Monday 27 February 2012

पराभव संघाचा का संघाच्या मानसिकतेचा ?




भारत हा अनेक धर्माने ,धर्मीय लोकांनी आणि परंपरांनी नटलेला देश आहे ..शतकानुशतके त्या परंपरांचे पालन केल्याने एक वैचारिक आणि धार्मिक बैठक समाजातील मोठ्या वर्गाची तयार होते आणि ती येणाऱ्या पिढ्यांमध्ये संक्रमित होत असते...भारतीय परंपरेमध्ये उगवत्या सूर्यास अर्घ्य देण्यास अमूल्य साधारण महत्व आहे ..सूर्याची ,तेजाची ,पराक्रमाची उपासना करणारे लोक तोच सूर्य मावळतीला लागला कि त्याच्याकडे पहायचे  कष्ट  सुद्धा घेत नाहीत चंद्राच्या शीतलते मध्ये रमून जातात ....सूर्यास ना याची तमा असते ना काळजी कारण उद्या सकाळी हेच लोक पळी -ताम्हण घेऊन आपला जयजयकार करणार आहेत याची त्याला खात्री असते !! सध्या भारतीय संघात असेच चालू आहे ... गेली अनेक वर्षे सूर्याप्रमाणे तळपणारी सिनिअर खेळाडूंची कारकीर्द आता उतरणीला लागली आहे ...ज्याप्रमाणे माणूस सूर्य मावळला कि चंद्राच्या चांदण्यात आणि दिव्याच्या उजेडात सर्व महत्वाची कामे उरकून घेऊ अशा मिथ्या मिजासीत वावरत असतो तसेच भारतीय कप्तानाचे आणि निवड समितीचे झालेले आहे ... त्यामुळे होणारे पराभव हे संघाचे आहेत का संघाच्या पराभूत मानसिकतेचे आहेत यावर विचार निश्चितपणे केला पाहिजे....
                        भारतीय संघाला "संघ" म्हणून कधी ओळखले गेलेच नाही.... भारतीय संघाचे यश -अपयश नेहमीच वैयक्तिक किंवा एकट्या दुकट्याच्या कामगिरीवर दोलायमान राहिले आहे ...भारतीय जनतेची पण तीच मानसिकता असते कि संघ हरला तरी चालेल पण सचिन चे महाशतक झाले पाहिजे ...म्हणूनच भारतीय संघ किती सामन्यात संघ म्हणून खेळला यावर बारकाईने विचार केला तर प्रदीर्घकाळ क्रिकेट खेळून फ़क़्त २ विश्वचषक का जिंकले आणि एप्रिल २०११ मध्ये विश्वविजेते झाल्यानंतर एका वर्षाच्या आत तो करिष्मा का संपला याचे उत्तर निश्चित सापडेल...प्रत्येक संघाची आणि तो संघ ज्या जनतेतून तयार होत असतो त्या जनतेची एक मानसिकता असते ..भारतीय संघात ऑस्ट्रेलिअन संघाची  "व्यावसायिकता " , पाकिस्तानी संघाची "कट्टरता" ,दक्षिण आफ्रिका संघाची "जिद्द " कधीच न्हवती आणि ती आजही नाही..... भारतीय संघ हा फ़क़्त ३-४ खेळाडूंनी तयार होत असतो इतर सर्व "नियम " आहे म्हणून संघात असतात याच कारणाने जेवा "ते ३-४ खेळाडू " अपयशी होतात तेवा "संघ " अपयशी झाला असे मानण्यात येते ...हीच अपयशी संघाची अपयशी मानसिकता असते.. संघ जर पराभूत झाला असेल तर तो पुढच्या सामन्यात विजयी होऊ शकतो पण संघाची मानसिकता पराभूत झाली तर  त्यातूनच पराभवाची मालिका गुंफली जाते....
                        कोणत्याही संघाचे किंवा खेळाडूचे यश/अपयश हे "सांघिक " वातावरणावर अवलंबून असते ..कारण "एकाग्रता " हा एकच गुण असा असतो जो विजयी संघ आणि पराभूत संघ यात अंतर पडत असतो..सर गारफिल्ड सोबर्स एका ठिकाणी म्हणतात "Concentration’s like a shower. You don’t turn it on until you want to bathe… You don’t walk out of the shower and leave it running. You turn it off, you turn it on… It has to be fresh and ready when you need it." सध्या भारतीय संघात जे वातावरण आहे त्यातून एकाग्रता सध्या करणे  म्हणजे  झिम्बाम्ब्वे  संघाने विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात  ऑस्ट्रेलिया ला  १० गडी राखून हरवण्या इतके अशक्य आहे ... संघ पराभूत झाला कि अपयशाचे खापर कोणावर फोडायचे याच्या गडबडीने काही विधाने केली जातात आणि संघाचा समतोल बिघडतो...आणि हे प्रत्येक संघाच्या बाबतीतच होत असते ..रोज येणारी एक नवीन बातमी, माजी खेळाडूंच्या रोजगारीचा प्रश्न असल्याने त्यांनी केलेला वाचाळपणा ,प्रसारमाध्यमांचा आततायी पणा, कर्णधाराचा हट्टीपणा आणि नियामक मंडळाची  धर सोड  पणा यामुळे संघातील प्रत्येक  जणएकमेकाकडे संशयाने पाहू लागतो अशा मानसिकतेमध्ये संघ जिंकणार कसा ??
                   सिनिअर खेळाडू हे कधीतरी निवृत्त होणारच आहेत...त्यांच्या शरीराला आणि आपल्या अपेक्षेला काही मर्यादा आहेत ..मैदानावरील हालचाल व्यवस्थित होत असताना, तरुणानाही लाजवेल असा फिटनेस असताना ,रुनिंग बिटवीन विकेट उत्तम असताना फ़क़्त धावा होत नाहीत  आणि काही खेळाडू आहेत जे अजून स्वताला सिद्ध करू शकले नाहीत यांच्या जीवावर  निवृत्ती घ्यायला भाग पाडणे हा "पोरकटपणा " आहे ...कोणी गोलंदाजच न्हवता म्हणून जवागल श्रीनाथ ला किती वर्ष खेळवले याचे स्मरण भारतीय नियामक मंडळाला असेलच....ज्या तरुणांच्या साठी सिनिअर खेळाडूना सन्यास घेण्यास भाग पडले जात आहे त्यांचे भविष्य तरी नक्की कोठे आहे ? गाजावाजा करत आलेले ,भारतीय क्रिकेट चे भविष्य म्हणून नावाजलेले ,तरुण रक्त म्हणून डोक्यावर बसवलेले "मोहोम्मद कैफ ,शिखर धवन,रोबिन उत्थापा,अभिषेक नायर ,रोमेश पवार,लक्ष्मिपति बालाजी ,युसुफ पठाण इत्यादी " यांनी शेवटचा सामना कधी खेळला होता हे थोडे डोक्याल ताण देऊन आठवा...हे आहे भारताचे भविष्य ? अगदी खेळत असलेल्या संघातील रैना .शर्मा यांची कामगिरी दृष्ट लागण्याजोगी निश्चितच नाही ..इंग्लंड दौऱ्यात पराभवाचे कारण " जखमी खेळाडूंमुळे सर्वोत्तम संघ मिळाला नाही हे दिले " आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यात "सिनिअर खेळाडूंचे " दिले जातंय ..पण  पराभवाचे खरे कारण आहे ती खेळाडूंची पराभूत मानसिकता ...ती जोपर्यंत विजयपथावर येत नाही तोपर्यंत संघ पराभवाच्या खोल डोहात गटांगळ्या खातच राहणार हे सांगायला कोण्या ज्योतिषाची गरज निश्चितच नाही....

No comments:

Post a Comment