Saturday 8 June 2013

गिव मी सम सनशाईन .....

" Life is race if you don't run fast , you will be like broken anda "  असे म्हणत अनेक विरु सहस्रबुद्धे १० वी , १२वी  मध्ये कमी गुण मिळालेल्या राजू रस्तोगी , फरहान वर बरसत असतील . पाऊस बरसायच्या काळात आपला बाप का बरसतोय ? कसेबसे गणित सोडवले . . आता आई आपला bank balance किती त्यातील आधीचे कर्ज , मोठ्या -भाऊ बहिण यांचे लग्न , तुझ्या शिक्षणाचा वाढीव खर्च करून आमच्या म्हातारपणात आमच्या हाती काय असा ' ड ' गटातला प्रश्न घालून का घाबरवते ?? निकाल लागल्यापासून आई -बाबा म्हणतात ' नाक कापलं कार्ट्यान "  त्यांचे नाक तर जागेवरच आहे मग ते अस का म्हणतात ? ताई पण माझ्याशी नीट बोलत नाही . . कारण काय म्हणे मी तिचा अपेक्षाभंग केला . . माझ्या आवडीच्या अ ब क कॉलेज मध्ये मला जायचय . . काका म्हणाला तुझी लायकी नाही . बाबा म्हणाले डोनेशन भरायची माझी लायकी नाही . काय चुकलो मी ? ८५ % गुण कमी आहेत का ? सगळ्यांना माझ्यामुळे त्रास होतो . . मी इतरासारखा माझ्या घराला आनंद देऊ शकत नाही . . मीच नालायक आहे . . काय करू मी ?? 

                       असा भला मोठा प्रश्न घेऊन १० -१२ मधील ' फालतू ' कार्टी कोलेज चे उंबरे झीझवत आहेत . आर्ट्सला तरी मिळेल का पहिल्या यादीत प्रवेश असा टोमणा सहन करत विज्ञान कॉलेजचे हेलपाटे मारत आहेत . काय चूक यांची ? घरी घर बोलते आणि बाहेर एकतर मार्क बोलतात नाहीतर पैसा . . माझ्याशी कोणीच बोलत नाही . मार्क कमी का पडले इथपासून आपण काय काय केले या सर्वांची उजळणी होते . आपल्या कामवाल्या बाईच्या पोराला पण तुझ्यापेक्षा फक्त २ - ४ % कमी मार्क पडले हे ' वास्तव दर्शन ' फुकटात करून दिले जाते . पण हे सगळे ऐकत असताना मुलाच्या -मुलीच्या मनात किती अपराधीपणाची भावना निर्माण होईल याची साधी दखल सुद्धा घेतली जात नाही . पाल्य काय सांगतय यापेक्षा पालक म्हणून ग्रुप , सोसायटी ,क्लब मध्ये काय सांगायच याची चिंता जास्ती असते . कारण आपण समाजात राहतो . या सगळ्या दुष्टचक्रात खमके पोरगे असेल तर ते बंडखोर बनते , जन्मतःच शांत असेल तर ते reserved   होते आणि reserved  असेल आत्महत्या करून मोकळे होते .  पण ती आत्महत्या असते का हत्या यावर कधीच विचार होत नाही . . . कारण कमकुवत पिलाला प्राणी स्वताहून मारतात . . अमी आमच्या बाळाला १६ वर्ष सांभाळले . . " कौतुकच ' नाही का ? या मुलांचे विश्व फारच मर्यादित असते . . त्यांना जगाला काही दाखवायचे नसते.  त्यांना केवळ आई वडिलांना दाखवायचे असते . साधारण १ २ वि च्या पुढे जग आणि स्पर्धा काय असते ते समजते आणि अपोआप थोडा शहाणपणा आणि शिंगे फुटू लागतात . पण १० वी चे काय ? अनेकांना समज असते पण समजत नसते . बाकीच्यांना समजत असते पण उमजत नसते .  
                          मार्क किती पडावेत याला काही मर्यादाच नाहीत . स्पर्धा आणि चढाओढ मी शाळेत असताना होतीच पण ती इतकी तीव्र कधीच नवती . आता ९० -९५ % मार्क सुद्धा कमी वाटतात आणि पुरवठी पडत नाहीत . कट ऑफ बघितले कि खरच ऑफ व्हायला होत . आणि ९ ५ % च्या वरील मुलांची यादी पाहिली कि शट डाऊन . या पोरांकडे पाहिलं की त्यांची तुलना सचिन तेंडूलकरशी करायचा मोह होतो . प्रत्येक सामन्यात शतक ठोकलेच पाहिजे हि सक्ती , ८० - ९० धावा जरी केल्या तरी तो अपयशी . स्पर्धा हा आयुष्याचा अटळ भाग असला तरी त्यास किती महत्व द्यायचे हे आपल्या हाती असते . प्रत्येक पालकास वाटते कि आपल्या पाल्याने चांगल्या महाविद्यालयात जावे . नैसर्गिक भावना . पण तसे करण्यात अपयश आले तर १० वि च्या निकालापर्यंत असलेले प्रेम अचानक कसे आटते ? परीक्षेचा निकाल आयुष्याचा निकाल कसा लाऊ शकतो ? यावर विचार व्हायला हवा . . कारण परीक्षा संधी देत असतात पण नात्यातील तणाव नात्याची परीक्षा घेत असतो .' अपयश ही यशाची पहिली पायरी आहे ' हे सांगायला जितके  सोपे तितकेच स्वीकारायला कठीण . प्रत्येक पालकाला "ती '' पायरी टाळायचीच आहे .  सर्वच प्रचंड बुद्धिमान नसतात . असूच नयेत . पाठोपाठची भावंडे सुद्धा हुशार असलीच पाहिजेत अशी सक्ती सुद्धा नसावी . माझा अनुभव आहे . वरील बहिणी हुशार असूनही मी ' तितकासा ' हुशार न्हवतो . कारण माझ्या लेखी गुणापेक्षा गुणांना महत्व होते . आहे . ज्यांचा मार्कांवर विश्वास होता त्यांनी माझ्याशी बोलणे कमी केले . चेष्टा करायचे … करतात.  पण मी स्थिर आहे . कारण मला घरातून नेहमीच पाठबळ मिळाले . कधीमधी मार्कलिस्ट वर कमी दिसणाऱ्या मार्कांनी मला घरापासून तोडले नाही . उलट घराच्या जवळ आणले .
                            http://www.youtube.com/watch?v=t-SVBlZRb
याच आणि अशाच पाठिंब्याची अनेक मुलांना -मुलीना आज गरज आहे . तुम्हाला वाटत असो वा नसो त्यांच्याही मनात न्यूनगंड असतो . शाळेतल्या ग्रुप मधून कमी गुणांमुळे मी बाजूला फेकला जाईन का याची भीती असते . पुढे काय शिकायचे याचे आडाखे त्यांच्याही मनात तयार असतात . मार्क कमी का पडले याची करणेही त्यांच्याकडे असतात . गरज असते ती शांतपणे ऐकण्याची . गिव मी सम सन शाईन हे त्यांचे गाणे आईकण्याची . मुलगा -मुलगी कमी पडते तेव्हा मार्कलिस्ट वर मार्क कमी पडतात पण पालक कमी पडतात तेव्हा वृत्तपत्रात पाल्याच्या आत्महत्येची बातमी लिहायला जागा कमी पडते . सर्व दोष केवळ पालकांचा नाही मुलांचा पण नाही …. तो आहे आपल्या शिक्षण व्यवस्थेचा . मार्क किंवा पैसा यावर चालणारी शिक्षण व्यवस्था आणि ती चालवणारे शिक्षण सम्राट 'गुण ' बघतच नाहीत . हे प्रकार उत्तरोत्तर वाढतच जाणार . . विद्यार्थ्यांना समग्र  शिक्षणापासून , पालकांना मुलांपासून आणि मुलांना त्यांच्या हक्काच्या बालपणापासून दूर नेतच  राहणार . . अपयश पुसून टाकण्यासाठी एक चान्स मागणाऱ्या पाल्याला " बेटा कबिल बनो कामयाबी झक मारके पीछे भागेगी ' असा विश्वास द्यायचा का ' आय क्विट ' लिहायला भाग पडायचे हा निर्णय आपलाच . . 

1 comment:

  1. लेख छान आहे…. आजची सत्य परिस्थिती सांगणारा आहे …. आई वडिलांचा support असेल तर मुलांवर दडपण येत नाही ..... आणि दडपण नसेल तर मुलं सुद्धा कमी मार्क मिळाले तरी आपला आयुष्य थांबवत नाहीत ..... त्यांना सुद्धा आपली वाट सापडतेच आणि ते हि आयुष्यात यशस्वी होतातच!

    ReplyDelete