Friday 1 June 2012

जिंकूनही हरलेला बाजीगर !




कष्टास नशिबाची साथ लाभल्याने काही सामान्य माणसे असामान्य कर्तुत्व घडवून जनमानसावर आपल्या कार्याचा ठसा उमटवतात ..त्यांचे त्यांच्या क्षेत्रातील यश इतके स्पृहणीय असते कि काही काळानंतर ती व्यक्ती म्हणजे ते क्षेत्र अशी ओळख निर्माण होते आणि तेव्हाच "अनभिषिक्त " हे बिरूद नावामागे लागून कार्याचा सन्मान होतो ...असे त्या क्षेत्राचे "अनभिषिक्त बादशहा " पद आणखी काही बादशहा सह वाटून घेत असताना डोक्यात कली शिरतो आणि सुरु होते ते कटाचे ,सुडाचे ,राजकारण व अस्तित्वाचे युद्ध !! राजा कितीही सामर्थ्यवान असला त्याचा प्रभाव कितीही जोरदार असला तरी सजग नागरिकास आणि सारासार विवेकबुद्धी जागृत असलेल्या मानसिकतेस शालीन ,कुलीन ,सभ्य ,नैतिक ,विचारी आणि बुद्धीप्रमाण्यास झुकते माप देणारे नेतृत्व हवे असते ...असे गुण नसलेला राजा युध्द जिंकूनही अंती पराभूत होतो कारण मान,सन्मान ,आदर आणि प्रतिष्ठा हि जिंकून /विकत घेता येत नाही तर ती सार्वजनिक जीवनातील वागण्यातून मिळत असते  ..सत्तेचे सिंहासन  हे सामन्यांच्या अपेक्षांनी बनलेले असते आणि सामन्यांच्या अपेक्षाभंग करून त्यावर बसणाऱ्या बादशहास  भौगोलिक  भूमीच प्राप्त होते बाकी काही नाही ....असाच विजयी पराभूत बादशाह म्हणजे शाहरुख खान !! हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये अगदी काल परवा पर्यंत "बादशाह " म्हणून फिरणाऱ्या आणि मिरवणाऱ्या शाहरुख खान याने उन्मत्त होऊन सामान्य नागरिकांनी मोठ्या प्रेमाने ,विश्वासाने ,अपेक्षेने दिलेले सिंहासन एकाच लत्ताप्रहाराने मोडून टाकले आणि जिंकूनही हरलेला बाजीगर ठरला !! 
                                  शाहरुख खान ! हिंदी चित्रपट सृष्टी मधील बडे आणि मान्यवर प्रस्थ ! कोणतीही  कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना त्याने मिळवलेले यश हे खरोखरच कौतुकास्पद आहे ...साचेबंद पण प्रभावी अशा भूमिका करत त्याने सर्व तरुणाईला आपलेसे केले आणि अमिताभ बच्चन यांचे नंतरचा "सुपरस्टार " हि मानाची   पदवी मिळवली ...सतत मिळत असलेले यश ,निर्मात्यांकडून चालू असलेला पैशाचा ओघ , बनियन पासून गाडी पर्यंत कोणतेही उत्पादन विकायची हातोटी (गरज ?) , प्रोडक्शन मधून मिळत असलेला तुफान पैसा , देशातून /विविध देशातून मिळत असलेले मान मरातब हे यश डोक्यात गेले नसेल तर नवलच ! कोणावरही कसेही बोलायचा आणि टीका करायचा आपल्याला अधिकार आहे अश्या उद्दाम विचाराने त्याचा सद्दामी वावर अनेकांनी सहन केला ....विविध पुरस्कार सोहोळ्यात त्याने सभ्यांसमोर केलेले असभ्यतेचे वर्तन त्याची मानसिक आणि वैचारिक पातळी स्पष्ट करण्यास पुरेसे होते /आहे .... आर्थिक संकटामुळे शून्यात असलेल्या बच्चन यांनी शून्यातून सुरु करून अत्त्युच्च पातळीवर नेऊन ठेवणारा  "कौन बनेगा करोडपती " ची  शाहरुख खान याच्या छछोर पणामुळे रस्त्यावर कसा आला ते सर्वांनी पहिले आहे किंवा अगदी नजीकचा "झोर का झटका " हा तद्दन फालतू कार्यक्रमास आपल्या पोरकट वागण्याने अगदी टाकाऊ बनवून क्या ये चम्पू  पाचवी पास है ?असा प्रश्न विचारण्यास भाग पाडले...एकंदरीत काय सार्वजनिक जीवनात शाहरुख खान याचे वर्तन नेहमीच बेजबाबदार ,पोरकट ,उद्दाम ,आणि क्षुद राहिले आहे ...हे स्पष्ट करणारे अनेक प्रसंग आहेत ...अगदी ताजा म्हणजे शिरीष कुंद्र याला दिलेला महाप्रसाद ! यामुळेच बादशाह असूनही अमिताभ बच्चन यांना जी प्रतिष्ठा मिळाली ती शाहरुख खान यास कधीच मिळाली नाही किंवा मिळणारही नाही ...अर्थात अमिताभ बच्चन हे सर्वोत्तम आणि महान व्यक्ती असून त्यांनी कोणत्याही चुका केल्या नाहीत किंवा अमिताभ सोडून सिनेसृष्टीत कोणताही "सभ्य " व्यक्ती नाही असे म्हणणे नाही ...परंतु बच्चन /याधीचे सुपरस्टार यांनी सार्वजनिक जीवनात आपली मर्यादा कधीच सोडली नाही ...
                                 काल परवा आलेली पोरे आपल्याला आव्हान देत आहेत ,अभिनयात वैविध्य नसल्याने आणि आलेले सिनेमे डब्यात जात आहेत यावरून आपले "भविष्य " ओळखून किंग खान बी .सी.सी .आई. या आई .पी.एल नामक "सोन्याचे अंडे " देणाऱ्या कोंबड्या विकणाऱ्या दुकानात आपल्या मैत्रिणी सह जाऊन कोलकाता नावाची एक कोंबडी घेऊन आला ...प्रचंड खर्च केला ,देशी मात्रा लागू पडत नाही म्हणून अनेक पैसे खर्च करून विदेशी खेळाडूंचे जत्थे घेऊन आला , बंगाली बाबू ला नीट जमत नाही म्हणून देल्हीकर बंडू च्या घरात कोंबडी ठेवली , तिच्या पिसांचा रंग बदलून झाला , अगदी पाकिस्तानी कबाब पण खायला घालून झाला पण  कोंबडी  काही सोन्याचे अंडे देईना ....असे ४ मोसम दारूच्या बाटलीत आणि सिगारेट च्या धुरात घालवले आणि काय आश्चर्य ... पाचव्या मोसमात कोंबडीने गोड बातमी दिली .पण आनंदही संयमाने साजरा करायचा असतो याची जाणीव असती तर खान कसला ? आपल्या नेहमीच्या उद्दाम आणि मुजोर वागण्याने सर्व देशाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले त्यामुळे खेळाडूंच्या कष्टास गालबोट लागले ... यश मिळूनही ते अपयश मानले गेले ......मुंबई मधील " हौदोसावतार " , जयपूर मधील "फुन्क्या अवतार " ,गहुंजे येथील "मर्कटावतार" आणि चेन्नई येथील "आवरा अवतार " यामुळे आपण माणूस म्हणून किती हुच्च आहोत याचे प्रत्यंतर त्याने सर्व देशास दिले ..कोलकाता मध्ये ममता सह कितीही छम्मक छल्लो केले तरी विजयास गालबोट लागायचे होते ते लागलेच ... त्यामुळे खेळाडूंनी सामना जिंकूनही मालकाच्या "अवतारा" मुळे त्यानाही शरमेने खाली मान नक्कीच घालावी लागली असणार ....क्रिकेट च्या मैदानावर खेळाडू जिंकले पण नैतिकतेच्या आणि सभ्यतेच्या मैदानावर मालक हरला ..
                                  एखाद्या क्षेत्रात आपण सर्वोच्च उंचीवर जातो तेव्हा आपल्या वागण्याचे ,बोलण्याचे ,विचाराचे ,जीवनशैलीचे समर्थन करणारा एक मोठा वर्ग आपल्या मागे असतो याचे भान आपण ठेवायला हवे ..आपण केलेल्या उच्च आणि नीच दोन्हीही गोष्टींचे अनुकरण आपले पाठीराखे अंधपणे करत असतात याची जाणीव हवी ...स्वैर वागून स्वैराचारास समर्थन देणे यात काय तो मोठेपणा ? आपल्या अस्तित्वाने आणि उपस्थितीने एका पिढीस काहीतरी आदर्श मिळावा असे वागणे म्हणजे आदर्श पुरुषाचे लक्षण ...पडद्यावरील आपली भूमिका आणि दैनंदिन जीवनातील आपले अवतार यात काही सार्धम्य आहे का ? याचाही विचार करावा ...कारण पडद्यावरील नायक /खलनायक यांच्या भूमिका या औटघटकेच्या असतात ....पुढील नायक /खलनायक आला कि त्या विस्मृतीत जातात पण खर्या आयुष्यातील  भूमिका अनंत काळ स्मरणात राहतात ...भारतीय लोकांची आणि प्रेक्षकांची मानसिकता आणि स्मरणशक्ती खूपच कणाहीन आहे ..काही दिवस विरोध होईल ..खानवर टीका केली जाईल त्याच्या धर्माचा विषय चघळून त्याच्याकडून वेगळे कसे अपेक्षा करता ? म्हणून विषयास कलाटणी दिली जाईल .....पुढचा चित्रपट आला कि खान खान म्हणून त्याच्या मागे लागण्यात लोक पुन्हा व्यस्त होतील ... आणि शाहरुख खान असाच उद्दामपणे वागत राहणार कारण ...कवी काय पाहू शकत नाही ? स्त्री काय करू शकत नाही ? मद्यपी काय बडबडणार नाही ? कावळा काय खाणार नाही ? जो तो आपल्या स्वभावानुसार वागणार.....

No comments:

Post a Comment