Tuesday 10 April 2012

कस काय भांडारकर बर हाय का ? काल काय ऐकल ते खर हाय का ?


  हिंदी सिनेमा सृष्टी मध्ये काही संवाद असे असतात की ते बोलून नायक /खलनायकांना ,ऐकून अभिनेत्रींना , पाहून प्रेक्षकांना ,दिग्दर्शित करून दिग्दर्शकांना आणि लिहून लेखकांना पाठ झालेले असतात तरीही ते लिहायचा मोह त्यांना आवरत नाही ... कानून के लंबे हात असो किंवा इन्साफ का तराजू ,भगवान के लिये मुझे छोड दो असो वा तुम्हारे घर मै मा- बेहेन नही है क्या असो किंवा कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है असो या रटाळ संवादांचा जेव्हा प्रत्यक्षात उपयोग करायचा म्हंटला तर " हां मेरे घर मै मा -बेहेन है लेकीन तुम्हारे जितनी खुबसुरत नही है अगर तुम्हे ऐसेही छोड दिया तो भगवान भी बुरा मान जायेगा फिकर मत करो जानेमन जिस हात मै इन्साफ का तराजू है वो हात हम जेब मे लेकर घुमा करते है कानून के लंबे हातोंको लेकर तुम क्या दांडिया खेलोगी ? जहा तुम्हे पोहोचना है उस जगह तक यही हात तुम्हे पोहोचा सकते है ....चूप चाप बाहोमे आके ये वक़्त "मधुर "बना दे क्युंकी कुछ  पाने के लिये कुछ खोना तो पडताही है .... " (टाळ्या ? शिट्ट्या ? फेटे ? असो ....) असा संवाद मायानगरीत दाखल झालेल्या कितेक तरुणींना ऐकावे लागत असतील ...प्रस्थापित घराण्याशी संबंध नसलेल्या पण उरी प्रसिद्ध व्हायचे स्वप्न नसलेल्या सुंदर तरुणींना किती कामासक्त नजरेतून पुढे जावे लागत असेल ..इतके करूनही त्यांना संधी मिळते का ? आणि झालेल्या अन्यायाबद्दल वाचा फोडली तर त्यांना न्याय मिळतो का हे दोन्ही प्रश्न सध्या तरी अनुत्तरीत आहेत ....आणि याची उत्तरे नजीकच्या भविष्यात मिळतील अशी शक्यताही नही ...

                          तरुणी ...स्वप्नांमध्ये रमणाऱ्या ...वास्तवाला विसरून आपल्या रूपाचा हेवा वाटणाऱ्या , आजूबाजूचे " किती छान दिसतेस ग ..सिनेमात हवीस तू तर " अशा प्रतिक्रियेने हुरळून जाणाऱ्या आणि तासनतास आरशासमोर रमणाऱ्या , कोणत्या नायकासोबत मी कशी दिसेन यावर मैत्रिणींमध्ये चर्चा करणाऱ्या , घरी कसे सांगायचे म्हणून शब्दांची जुळवाजुळव करणाऱ्या ,घरचा टोकाचा विरोध स्वीकारून सौंदर्य आणि अशा या भांडवलावर मायानगरीत पळून येणाऱ्या ....स्वप्न आणि वास्तव यातील फरक काही दिवसातच समजल्या नंतर आता घरी जायची सोय नाही आणि मुंबई मध्ये राहायची जागा नाही अशा विवंचनेत सापडलेल्या आणि अलगद कोणाच्यातरी हातात पडलेल्या ...अनेक दुर्दैवी तरुणी ! मला कधीतरी संधी मिळेल म्हणून संधीसाधुना अनेक संधी देणाऱ्या आणि अखेर अपेक्षाभंग होऊन तुटणाऱ्या ...अनेक दुर्दैवी तरुणी ! अशा तरुणींवर "fashion "असा सुंदर चित्रपट काढून त्यांच्या कथा ,व्यथा ,वेदना ,कष्ट , त्यांच्या शरीराचा होणारा वापर आणि त्याचा त्यांच्या मनावर होणारा दूरगामी परिणाम प्रभावीपणे पडद्यावर दाखवून सर्वांचे कौतुक मिळवणारा आणि सिनेसृष्टी किती बरबटलेली आहे हे दाखवणाऱ्या दिग्दर्शकाचे हातच जर वासनेने बरबटले असतील तर दिसणारे एकूणच चित्र बटबटीत दिसायला लागते ...  रील लाईफ -रिअल लाईफ यात किती अंतर असते व "लोका सांगे...." याचा प्रत्यय आल्या शिवाय राहत नाही .... 
                       मधुर भांडारकर ! सध्या सिनेसृष्टी मध्ये असणाऱ्या प्रतिभावान आणि नवीन विषय चोखाळण्यात रस असलेल्या ,नाविन्याची आवड आलेल्या मोजक्या दिग्दर्शका पैकी एक ....तिकीट खिडकीवर किती जमा होतील आणि त्यातील मी किती घरी घेऊन जाईन यापेक्षा चित्रपट पाहून घरी जाताना प्रेक्षक काय घेऊन जातील याचा विचार जास्ती करणारा दिग्दर्शक ..याचा प्रत्येक चित्रपट भन्नाट असतो ...समाजाने ओढून ताणून अंगावर घेतलेला सभ्यतेचा बुरखा फाडण्यात याला भारी रस ...पण हेच हात जेव्हा एखाद्या तरुणीचे वस्त्र फेडतात तेव्हा " कस काय भांडारकर बर हाय का ?काल काय ऐकल ते खर हाय का ? " असा विचारायचा मोह आवरत नाही ...म्हणजे बहुचर्चित "पेज थ्री " अजून प्रदर्शित व्हायचा होता तेव्हा त्या चित्रपटाशी मिळती जुळती "मधुर कथा " कोठेतरी चालू होती ... आणि भविष्यात " तिसऱ्या पानावर " झळकायची तयारी चालू होती ...प्रीती जैन या तरुणीने मधुर भांडारकर १९९९-२००४ या काळात माझ्यावर चित्रपटात काम मिळवून देण्यासाठी खूप मनापासून  काम करत होता असा २००४ साली खुलासा करून खळबळ उडवून दिली आणि "न्याय " मिळवण्यासाठी "मधुर " हात सोडून " कानून " चा हात पकडला तेव्हा आणखी एक प्रकरण "तारीख पे तारीख " या संवादास आणखी भक्कम करणार हे स्पष्ट झालेच होते ...सर्वोच्च न्यायालयाने मधुर याच्या चौकशीस स्थगिती देऊन त्याला दिलासा दिला असला ( बलात्काराचा गुन्हा अजूनही कायम आहे ) तरी प्रीती जैन हि आपली प्रतिनिधी आहे असे समजून मनातल्या मनात तिला पाठींबा देणाऱ्या अनेक "पिडीत " तरुणींचा हिरेमोड झाला असणार हे निश्चित !
                      तशी हि देवाण -घेवाण सिने सृष्टी मध्ये नवी नाही ....ज्यांच्यावर आरोप होतात ते जुनेच असतात फ़क़्त आरोप करणारे चेहेरे नवीन असतात ...मग अनुपम खेर वर ममता कुलकर्णीच्या बहिणीला त्रास दिल्याचा आरोप असो, आदित्य पंचोलीवर पूजा बेदी च्या मोलकरणीवर ( बॉलीवूड च्या भाषेत "मेड " बर का ) केलेल्या बलात्काराचा आरोप असो ,जग्गू दादा वर फरान नाज हिने केलेला आरोप असो , काका राजेश वर सबिया ने केलेला आरोप असो , शाइनलेस अहुजा वर मेड ने केलेला बलात्काराचा आरोप असो , सुभाष घाई ,शाम बेनेगल यांच्यावरील आरोप असो वा "आऊ हिच्क्याऊन हिच्क्याऊन " करणारा "सब का बंधू नंदू " शक्ती कपूर चे कांड ( इलेकट्रिक मिडिया चा आवडता शब्द ) असो .... कलात्मक विश्वात वावरणाऱ्या कलाकारांच्या अनेक कला -क्रीडा सुरूच असतात ..फ़क़्त त्या समोर खूप कमी वेळा येतात ..पण जेव्हा येतात तेव्हा या लोकांबद्दलचे  जे सभ्यतेचे ,प्रसिद्धीचे ,उच्च पणाचे, प्रतिष्ठेचे चित्र आपण मनात उभे केलेले असते तिला अपेक्षाभंगाची वाळवी मात्र निश्चितच लागते .... त्यांना हे रोजचे असले तरी आपल्याला हे नवीन असते 
                      स्त्रियांचा आणि पिडीत तरुणींचा मान राखून पुढील विचार व्यक्त करतो की प्रसिद्ध होण्यासाठी प्रसिद्ध व्यक्तीवर असभ्य टीका करणे हे आताच्या काही नवोदित तरुणींनी पाडलेली निषेध करण्या योग्य परंपरा आहे ... भूतकाळात न जाता अगदी काल -परवाच्या घटना आठवल्या तर राखी -मिका प्रकरण असो ,पूनम पांडे चे उद्योग ,काश्मीरा शाह हिचे व्यक्तव्य ,वीणा मलिक चे आणि सेन चे अश्मित पटेल सोबतचे प्रकार असो किंवा बाहेर पडणारे एम .एम .एस असो अशा प्रकाराने जनमानसात " अरे हे काय रोजचेच आहे ...लाज असते का यांना काही ?" अशी भूमिका तयार होते आणि काही उथळ विचारांच्या नटव्या पोरींमुळे ज्यांना खरच गरज आहे त्यांना सहानुभूती मिळत नाही ...हे त्यांचे दुर्दैव ... जैन हिने "माझिया मधुर ला प्रीती कळेना /आठवेना " म्हणून कितीही टाहो फोडला तरी तिला न्याय मिळेल का नाही ,मधुर दोषी आहे का नाही याचा निर्णय घेण्यास न्याय व्यवस्था सक्षम आहे ..जरी तो दोषी असला तरी तो बाहेरच राहणार आणि निर्दोष असला तरी तो बाहेरच राहणार कारण "जेल " फ़क़्त दिग्दर्शित करण्यासाठी असते "राहण्यासाठी " नसते हे काही वेगळे सांगायला हवे का ? पण या साऱ्या प्रकरणामुळे मधुर च्या कारकीर्दीस डाग लागला आहे हे निश्चित आणि हा डाग "अच्छा " नाही हे अधोरेखित ..." काल म्हणे तुम्ही हिथ तिथ  गेला बघता बघता घोटाळा झाला ...काय झाल पुढ सांगा तरी थोड खाली नका बघू आता लाजताय का ? काल काय आईकल ते खर हाय का ? कस काय भांडारकर बर हाय का ? काल काय ऐकल ते खर हाय का ?........

No comments:

Post a Comment