Friday 23 November 2012

कासाबची फाशी , फेसबुक आणि आपण ..

२६/११ दहशतवादी हल्ल्यातील एकमेव जिवंत अतिरेकी अजमल कसाब याच्या फाशी  नंतर देशात (बऱ्याच  वर्षांनी ) आनंदाची लाट पसरली .प्रतिक्रिया घेण्यास आणि त्या "सबसे तेज " प्रसारित करण्यात प्रसारमाध्यमांची गडबड सुरु झाली .  संबंधित त ज्ञ मंडळी पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली  सामान्य माणूस मात्र हातचा रिमोट जोरजोरात  दाबत  कधी हा चेनेल ( वृत्तवाहिनी)  तर कधी तो पाहत "एक पाऊल पुढे " राहण्याचा प्रयत्न करत होता . रिमोटला जीव असता तर माणसाच्या उत्सुकतेची किंमत मोजता मोजता तो नक्कीच "शहीद " झाला असता . असो ! पण........ जो  कसाब करकरे ,कामटे ,साळसकर यांसारख्या नरवीरांच्या तसेच माझ्यासारख्या  अनेक सामान्य माणसांच्या मृत्यूस जबाबदार होता ,त्यास फाशी झाल्यावर मी बोलायचे नाही ? मी नुसते वृत्तपत्र -वाहिन्या पहात माझा वेळ घालवायचा ? माझी मते ,माझा आनंद ,माझा कसाब -पाकिस्तान बद्दलचा राग कोठे बोलायचा ? वृत्तपत्र माझे "जहाल " विचार छापतील का ? अनेक प्रश्न अनेक भावना पण व्यक्त करायच्या कोठे ?? माझे "ठाम " मत सर्वाना कसे सांगायचे ...शे बुवा .... आम आदमी को आम का भाव भी नही मिलता ... :(  उदास "फेस " वर अचानक आनंदाचे भाव प्रकटतात ,डोक्यातील राग  बोटांकडे वळू लागतो आणि " बोटे चालती फेसबुक ची वाट " ......

                                 फेसबुक हे आता केवळ करमणुकीचे साधन राहिले नसून व्यक्त होण्याचे माध्यम बनले आहे . काही  अतिरेकी आणि अविवेकी मते सोडली तर अनेक प्रसारमाध्यमे मिरवत असलेले "निर्भीड " हे बिरूद नक्की काय असते ते फेसबुकवर पाहायला मिळते . "मी -माझा " या संकुचित विचारसरणीचे  " मी -माझे व्यासपीठ " असे फेसबुक मुळे झालेले व्यापक स्थित्यंतर पाहायला मिळते . कसाबयास फाशी दिल्यावर फाशी दिल्याचा आनंद त्याचवेळी इतकी वर्षे   त्यास पोसल्याचा राग , सरकारला आलेली जाग  की डेंगी ची देणगी असे प्रचंड विरोधी मतप्रवाह फेसबुकवर  एकाचवेळी वहात होते ..आणि आश्चर्य म्हणजे असे असूनही "फेसबुक " सुरळीत चालू होते ..संसदेत विरोधी मतांची टक्कर झाली कि काय होते ते आपण पहातच आहोत ..असो !  त्यामुळे एका बाजूने अभिनंदनाचा वर्षाव दुसऱ्या बाजूने वाहिली जाणारी शिव्यांची लाखोली आणि मधेच चुकचुकणारी शंकेची पाल  अशा वैचारिक  विविधतेतील एकता म्हणजे "एकदाचा कसाब चा हिसाब झाला " ही  आनंदी भावना .. या भावनावेगात काही "हटके " प्रतिक्रिया मात्र लक्ष वेधून घेत होत्या ..
                                   बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतरही त्यांचा "करिष्मा " कायम असल्याचे दिसून येते . बाळासाहेब लागले कामाला , दिला आदेश यमाला , म्हणाले बोलावून घ्या कसाबला ही प्रतिक्रिया तुफान प्रसिद्ध होत होती . बाळासाहेबांनी कायमच अफजल -अजमल या दहशतवादी द्वयीवर आणि त्यांना शासन न करणाऱ्या शासनावर ठाकरी शब्दात  शेलकी टीका केली होती . त्यामुळे बाळासाहेबांच्या निधनानंतर   दिवसात कासाबला फाशी देऊन सरकारने त्यांना श्रद्धांजली दिली आहे अशा भावनिक प्रतिक्रिया लक्ष वेधून घेत होत्या . मार्मिक किंवा खोचकपणा हा मराठी माणसाचा जन्मजात गुण ... तोच गुण येथेही दिसून आला .. " मारले डासाने ..श्रेय लाटले कॉंग्रेसने " अशा खुमासदार पोस्त दाद मिळवत होत्या ... कसाब आणि पाकिस्तान यांना जोडणाऱ्या पोस्त तर भलत्याच ढासू  होत्या " आता पाकिस्तान पोरका झाला " किंवा " कसाबच्या मृत्यू नंतर पाकिस्तान ने राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला " इ . पोस्ट कल्पनाशक्तीच्या कमाल होत्या .. आता  भारतीयांना मनसोक्त  आणि मुबलक  बिर्याणी खाता येईल अशा पोस्त टाकत नेटिझन्स आनंद साजरा करत होते ...
                                त्यांना मन मोकळे करायला व्यासपीठ फेसबुक ने पुरवले ...एकंदरीत काय पेटलेले उस आंदोलन , बाळासाहेबांची खालावलेली प्रकृती आणि निधन यामुळे दिवाळीत न फुटलेले फटाके फेसबुकवर प्रतिक्रियांच्या  रुपात फुटले  .... मी काहीही न  बोलता -पोस्त करता शांतपणे नेटिझन्स ची ई दिवाळी पहात होतो ..कारण डोळ्यासमोर उज्वल  निकम यांचे वाक्य दिसत होते " बदले तुमने रंग बोहोत ,बोहोत बदले तुमने   नकाब  .. फासी तक  तुम्हे लाही दिया कसाब

No comments:

Post a Comment