असाच कोणता एक पुण्यातील रविवार .... वेळ असेल साधारण रात्री ९.३० ची .... जे .एम . रस्त्यावर गप्पा मारत आईस्क्रीम चा आस्वाद घेत उभा होतो ... समोरील रस्त्यावरून वाहणारी तरुणाई पहात होतो आणि गर्दीत कोणी लक्षवेधी दिसले तर नजरेने टिपत होतो ..गप्पांचा ओघ , आईस्क्रीम ची चव आणि लक्षवेधी दिसण्याची सरासरी परमोच्च बिंदूवर असताना रस्त्यावर नेहमीप्रमाणे बेशिस्तीने लावलेल्या गाड्यातून वाट काढत एक साधारण १० -12 वर्षाचा मुलगा माझ्याजवळ आला . कोपराला अलगद स्पर्श करून चेहेऱ्यावरचे दीनवाणे भाव , डोळ्यात लाचारीने किंवा सवईने आलेले पाणी दाखवत खोल आवाजात म्हणाला " दादा खायाला " ....हा माझा भाऊ ?? कोण लागून गेला हा माझा ? काम करायला नको नुसते हात पसरायला हवेत आणि म्हणे खायाला ... मला काय पैसे वर आले आहेत का वाटायला ? प्रत्येक चौकात २-४ भेटतात, प्रत्येकाला वाटत बसलो तर माझ्यावर पण अशीच वेळ येईल "साहेब खायाला " त्यावेळी मला कोणी देणार आहेका ?? शी ....मी अन असा ?? अरेरे ...विचार डिलीट .. ! असे सामान्य माणसांप्रमाणे अनेक भावनांचे तरंग माझ्या तात्पुरत्या असंवेदनशील मनावर उमटून गेले आणि तोंडातून बाण बाहेर पडावेत तसे शब्द बाहेर पडले " मार खाशील पुढे जा ... " कदाचित "खाशील " या शब्दात त्याला कोण आशावाद दिसला असावा म्हणून डोळ्यातून पाणी आणून ,दोऱ्याने बांधलेली चड्डी एका हातानी पुन्हा जागेवर नेऊन म्हणाला " दादा खायाला ..... " त्याची पावले पुढे पडत होती पण एकसारखा तो मग वळून पहात होता जणू त्याची नजर आता बोलायला लागली होती " दादा खायाला .... "
सुलभा : पुरुषा राजन सततं प्रियवादिन :! अप्रियस्य तु पथ्यस्य वक्ता श्रोता च दुर्लभ:!!
Sunday, 21 October 2012
Saturday, 13 October 2012
फेसबुक दुखरी बाजू .....

Sunday, 7 October 2012
चीप बॉस
तुमचा स्वभाव तापट आहे ? लहान सहान कारणावरून तुम्ही आदळा आपट करू शकता ? २४ x ७ तुम्ही कोणाचे "बौद्धिक " घेऊ शकता ? तुमचा काही "काळा" भूतकाळ आहे ? तुमच्या एकांतातील कोणता एम .एम .एस फुटला आहे ? बाकी डोके शून्य असले तरी दिसायला तुम्ही सुंदर आहात ?? स्विमिंग पूल मध्ये "जलक्रीडा " करायची तुमची तयारी आहे ? सर्व जगासमोर अंगाला "क्रीम " कसे लावायचे याचे प्रात्यक्षिक दाखवू शकता ? भांडी घासणे -घरातली कामे करणे याचे नाटक तुम्ही करू शकता ? २४ तास तुमच्यावर केमेरा रोखला आहे हे सहन करू शकता ? जेथे केमेरा पोहोचत नाही तेथे ज्या कारणासाठी आपण (कु)प्रसिद्ध आहोत अशा लीला करण्याचे चातुर्य अंगी आहे ? अधूनमधून उगाचच भावनांचे उमाळे काढत रडायची सवय आहे ? ??? हो ?? तर वेळ दडवू नका .... बिग बॉस तुमचीच वाट पहात आहे ....
Subscribe to:
Posts (Atom)