Saturday 7 April 2012

घईंची ची घाई....

 सुभाष घई नावाचा एक लाकुडतोड्या होता ...सिमेंट च्या पंचतारांकित जंगलात राहणारा ,बाटलीतील शुद्ध पाणी पिणारा ,ए.सी .च्या निर्मळ हवेत राहणारा ,रणरणत्या उन्हात विदेशी गाडीतून फिरणारा ,सप्त तारांकित हॉटेल मधील अन्न गोड मानून खाणारा ,सौंदर्याच्या जंगलात जाऊन लोकांचे खिसे कापून ओबड धोबड लाकडे घेऊन येणारा आणि आपल्या कार्यशाळेत त्यांच्यावर पैलू पडून अप्रतिम कलाकृती निर्माण करणारा ..कार्यशाळेत तयार होणाऱ्या कलाकृतींना भलताच भाव मिळू लागला ,कार्यशाळा प्रसिद्धीच्या लाटेवर डोलू लागली ,लाकुडतोड्याच्या घरी पैशाचा पाऊस पडू लागला मग लाकुडतोड्या आपली कुऱ्हाड रुप्याची करायच्या आणि कार्यक्षेत्र विस्तारायच्या तयारीला लागला ....बिचारा अनेक वर्षे कोटीच्या कोटी रुपये घेऊन सरकारदरबारी खेटे घालू लागला आणि हजारोंच्या वाहणा झिजवू लागला ...आलेला घाम टिशू ने पुसू लागला ...अखेर एके दिवशी त्याच्या मेहेनतीला विलासी स्पर्श लागला आणि त्याचे स्वप्न पूर्ण झाले ...हा झाला कथेचा पूर्वार्ध ..१० वर्षाच्या मध्यंतरा नंतर आता उत्तरार्ध सुरु झालाय ...संमती देणारा राजा दिल्ली मध्ये गेला ,सोन्याचे मुग खाऊन  शांत बसलेल्या मंत्रिमंडळाची फेर रचना झाली ,जमिनीत पुरून ठेवलेल्या कायदा आणि नियम याची अचानक काही लोकांना आठवण झाली आणि अखेर लोकशाही ला जाग आली ..कानून के लंबे हात लाकूडतोडे के गिरेबान तक पोहोच गये ..अखेर घईंची घाई त्यांना नडली ....       
                 
                           सुभाष घई! अप्रतिम दिग्दर्शक ,कॅमेरा चा जादुगार , किमयागार ,प्रतिभावान दिग्दर्शक ...हिंदी चित्रपट सृष्टी मधील एक प्रतिष्ठित आणि कलात्मक व्यक्तिमत्व ...स्व.राज कपूर यांच्या नंतरचे खरे शो मन ...२४/०१/१९४५ साली नागपूर येथे जन्म झालेला आणि FTII पुणे मधून प्रशिक्षण घेतलेला हाडाचा दिग्दर्शक ...यांच्या दिग्दर्शनाने अक्खी पिढी गाजवली ..घई म्हणजे काहीतरी नवीन आणि हमखास यशस्वी असा पायंडा त्यांनी पाडला..एखादी संकल्पना घ्यावी , प्रसिद्ध /नवखे कलाकार घ्यावेत , कथेवर आणि संवादावर प्रचंड मेहनत करावी ,कलाकारांकडून अपेक्षित काम करवून घ्यावे आणि चित्रपट कलाकृतीमध्ये रुपांतरीत करावा तो घई यांनीच ...कालीचरण (१९७६) विश्वनाथ (७८) कर्ज (८०) क्रोधी (८१) विधाता (८२) हिरो (८३ ) मेरी जंग (१९८५ -अनिल कपूर आणि अमरीश पुरी यांनी अजरामर केलेलाR ) राम लखन (८९) सौदागर (९१ - TRAGEDY KING आणि DIALOGUE KING मधील अप्रतिम जुगलबंदी ) खलनायक (९३- केवळ संजय दत्त ) परदेस (९७) ताल (९९) अशा यशस्वी चित्रपटांची रांग लावणारा महान आणि यशस्वी दिग्दर्शक ...अर्थात त्रिमूर्ती ,किस्ना ,युवराज असे पराभवाचे धक्के यानेही पचवले आहेत पण म्हणून यांची याशास्वीतता नाकारता येत नाही ....यशस्वी होणे यात काही यश नाही ..यशस्वी व्यक्तीने यशस्वी व्यक्तिमत्व घडवणे आणि जगासमोर सादर करणे हे खरे यश आहे ..दिग्दर्शक म्हणून चित्रपट निर्मितीच्या सर्व अंगांची माहिईत असताना आपले ज्ञान सत्कारणी लागावे या हेतूने त्यांनी २००६ मध्ये व्हिसलिंग वूड्स या संस्थेची स्थापना केली ..पैसेवाल्या घरातील अनेक राष्ट्रीय -अंतर राष्ट्रीय पोरे -पोरी अंगणात बागडू लागली ,भरभक्कम दक्षिणा गुरुजीना देऊन सुखाऊ लागली ,संस्थेचा उच्च दर्जा आणि उच्च शिक्षण यामुळे अनेक ठिकाणी मानाची पदे मिरवू लागली  असे असताना स्वताची जागा घेणे अशक्य होते का ? रीना गोलन या इस्राइल मॉडेल ने dear mr.bollywood : how i fell in love with india ,bollywood and shaharukh khan  या पुस्तकात घई यांच्यावर केलेला कास्टिंग काउच चा आरोप आणि आता भूखंडाचे श्रीखंड खाण्याचा केलेला प्रयत्न यामुळे घई यांच्या बद्दल असलेला मणभर आदर कणभर निश्चितच कमी झालेला आहे ...
                           व्हिसलिंग वूड्स या संस्थेस जागा मिळावी म्हणून घई अनेक वर्षे खेटे घालत होते ..२ मुख्य मंत्र्यांनी त्यांचा प्रस्ताव नजरेआड ठेवला होता ..पण विलासराव मुख्यमंत्री झाल्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी कार्यतत्परता दाखवत वाजत गाजत फिल्म सिटी मधील  जागा दान करून टाकली ..यास विलासरावांचा दानशूरपणा म्हणायचा ,विलासिपणा म्हणायचा ,पोराच्या भविष्याची केलेली तरतूद म्हणायची ," करारातील मला काहीच माहित नवते मी केवळ सदिच्छेपोटी उपस्थित होतो " असा केलेला युक्तिवाद पोरकटपणाचा मानायचा हे ज्याचे त्याने ठरवावे ..गरिबाला राहायला जागा नाही त्यांना द्यायला सरकारकडे जमीन नाही पण श्रीमंतासाठी उघडलेली दानछत्रे जोमाने चालू आहेत याची खंत वाटते ..बर घई साहेब थेथे कोणते समाजसेवी काम करणार असते किंवा बाबा आमटे सारखे आनंदवन फुलवणार असते तर समजून घेतले असते पण पैसे छापायचा खाजगी कारखाना काढायला सवलतीमधील  सरकारी जागा कशाला ? कमीतकमी ४ लाख ते १४ लाख पर्यंत फी असताना आणि अनेक विदेशी कंपनी ची भागी असताना भ्रष्टाचार करून जागा बळकावणे आणि आता सरकारने आम्हाला फसवले ,सामान्य माणसाने सरकारशी व्यवहार करताना काळजी घ्यावी म्हणून निरागस पणाचे सोंग आणून टाहो फोडणे हे अविचारीपणाचे द्योतक आहे ..भ्रष्टाचाराची सवय लागली कि माणूस सदाचार विसरतो ..त्यात किरीट सोमैया यांनी ११/०२/२०१२ ला विलासरावांनी व्हिसलिंग ला नवी दिल्ली व हरियाणा मध्ये १०० कोटीची जमीन ५२ लाख रुपयांना दिली हा आरोप आहेच   .. पण यात राजकीय सुडाचीही शक्यता नाकारता येत नाही ...विलासरावांच्या अंतर्गत शत्रूंनी अंतर्गत हालचाली करून घई यांना खाई मध्ये लोट्ल्याची शक्यताही आहे ..कारण  न्यायाच्या इतिहासात इतका "जलद " न्याय मिळाल्याच्या घटना क्वचितच आहेत ..त्यामुळे शेखर कपूर ,शाम बेनेगल यांच्या मताशी मी सहमत आहे .. you are great film maker but there are greater film makers also why you have been chosen ? transparency should be there असे म्हणून न्यायालयाने दिलेली चपराक असो वा १४.५ एकर जमीन तत्काळ व बाकी ५.५ एकर जमीन ३१ जुलै २०१४ पर्यंत द्यायचा आदेश घई यांना हतबल करणारा आहे .. बांधकामासाठी गेलेले ५० कोटी अधिक १० वर्षांचे १०० कोटी भाडे अशा १५० कोटी मध्ये स्वताची जागा घेऊन मानाने राहता आले असते घई land is never strength of education rather education is strength of education अशी कितीही सारवासारव करत असले तरी  अखेर घईंची घाई नडली हेच खरे ...

No comments:

Post a Comment