Sunday 8 April 2012

"पाकिस्तानचे शंभर सैनिक बर्फाखाली गाडले गेले. Great."- माणुसकीचा पराभव !!


तसा ब्लॉग लिहायचा आज काही विचार न्हवता ...रविवार आहे त्यामुळे डोक्याला ताण न देणे असे ठरवून निवांत इंटरनेट वर संचार करायला सुरुवात केली आणि आवडीचे बुक म्हणजे फेस बुक उघडले ... अनेक ग्रौप शी संलग्न असल्याने विविध ग्रौप मधून असंख्य नोटी . वाल  वर झळकत असतात ..त्यातील एका नोटी ने लक्ष  वेधून घेतले आणि डोक्याकडून हाताकडे प्रतिक्षिप्त क्रिया आली म्हणून ब्लॉग  लिहायला घेतला ... सध्या अनेक ठिकाणी आणि अनेक ग्रौप वर कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्ते जहाल आणि विचारांना भरकटायला लावणारी किंवा विचार किती भरकटलेले आहेत हे दर्शवणारी बेछुट व्यक्तव्ये करत असताना दिसतात .... काही लोक तर हिंदू धर्म सोडून  इतरही धर्म  या जगात आहेत  हे मानायलाही तयार होत नाहीत आणि त्यांना समजवायला गेले किंवा सर्वधर्म समभाव असे काही बोलले कि एकतर तू हिंदू नाहीस  असा सरळ , तुझे खाते खोटे आहे असा शंकेखोर आणि सुंता कधी करून घेतो आहेस असा चीड आणणारा प्रश्न समोर उभा केला जातो .. विनाकारण लोकांच्या भावना भडकावणे , एका ठराविक धर्माला निशाणा बनवणे आणि त्यांच्यावर काहीही बोलून  आपण किती कट्टर हिंदुत्ववादी आहोत हे सिद्ध करणे याचा नवा प्रवाह आता रुजू होताना दिसत आहे ...असाच एक कार्यकर्ता "पाकिस्तानचे शंभर सैनिक बर्फाखाली गाडले गेले. Great." अशी पोस्ट सर्व ठिकाणी टाकतो तेव्हा हिंदू धर्माचा , 
धर्मातील शिकवणीचा , हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा , त्यांच्या विचारांचा प्रवास नक्की कोणत्या दिशेने 
चालू आहे असा प्रश्न एका "मानवतेचा धर्म " मानणाऱ्या माणसास पडतो आणि मनास वेदना देऊन जातो ....



             पाकिस्तानातील सियाचेन भागातील टापू ग्यारी येथे आज दिनांक ८ रोजी सकाळी ६ वाजता हिमाकडा कोसळून १५० सैनिक मृत्युमुखी पडल्याची शक्यता आहे १६ हजार फुट उंच ठिकाण असल्याने मदत कार्यात अनंत अडचणी येत आहेत त्यामुळे मृतांचा नक्की आकडा समजू शकलेला नाही ..असो .. आता पाकिस्तानचे १००-१५० सैनिक बर्फाच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत आणि त्यातील बहुतांशी पैगंबरवासी होण्याची शक्यता आहे यात "GREAT "काय  ? म्हणजे माणसांच्या आयुष्यास काहीच किमत नाही ? ते मुस्लीम आहेत आपल्या शत्रू राष्ट्रातील आहेत म्हणून त्यांच्या आपत्तीवर त्यांच्या मृत्त्युवर आपण आनंद साजरा करायचा हीच का आपली संस्कृती ? हेच शिकवतो का आपणास आपला हिंदू धर्म ? अशी काही विधाने पहिली कि मनास यातना होतात कारण हिंदू धर्म आणि संस्कृती जगात महान मानली  जाते ती आपल्या संस्कारांमुळे ,निष्ठे मुळे, शिकवणीमुळे आणि तत्वांमुळे ....पण अशी विचारसरणी हिंदू तत्वाधारेत बसतच नाही तरीही अशा पोस्त ला अनेक कॉम्मेंत पडतात आणि लाइक करण्यात येते हे आपण वैचारिक दृष्ट्या किती मागास आहोत याचे द्योतक आहे ... आपल्याकडील जवान एखाद्या अपघातामध्ये मृत्युमुखी पडला तर आपणास हळहळ  वाटते  कारण देशाचा एक शिपाई गेला ...मग इतर देशांच्या शिपायान्बद्दल तशीच भावना का असू नये ? ज्या हिंदू राज्यांचे नाव आपण घेतो ,ज्यांचा आदर आपण करतो त्यांनीदेखील व्यक्तीद्वेष कधी केला नाही अगदी शिवाजी महाराजांनी सुद्धा अफजल्यास त्यांच्या पद्धतीने दफन केले आणि त्यांचे नाव घेऊन आपण असले उद्योग करायचे ? इतके का संकुचित झाले आपले विचार आणि इतके का झालो आपण वैचारिक दरिद्री ?


          अर्थात मला पाकिस्तानचा कोणताही पुळका नाही ,मी सिमी ,मुजाहिदीन ,तय्यबा कोणताही संघटनेचा कार्यकर्ता किंवा प्रवक्ता नाही , त्यांच्या बद्दल सहानुभूती तयार करण्यासाठी मला हवाल्या मार्फत एकही $ आलेला नाही ...मी हिंदूच आहे आणि हिंदुत्ववादाचे समर्थन करणारच आहे ... पण चुकीच्या पद्धतीने हिंदुत्ववाद जोपासलेला आणि पसरवलेला मला आवडत नाही .. पाकिस्तान सर्वच काही योग्य करत आहे असे मी म्हणत नाही ,पाकिस्तान च्या राजकीय ,सामाजिक ,आर्थिक ,धार्मिक ,परराष्ट्रीय ,क्रीडा ,दहशतवादी भूमिकेशी मी सहमत नाही , बलुचिस्तान भागात जी जबरदस्तीने धर्मांतरे चालू आहेत त्याचा मी विरोध करतो , इस्लामाबाद मधील माशिदिबाहेरील पाण्याच्या टाकीतील पाणी हिंदूने पिले म्हणू त्याची कत्तल करण्यात आली याचा मी विरोध करतो , लव जिहाद चा मी तिरस्कार करतो , पाकिस्तान च्या कट्टर हिंदुत्ववादी धोरणाशी मी कट्टर हिंदू म्हणून असहमत आहेच , रावळपिंडी च्या पूर्वेस जे जिहादी कार्य चालू आहे त्याचे मी समर्थन कदापि करणार नाही ,, होणाऱ्या गोहत्यांचे दुक्ख मलाही आहे  हिंदुस्तानात आतंकवादी घुसवून सामाजिक,आर्थिक ,शांतता ,धार्मिक सौख्य  उधळवून  लावण्याच्या नीच कारस्थानाचा मी निषेध करतो आणि त्यासोबत या तत्वांचा हिंदुस्तानात जे मुस्लीम प्रसार आणि प्रचार करतात त्यांचाही मी विरोध करतो पण त्यासोबतच त्यांचे १००-१५० लोक मेले म्हणून आनंद साजरा करणाऱ्या माझ्या धर्माबंधुंचाही मी विरोध करतो ..... आपला लढा व्यक्तींशी आहे का विचारांशी आहे याचा विचार करावा ... कारण एक वाईट विचार १०० चांगल्या लोकांना वाईट बनवतो आणि १ चांगला विचार १०० वाईट लोकांना अधिक चांगला बनवतो ..पण हे चांगले विचार सांगायला आधी आपण चांगले असले पाहिजे ...शत्रूच्या घरी सुतक आहे  म्हणून दिवाळी साजरी करणारे काय विकास करणार देशाचा आणि धर्माचा ? नका फोफावून देऊ हि विषवल्ली , नका कलुषित करू भावना लोकांच्या कारण शेवटी माणूस हा माणूसच असतो ...जन्माला येताना जात धर्म घेऊन येत नाही आणि जाताना जात धर्म घेऊन जात नाही...हा सर्व खेळ मधल्या काही वर्षांचा ...वैचारिक मतभेद नक्की असवेत. युद्ध प्रसंगी शत्रूशी ४ हात करावेत आणि ४० हात जरूर कापावेत पण यातही धर्माने वागावे ... लोकांच्या भावना भडकवणे नेहमीच सोपे असते पण भडकलेल्या भावना आवरणे महत कठीण काम असते ....
            

2 comments: