Saturday 14 July 2012

राष्ट्रपती निवडणूक ....सब घोडे सब घोडे बारा टक्के!



                 राजकारण आणि क्रिकेट या दोन्ही प्रकारात टायमिंग ला अनन्यसाधारण महत्व असते ...खेळाडू कितीही मातब्बर असला आणि त्याचे टायमिंग "अचूक " नसेल तर त्याचे कौशल्य असून नसल्यासारखे असते ...त्यातल्यात्यात काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधित्व करताना तर टायमिंग या कौशल्यास अधिकच मोल येते ..कारण नेते जे 
सार्वजनिक  रित्या बोलतील त्याच्या बरोबर विरुद्ध वागून त्याच्या महत्वकांक्षेचे पंख कापायची पक्षाची परंपराच आहे ..हे सर्व जाणून ज्यावेळी राष्ट्रपती निवडणुकीचा विषय "बोर्डावर " आलाही न्हवता अशा वेळी "मला मोघल गार्डन च्या हिरवळीवर चालायला आवडेल " अशा आशयाचे विधान करून आपल्या मनातील महत्वकांक्षा उघड केली होती ...प्रणव यांच्या महत्वकांक्षेचे पंख कापणे कॉंग्रेस ला परवडण्या सारखे न्हवते कारण मनमोहन जरी पंतप्रधान  असले तरी चिदंबरम यांच्याशी पंगा घेत कॉंग्रेस समोरचे सर्व प्रश्न प्रामाणिकपणाने सोडवत "संकटमोचक " अशी आपली ठाम भूमिका निर्माण करण्यात प्रणव मुखर्जी यांनी यश मिळवले होते ... त्या पाठोपाठ आपण या पुढची लोकसभा निवडणूक लढवणार नसून या टर्म नंतर राजकीय सन्यास घेणार असल्याचे जाहीर करून कॉंग्रेस नेतृत्वाला आपल्या महत्वाकांक्षेची दखल घ्यायला भाग पडले .. कॉंग्रेस पक्षानेही त्यांच्या साडेचार दशकाच्या कारकिर्दीची "जाण" ठेऊन त्यांची उमेदवारी निश्चित केली आणि सुरु झाले लोकशाहीस काळिमा फासणाऱ्या घटनांचे सत्र ....
                 दिल्लीच्या रायसीना हिल्सवरील चार हजार एकर जागेवर ,दोन लाख चौरस फुटांच्या बांधकामातून चार मजले आणि ३४० खोल्यांचे अतिविस्तीर्ण असे राष्ट्रपती भवन साकारले गेले. १९३१ मध्ये राष्टपती भवन कोलकाता मधून  दिल्ली मध्ये आल्यावर २०१२ मध्ये ममता मुळे ते पुन्हा कोलकाता कडे जाते की काय अशी शंका निर्माण झाली होती असो ...राष्ट्रपती पद हे देशाचे सर्वोच्च पद असते ...त्या पदावरील माणूस हि देशाची शान असते परंतु हे पद निवडण्याचा सामान्य माणसाचा हक्क काढून घेऊन घटनेने काय मिळवले हे समजत नाही ... यामुळे राष्टपती पदाच्या निवडणुकीतही ग्रामपंचायत निवडणुकी सारखा घोडेबाजार चालतो आणि या प्रकारामुळे घटनेवरचे , संसदेच्या पवित्र्यावारचे ,लोकशाही वरचे प्रेम /आदर उडू लागतो ..आणि हाती येते ती फ़क़्त हतबलता ..मला नेहमीच आश्चर्य वाटते की जगातील क्रमांक २ ची लोकसंख्या असलेल्या भारत देशात वर्षानुवर्षे भारतरत्न साठी एकही "लायकीचा " उमेदवार यांना सापडत नाही आणि कमी म्हणून की काय राष्ट्रपती पदासाठी सर्वमान्य उमेदवार किंवा त्याच्या विरोधातील तुल्यबळ उमेदवार विरोधकांना सापडू नये ? म्हणजे ऑलिम्पिक मध्ये पेस सोबत विष्णूवर्धन नावाचा खेळाडू खेळतो आहे समजल्यावर सामान्य लोकांनी विकिपीडिया उघडला तसाच एन .डी.ए .चा पी .ए .संगमा उमेदवार आहे म्हंटल्यावर बहुतेक सर्वानीच विकिपीडिया उघडला असणार ... विरोधासाठी विरोध करत असताना आपली पत किती खालावून घायची याचा विसर जगाला नैतिकतेचा धडा शिकवणाऱ्या भारतीय जनता पक्ष आणि ममता यांना पडला आणि लोकशाहीची विटंबना करण्यास यथाशक्ती हातभार लाऊन  आपल्या कार्यपूर्तीचा आनंद साजरा केला ...
                        ज्या राष्ट्रपती निवडणुकीसाठी इतके हीन राजकारण केले जात आहे त्या राष्ट्रपती पदाचे नक्की हक्क काय आणि त्या व्यक्तीचे अस्तित्व काय याचा विचार न केलेलाच बरा...राष्ट्रपतीचे अधिकार म्हणून " सर्वात मोठय़ा पक्षाला सरकार स्थापनेचे आमंत्रण,राष्ट्रपती फाशीची शिक्षा माफ करू शकतात,राष्ट्रपती लष्कराच्या तिन्ही सर्वोच्च् दलांचे प्रमुख आहेत,राष्ट्रपती न्यायपालिकेचे सर्वोच्च् अधिकारी आहेत,देशाचा प्रत्येक कायदा राष्ट्रपतींच्या सहमतीनंतर बनतो,राष्ट्रपती राज्य सरकारला बरखास्त करू शकतात " या विशेष हक्कांचा बागुलबुवा करून राष्ट्रपती पदास विनाकारण वलय देण्यात येते परंतु वस्तुस्थिती अशी आहे की राष्ट्रपती हा संसदेच्या आणि पंतप्रधानाच्या हातातील बाहुले असतो ..कारण त्यास स्व मताने कोणताही निर्णय घेण्याचा हक्क नसतो ..अधिकार नसतो ..त्यामुळे मिळालेली ५ वर्ष परदेशी दौरे करावेत ,सुखोई विमानातून भ्रमण करावे ( व्ही .के .सिंग प्रकरणात लष्करप्रमुख म्हणून पाटील काही बोलल्याचे स्मरते का ?) ,फाशीची शिक्षा माफ करून पदरी पुण्य पाडून घ्यावे ( पाटील यांचा या बाबतीत विक्रम आहे २३ फाशी माफ ) ,१५ आणि २६ तारखेला सरकारच्या प्रवक्त्या सारखे सर्व उत्तम कसे चालू आहे याची कबुली द्यावी ,  एखादा बंगला पदरी पाडून तह हयात व नंतर त्यांच्या वारसांनी "माजी राष्टपती " हे बिरूद मिरवावे ....हेच काय ते राष्टपती पदाचे आणि त्या पदावरील व्यक्तीचे कर्तुत्व .... हे असताना अचानक राष्टपती पदास इतके महत्व का यावे ? तर २०१४ सालच्या निवडणुका ....सध्याची राजकीय स्थिती पाहता २०१४ साली कोणत्याही पक्षास "स्पष्ट " बहुमत मिळेल अशी सुतराम शक्यता नाही .. त्यामुळे ज्या पक्षाकडे सर्वात जास्ती खासदारांचा पाठींबा आहे त्यास सत्ता स्थापनेस आमंत्रण द्यायचा अधिकार राष्ट्रपतीस आहे ...याच कारणावरून हि निवडणूक द्वेषाने लढवली जात आहे ...
                 राष्ट्रपती पदास किती महत्व आहे ,तो कार्य काय करतो ,सामाजिक प्रश्नावर किती भाष्य करतो ,सामान्य लोकांच्या समस्यांवर किती संवेदनशील असतो ,दुष्काळाने होरपळणाऱ्या जनतेची किती आत्मीयतेने चौकशी करतो ,लष्करप्रमुख म्हणून दहशतवादावर काय भूमिका घेतो , देशातील वाढते कुपोषण ,खालावत चाललेलं जीवनमान ,वाढत चाललेला भ्रष्टाचार त्यातील राजकीय नेत्यांचा सहभाग यावर काय भाष्य करतो हे प्रश्न निगरगट्ट पणाने विसरायचे म्हंटले तरी राष्ट्रपती पद हे सामान्य जनतेच्या दृष्टीने आदराचे पद असते त्याच्या निवडणुकीत चालू असलेला हीन प्रकार पाहून मन नक्कीच व्यथित होते ... हि निवडणूक नक्की राष्ट्रपती पदाची चालू आहे कि ग्रामपंचायत /दुध संघ /साखर कारखान्याची चालू आहे असा चीड येणारा प्रश्न मनास सतावू लागतो ... पण हे देखील वास्तव आहे की निवडणूक सभापती ची असो वा राष्ट्रपती पदाची ....

 गोड गोड जुन्या थापा; जुन्या आशा नवा चंग| 
जुनी स्वप्नेनवा भंग| तुम्ही तरी करणार कायआम्ही तरी करणार काय| त्याच त्याच खड्डया मध्ये; पुन्हा पुन्हा तोच पाय| जुना माल नवे शिक्के; सब घोडे बारा टक्के||

  
जिकडे सत्ता तिकडे पोळीजिकडे टक्के तिकडे टोळी| ज्याचा पैसा त्याची सत्ता पुन्हा पुन्हा हाच कित्ता| पुन्हा पुन्हा जुनाच स्वारमंद घोडा अंध स्वार| यांच्या लाथा त्यांचे बुक्केसब घोडे बारा टक्के||
  
 सब घोडेचंदी कमीकोण देईल त्याची हमी? डोक्यावरती छप्पर तरी; कोण देईल माझा हरी? कोणी तरी देईन म्हणामीच फसविन माझ्या मना
  
भुकेपेक्षा भ्रम बरा; कोण खोटा कोण खरा? कोणी तिर्या कोणी छक्के, सब घोडे बारा टक्के! 

No comments:

Post a Comment