Thursday 23 August 2012

गिरणी ......विचारांची आणि मानसिकतेची

                जुन्या चाळीची साक्ष देणारी चौकट , अरुंद बोळाला आणखी अरुंद करण्यासाठी लावलेल्या सायकल आणि स्कूटर , चाळीचे जुनाट लाकडी बांधकाम प्रथमदर्शनी दिसूच नयेत म्हणून त्यावर वाळत घातलेले लाकडाच्या तुलनेत नवे कपडे , आताच्या घरकुलात क्वचितच सापडणारे प्रशस्त अंगण , या सर्वाना सामाऊन घेत लाकडी जिन्यावरून आवाज न करता वर सरकणारा कॅमेरा .....मुलांच्या गलक्यातसुद्धा आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी आणि कथेतील नायकाच्या विश्वाची ओळख करून देण्यासाठी  "कर्र कर्र " आवाज करत उघडणारा दरवाजा ... पतीनिधनाच्या आघाताला मागे सारून पक्षाघाताने आजारी असलेल्या सासऱ्याला औषध देणारी नायकाची आई आणि नायकाचे हे विश्व बदलून टाकण्यासाठी येणार असलेली ..... " गिरणी " 

Saturday 18 August 2012

लोकपाल : एक फसलेले आंदोलन

 सिमेंट च्या जंगलात , श्वापदासामान मनोवृत्ती असलेल्या माणसांच्या गर्दीत , मोबाईल- गाड्यांचे हॉर्न याच्या गजबजाटात , पैशामागून येणाऱ्या सुखाच्या सहवासात रमताना अचानक "नैतिकतेचा "सूर्य ढळल्याचे लक्षात येते ... चिंताक्रांत मनस्थितीत सर्वत्र पसरलेल्या अंधकारात यातून आपल्याला कोण बाहेर काढेल याचा युद्धपातळीवर शोध सुरु होतो सवयीनुसार देवासही वेठीस धरण्यात येते ... प्रचंड जनसमुदाय परिस्थितीने हतबल झाला आहे याची खात्री पटली की एक व्यक्ती खिशातून काडी बाहेर काढून पेटवते ..अंधकारात ती प्रकाशाची तिरीप महत्वाची वाटते आणि ती देणारा माणूस देवासमान भासू लागतो .... त्या काडीच्या उजेडात सर्वांची वाटचाल सुरु होते मध्यंतरी अनेक भाट त्या व्यक्तीची स्तुतिसुमने उधळून कौतुक करू लागतात , लोकही त्याला कधी महात्मा तर कधी देव मानू लागतात अगदी गणपतीच्या मूर्त्याही त्या व्यक्तीच्या चेहेर्यातून बनू लागतात आणि या सर्व पोषक वातावरणात त्या व्यक्तीच्या मनातील "अहं " जागृत होतो ... या जगात केवळ मीच अनादी व शाश्वत आहे व इतर सर्व पामर आहेत अशी कुचकामी धारणा होते , बोलण्यात -वागण्यात अहंकार जाणवू लागतो आणि त्या अहंकाराने उन्मत्त होऊन लोकांचे काय होईल याचा विचार न करता काडी विझवण्यात येते ... पुन्हा सर्वत्र अंधकार झाल्याने अनेकांचा कपाळमोक्ष होतो व ते लोक एकमेकांना विचारू लागतात .... या महात्म्याने आपला विश्वासघात करून काय साधले ?? असाच प्रश्न अण्णा हजारे यांचेबाबत सर्वत्र विचारला जात आहे .......

Saturday 4 August 2012

पवारांनी काय साधले ??

.भारतातील जनतेला कायमच "साहेबांचे " आकर्षण राहिले आहे .... साहेब कसे दिसतात ,साहेब कसे बोलतात ,साहेब कसा विचार करतात इत्यादी गोष्टींचे नेहमीच सुप्त आकर्षण असते ..त्यामुळे आपल्या आदर्शांचे अनुकरण करणे ही भारतीय जनतेची मानसिकता आहे .... त्यांचे बोलणे ,वागणे ,विचार ,आचार ,शैली यांचे अनुकरण करत असताना घडतात कार्यकर्त्यांच्या पिढ्या आणि सुरु होतो साहेबांचा राजकीय प्रवास ....आतापर्यंतच्या आयुष्यात महाराष्ट्राच्या राजकारणात ३ साहेब पहिले ....यातील २ साहेबांवर महाराष्ट्रातील जनतेने मनापासून प्रेम केले , वृत्तपत्रांनी /प्रसार माध्यमांनी कायम डोक्यावर घेतले , महाराष्ट्रातील असंख्य जनतेने कायम यांना मनात ठेवले पण हे प्रेम ,आदर मतपेटीतून क्वचितच व्यक्त झाले त्यामुळे अपवादात्मक सत्ता सोडता सिंहासन दूरच राहिले ... उरलेले साहेब म्हणजे मतपेटीचे साहेब ... वृत्तपत्रे /प्रसारमाध्यमे यांचे नावडते , जनतेच्या मनात फारसा आदर नसलेले ,अनेक घोटाळ्यात -भ्रष्टाचारात नाव आलेले पण कायम  त्यातून आपल्या बगल बच्च्यांसह सहीसलामत सुटलेले पण इतके असूनही येनकेन प्रकारे सत्तेचा कायम आस्वाद घेणारे साहेब ..... मनावर राज्य करणारे बाळासाहेब आणि राज साहेब तर मतपेटीवर राज्य करणारे पवार साहेब ......... या तिन्ही साहेबांच्या राजकीय कर्तुत्वामुळे त्यांच्या संदर्भातील लहानशीही बातमी प्रसारमाध्यमांना अनेक दिवस पुरते .... पण कोणत्या साहेबाने माहितीचा खजिना पुरवला तर ?? असाच खजिना पवार साहेबांनी मागच्या आठवड्यात पुरवला ..... संयुक्त मानापमानाचा डाव पुन्हा एकदा दिल्ली आणि मुंबईच्या रंगमंचावर मांडला गेला ....पाहणारे आनंदी , विश्लेषण करणारे खुश , बातमीचा पाठपुरवठा करणारे  पत्रकार डबल खुश आणि राष्ट्रपती भवनात पदोन्नती मिळालेल्या संकटमोचकाच्या अनुपस्थितीत उभे ठाकलेलं बंड मोडून काढल्याने काँग्रेस मधल्या आघाडीच्या फळीचा वाढलेला आत्मविश्वास आणि या सर्व प्रकाराकडे अपेक्षाभंगाच्या क्लेशावर अपेक्षापुर्तीचे तकलादू आवरण चढवून खिन्नपणे पाहणारे साहेब ...... हा सगळा प्रकार पहिला की मनात प्रश्न उभा ठाकतो.... " पवारांनी  काय साधले ?? " 

Friday 3 August 2012

                         राजकारणात काही मुरलेली व्यक्तिमत्वे असतात की विनाकारण काही करणे किंवा आपला संयम सोडून आत्मघात करून घेणे किती धोक्याचे असते याचा त्यांना पुरेपूर अंदाज असतो ...वर्तमानात फारशा फलदायी न वाटणाऱ्या पण भविष्य घडवणाऱ्या काही निर्णयांमुळे त्यांच्या राजकीय जीवनास अनुभवाचे पैलू पडतात आणि अशा अनुभवी खेळाडूकडून मानापमानाच्या /महत्वकान्क्षेच्या सोंगट्या सत्तेच्या सारीपाटावर पडल्या की निकाल त्यांच्याच बाजूने लागणे अपेक्षित असते ...कारण विरोधी पक्षाची कमकुवत बाजू हेरून , नक्की रसद कोठून मिळेल याची आखणी करून , विजय झाला तर किती ताणायचे आणि पराभव झाला तर किती सोसायचे याचा मसुदा तयार करून , गरज पडली तर कोणता मित्रपक्ष धावून येईल याची चाचपणी करून आणि सेनापती सह राजाने स्वतः युद्धात उतरून विरोधी पक्षास जेरीस आणायची व्यवस्थित योजना बनवण्यात येते .... सर्व गोष्टी मनासारख्या जुळून येतात पण मधेच नियती आपला खेळ दाखवते, अचूक वर्मी बसायचा घाव अन्यत्र बसून नाममात्र विजय हाताशी येतो आणि तह करायला लागल्याचे शल्य कायम मनास बोचत राहते ..... यंदा असेच काहीसे पवार साहेब यांचे बाबत झाले आहे 
                कॉंग्रेस चे संकटमोचक प्रणव मुखर्जी राष्ट्रपती होईपर्यंत पाहिलेली वाट ....अण्णा हजारे यांची पडद्या मागून साथ ...१९ /७/२०१२ रोजी नाराजी स्पष्ट केल्यानंतर केवळ ४८ तासात ममता यांनी " युपीए सरकार मध्ये राहणार पण पश्चिम बंगाल च्या निवडणुका स्वतंत्र लढवणार " अशी केलेली घोषणा ,२२/०७/२०१२ रोजी समाजवादी पक्षाच्या मुलायम सिंह यादव (.कॉंग्रेस ममताबाधेवर उतारा म्हणून मुलायम यांच्या २२ खासदारांकडे पाहत असल्याने त्यांच्या विरोधास प्रचंड महत्व आहे )यांनी पुन्हा "एफ .डी.ए. " चा मुद्दा काढू नये म्हणून सरकारला लिहिलेले पत्र त्यावर प्रकाश करात, सुधाकर रेड्डी ,दानिश अली यांच्या स्वाक्षऱ्या ..असे पोषक वातावरण असताना शरद पवार यांना २४/०७/२०१२ रोजी केवळ समन्वय समितीच्या आश्वासनावर बंड मागे का घ्यावे लागले ? याची कारणे कधीच बाहेर येणार नाहीत किंवा काही कारणे कालांतराने बाहेर येतील .... पण नक्की नाराजीचे कारण काय ?? 
                       १९७७ मध्ये इंदिरा गांधी हत्ये नंतर कॉंग्रेस मधून बाहेर गेल्यावर १९८६ मध्ये स्वगृही परत आल्यावर ,१९९९ साली निवडणुकीच्या ३ महिने आधी राष्ट्रवादी पक्षाची केलेली स्थापना , सोनिया गांधी यांच्या विदेशी मुद्द्यावरून त्यांना केलेला प्रारंभिक विरोध आणि नंतर युती ही स्थित्यंतरे सोडली तर शरद पवार हे कॉंग्रेस शी कायम एकनिष्ठ राहिले आहेत .... परदेशी गुंतवणूक (एफ.डी .आई ) , अमेरिकेसोबतचा अणु करार यासारख्या मुद्द्यांवरून विरोधी पक्षांसोबत यु .पी .ए .मधील घटक पक्षही विरोधात गेल्यावर कॉंग्रेस च्या पाठीशी एकनिष्ठ राहणारे , राष्ट्रपती निवडणुका  रंगात असताना यु .पी .ए . उमेदवारासाठी (प्रतिभा पाटील - प्रणब मुखर्जी ) एन .डी .ए . चा घटकपक्ष असणाऱ्या शिवसेनेची मते यु .पी .ए . कडे वळवणारे पवार आपल्याकडे आवश्यक संख्याबळ नसल्याचे ज्ञात असताना मुखर्जी यांच्या नंतर आपल्याला  क्रमांक २ पद मिळावे यासाठी आग्रह करतील असे वाटत नाही ... संसदेतील जेष्ठ सदस्य असतानाही पवार यांना गेल्या ८ वर्षात केवळ कृषी मंत्री पद मिळाले ...अर्थ /गृह /संरक्षण अशा महत्वाच्या खात्यांसाठी त्यांचा विचार झाला नाही यामागे परदेशी मुद्द्याचा  बाऊ केल्याचा राग सोनिया यांच्या मनात असल्याचे सांगण्यात येते ...  
                       महाराष्ट्रात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र कारभार करत असले तरी सत्तेची सूत्रे नेहमीच राष्ट्रवादी कडे असतात ...अर्थ ,गृह ,जल ,उर्जा ,ग्रामीण अशी वजनदार खाती राष्ट्रवादी कडे असतात आणि मुख्यमंत्री कॉंग्रेस चा असला तरी त्याचे निर्णय राष्ट्रवादी च्या हिताचे असतात..सोबत राहून राष्ट्रवादीच्या कुरघोडी करण्याच्या प्रयत्नास कायम सौम्य /नाममात्र विरोध करण्यात येतो  .... आदर्श कारभार करून पायउतार झालेल्या अशोकराव यांचेनंतर सिंहासनावर बसलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनी मात्र हे चित्र पालटले ...मे २०११ मध्ये गेली १७ वर्षे अजित पवार यांच्या अधिकारात असलेल्या " जिल्हा मध्यवर्ती बँक " चे संचालक मंडळ बरखास्त करून त्यावर आपले नियंत्रण प्रस्थापित  करून चव्हाण यांनी राष्ट्रवादीस मोठा धक्का दिला , पाठोपाठ नाबार्ड ने सर्वाधिक कर्ज राष्ट्रवादीच्या संबंधित साखर कारखाने व सुत गिरण्यांना दिल्याचे स्पष्ट केले ,राष्ट्रीय वार्षिक अर्थ अहवालानुसार अजित पवार यांच्या जलमंत्री काळात ( १९९९-२०१० ) ७०,००० कोटी खर्चून केवळ ०.१ % क्षेत्र पाण्याखाली आले आहे असा निष्कर्ष आणि ४ मे २०१२ रोजी मुख्यमंत्र्यांचा श्वेतपत्रिका काढण्याच्या निर्णय हे सर्व राष्ट्रवादी च्या विरोधातील होते तसेच माणिकराव ठाकरे यांना चव्हाण यांना पदउतार करण्यासाठी  "असमाधानी आमदारांनी " लिहिलेले पत्र योग्य वेळी फुटणे यास योगायोग समजायचा का ? त्यामुळे चव्हाण यांच्या कर्तुत्वास मर्यादेचे कुंपण घालण्यासाठी नाराजीचा सूर आवळला गेला असण्याची शक्यता आहे ... परंतु नियोजित कार्य चव्हाण उत्तम रीतीने करत असल्याने आनंदी पक्ष नेतृत्वास या नाराजीची फारशी दाखल घ्यावी वाटली नाही .... त्यामुळे महत्वाच्या बैठकी मध्ये अनुपस्थित राहून ,सरकारी गाड्यांचा त्याग करून ,दिल्ली -महाराष्ट्रात वातावरण गरम करून अखेर पवार यांना तलवार म्यान करावी लागली ...
                       ज्यांना राजकारणाची जाण आहे ते हा शरद पवार यांचा पराभव कधीच मानणार नाहीत ...माझ्यामते ही केवळ चाचपणी होती ...होऊ घातलेल्या नवीन राजकीय समीकरणांची कदाचित नांदी होती ..कारण यु .पी .ए. मध्ये सहभागी असलेले सर्व घटकपक्ष समाधानी नाहीत , अनेकांना राहुल गांधी यांचे लादलेले नेतृत्व मान्य नाही ....राष्ट्रवादी ,तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष ,डी .एम .के हे पर्याय नाही म्हणून सोबत आहेत अशा अवस्थेत आहेत ... २०१४ साली शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व प्रादेशिक पक्ष एकत्र आले तर सत्तेची समीकरणे झपाट्याने बदलू शकतात आणि शरद पवार यांच्यात ती क्षमता आहे ...  भविष्यात काय होईल याचे भाकीत अनेकदा चुकू शकते कारण राजकारणात गुरु ,राहू ,केतू , अन्य ग्रहांच्या दिशा व दशा दर मिनिटाला बदलत असतात त्यामुळे केवळ वर्तमानाचा विचार केला तर प्रश्न उपस्थित होतो की केवळ समन्वय समितीच्या मुद्द्यावर तडजोड करून पवारांनी काय साधले  ??