याचे फटके अजूनही वाहवा मिळवत असले , मैदानातील त्याची उपस्थिती कामे सोडून टी .व्हि समोर खिळवून जरी ठेवत असली , १० क्रमांकाच्या जर्सी मधून समालोचकाच्या सफेद -निळ्या शर्टात पाहणे कितीही दुक्ख्दायक असले तरी दिवस लवकरच येणार आहे . खासदार म्हणून सचिनची नवी इनिंग सुरु झाली आहे . खासदार निधी वापरून विदर्भात सौरदिवे बसवायची त्याची कल्पना स्तुत्य आहे .त्यामुळे समाजसेवेसाठी आणि आणखीन सचिन घडवण्यासाठी , आफ्रिकेत त्याने खणखणीत कामगिरी करून निवृत्ती घ्यावी अशी सर्वांप्रमाणे माझीही इच्छा आहे . माणसाचा स्वभावाच मुळात चंचल . देव आता ओल्ड झाला म्हणून अनेकांनी पर्यायांची चाचपणी सुरु केली आहे . आतापर्यंत भाटाची भूमिका करणारे अचानक टीकाकार बनले आहेत . आणि सर्वच चूक आहेत असे म्हणता येणार नाही . . कारण देव चाळीशीत आहे आणि चाळीशी म्हणजे …जसे सचिन देव बर्मन यांचे संगीत अजूनही आपल्याला मोहिनी घालते तसेच सचिनचा खेळ सुद्धा आपल्याला मोहिनी घालतच राहील . . अगदी त्याच्या निवृत्ती नंतरही ! असा विचार मनात आला की मुकेश चा आवाज कानात घुमू लागतो . . कल खेल मै हम हो ना हो गर्दिश मे तारे रहेंगे सदा . .भूलेंगे हम भूलोगे तुम पर हम तुम्हारे रहेंगे सदा . .रहेंगे यही इसके निशान इसके सिवा जाना कहा . . . येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील . . चाळीशीतील "देव " !!
देवाला वय नसते . तो अनादी , अनंत असतो . तारुण्य -वार्धक्य यासारख्या वयाच्या अवस्था त्याच्या कार्यास अडथळा ठरू शकत नाहीत . अवतारकार्य केव्हा सुरु करायचे आणि दैवी कार्याचा अंत कधी करायचा याचा निर्णय खुद्द देव घेतो . पण देव जेव्हा मनुष्ययोनीत जन्म घेतो तेव्हा त्यालाही पृथ्वीचे नियम लागू होतात . त्याचे अनादी ,अनंतत्व पंचमहाभूतात विलीन होऊन त्यास मर्त्य स्वरूप येते . त्याचे वय त्याच्या कर्तुत्वाचा आणी अस्तित्वाचा निर्णय घेते . आपले कार्य कधी सुरु करायचे किंवा कधी संपवायचे याचा निर्णय एखादी समिती किंवा भक्तांचा मोठा गट घेतो . वय वाढले की उत्साह कमी होतो , हातापायांच्या हालचाली मंदावतात , धडाडी कमी होऊन सौम्यपणा अंगी येतो , नाही म्हंटल तरी दृष्टी अधू होते , पंचपक्वानाचे ताट सुद्धा ' शुगर फ्री ' संस्कारातून पास होऊनच समोर येते , साठीची तरतूद करून ठेवा अशा सल्ल्यांची रांग लागू लागते . . . असे प्रत्येकाच्या बाबतीत होते का ?? 'हो ' कारण चाळीशी म्हंटल की या गोष्टी आल्याच . नाही आल्या तर ती चाळीशी कसली ? . . दिल कितीही जवान असले तरी अखेर शरीर थकतेच . . मग कामाचा ताण ,धावपळ कमी नको का करायला ? या गोष्टी नव नव्या वेष्टनात अजून काही वर्षे आपल्या समोर येतील . . कारण आपला देव चाळीशीत आहे . . ! क्रिकेट हा धर्म मानला तर त्या धर्माचा देव सचिन रमेश तेंडूलकर याने २४ एप्रिल २ ०१ ३ रोजी ' चाळीशीत ' पदार्पण केले !!
चाळीशी ! मानवाच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा , बदलांचा कारखाना , गोळ्यांच्या भडीमाराने घायाळ न होता आणि दररोज विविध कारणांसाठी अंगात घुसणाऱ्या सुयांची तमा न बाळगता आनंदी राहायचे , रडणाऱ्या बायकोचे सांत्वन करत ई.म .आय चे आकडे बघत स्वतः रडायचे , चाळीशीनंतरचे काम , आरोग्य आणि जीवन यासारख्या कार्यक्रमास जोडीने आणि जातीने जायचे वय ! चाळीशीतील एखादा माणूस आपला अंदाज चुकवतो म्हणजे काय ? बर चुकवावेत ते तरी किती प्रमाणात ? थेट मैदानं गाजवावीत ? धावतो काय , पळतो काय , विश्वविक्रम करतो काय ? वयाचे भान आहे का नाही या तेंडल्याला ? रोज बायको टोमणा मारते . . नुसते सचिनला 'बघू ' नका त्याचे जरा 'अनुकरण ' करा बघावं तेव्हा चाळीशीचे कौतुक . . असे दिवसातून चाळीस वेळा ऐकावे लागते . आता तर पोरं पण 'पोक ' करायला लागलीत .. आयला खरच देव आहे तो नाहीतर आपली झेप आहे का ?असे संवाद ' फोर्टी प्लस ' क्लब मध्ये नक्की सुरु असतील . त्यामुळे सचिनची निवृत्ती ही चाळीशीची गरज आहे . .. .
Saturday, 20 April 2013
मादरचोद . . .
कालपर्यंत ' झोपडपट्टी भाषा ' म्हणून हिणवलेली आज बोलीभाषा कशी झाली यावर विचार झालाच पाहिजे . जी भाषा ऐकताना असभ्य ,असंस्कृत वाटते ती वापरताना तितकीशी छपरी का वाटत नाही ? कारण माणूस त्याच्या भाषेसह बदलत आहे . .
" अबे मादरचोद दिखता नही क्या ?? " एक अलिशान गाडी पुढे जात असताना शिवी हासडून गेली .. वेळ असेल रात्री ९ च्या आसपासची . कयानीच्या स्वर्गीय मावा केक ची चव जिभेवर आहे तोपर्यंतच घर गाठायचे या इराद्याने तुलनेने मोकळ्या रस्त्यावरून सणकत निघालो होतो . एस . जी .एस मॉल समोर फोनवर बोलत थांबलो असताना , एक निराधार योजनेचाच आधार असलेला , परिस्थितीने गरीब आणि अकाली वृद्धत्वाची देणगी मिळालेला बाप्या माणूस बिडी फुकट शेजारून गेला . कदाचित आनंदी असावा . बिडीच्या धुरात आणि कैक दिवस न केलेल्या दाढीत मला हसू दिसत होते . मोडक्या हेंडलला लावलेली मळकी पिशवी चाचपत आणि त्या भल्या मोठ्या मॉल कडे कुत्सित नजरेने पहात पुढे सरकत होता . काहीतरी होते त्या पिशवीत . . खूप काहीतरी मौल्यवान , आनंद देणारे ! पण निराधार -गरिबांना आनंदी राहायचा आनंद मिळतो कोठे ? स्वनाच्या दुनियेत वावरत असताना तो पृथ्वीवरचा रस्ता मात्र थोडासा भरकटला . एखादा फूटच . पण तो फुट मागून येणाऱ्या बि. एम . डब्लू स अडथळा करण्यास पुरेसा होता . सणकत येत असलेली गाडी या अनपेक्षित आणि भिकार अडथळ्याने चिडली . " अबे मादरचोद दिखता नही क्या ?? असे 'कट ' मारून जात म्हणाली . अंगात ताकद नसलेल्या निराधाराला तेवढा 'कट' पुरेसा होता . . पडला मादरचोद . . त्याच्या पिशवीसह . . गाडीवानाने आनंदाने शेजारी दिलेली टाळी माझ्या नजरेने टिपली . .
Subscribe to:
Posts (Atom)