Tuesday 28 February 2012

श्रीखंडाची गोळी !!

श्रीखंडाची गोळी  !!

डोळे बघू डोळे, आई कोठे आहे आई,दात  बघू दात,भूभू कुठाय भूभू ....भोलानाथ  म्हण भोलानाथ ....शिवाजी महाराज करून दाखव...रामरक्षा म्हण..२ X ४ किती ?...वाचून  दाखव , गाऊन दाखव ,हसून दाखव ,चिडवून दाखव ,इनजेक्शन घे  पासून ,दात पाडून  घे ,पर्यंत काहीही करून   घायचा म्हंटला कि आमिष एकच.. " श्रीखंडाची गोळी"....शहाण्या मुलाने शहाण्या सारख वागाव आणि आगाऊ मुलानेही  शहाणे पणाचा आव आणावा,खुदखुदणार्या ने हसावे आणि भोकाड पसरलेल्या ने खुद खुदावे,शांत बसलेल्याने दंगा करावा आणि कडमडी कार्ट्याने शांत बसावे ,पाहुण्यासमोर मोठ्या सारखे वागावे अन आजी आजोबांनी कोठे गेला होता ?विचरले कि लहान मुलासारखे गबाळ्या सारखे हसावे  हे सर्व साध्य करणारी "श्रीखंडाची गोळी "

               पिवळ्या आंबा रंगाची ,५० पैशाच्या नाण्याच्या आकाराची जिभेवर ठेवल्यावर विरघळणार्या गोळीने काय काय करून घेतलाय कोण जाणे...या गोळीत नक्की काय आकर्षण होते हे अजूनही मला समजले नाही ...अगदी 7VI मध्ये जाई पर्यंत हे आकर्षण कायम होते ..१ रुपयाला १२ मिळायच्या..साधन घर असूनही लागतो कशाला पैसा इतक्या लहान  वयात अशी  विचारसरणी असल्याने कधी मधी थोडे पैसे मिळाले आणि खिसाभर गोळ्या घेतल्या कि जग जिंकल्याचा आनंद व्हायचा..गुलाबजामून  मधला गुलाब आणि  श्रीखंडाच्या ग्गोली मधले  श्रीखंड हुडकण्याची जिज्ञासा होतीच कोठे ? होता तो  केवाल गोळी साठीचा वेडेपणा...काही   चांगले केले कि  हमखास मोठे गोळी  हातावर ठेवणार याची खात्री असल्याने लहान वयात मोठ्यासारख वागायचा खटाटोप अठावला कि हसू येते पण आता त्याच गोळी  साठी प्रयत्न करूनही निरागसपणे वागता येत  नाही याचे वाईट पण वाटते ...
                 वय वाढले ,विश्व मोठे झाले ,समज आली हातात ४ पैसे खेळू लागले त्यामुळे बरणीत ठेवलेली ,आकर्षक वेष्टन नसलेली ,ब्रांड नसलेली गोळी नकोशी वाटू लागली...आजीनेही मेलोडी स्वीकारली ...माझ्या भाच्याला खुश करायला मेलोडी पण पूरत  नाही...त्याला हॉट व्हील लागते...माझ्या मुला मुलीला काय लागेल देव जाणे पण मनात कोरली गेली आहे ती....श्रीखंडाची गोळी !! 

1 comment:

  1. खरच...मला पारलेच्या चॉकलेटची आठवण झाली...25 पैशात चार...

    ReplyDelete