Saturday 13 July 2013

शेरखान . .

 प्राण समजायला जाण असावी लागते . दृष्टी सोबत दृष्टीकोनही असावा लागतो . तो असेल तरच 'प्राण ' गेल्याचे दुक्ख होईल . 



"इस इलाकेमे नये आये हो साहब ? वरना शेर खान को कौन नही जानता ??" मधून भांग पाडलेले लाल केस , पठाणी पेहराव आणि बोली , डोळ्यात एक विशिष्ट जरब , आवाजात खर्ज आणि अभिनयात कमालीची सहजता असलेल्या अभिनेत्याने अमिताभच्या कारकिर्दीला लागलेला अयशस्वी "जंजीर ' तोडून त्यात यशाचे 'प्राण '' फुंकले . प्राण किशन सिकंद ! देखणा खलनायक . . . आपल्या घरात कारकिर्दीत केलेल्या १०० वेगवेगळ्या वेशभूषांचे पेंटिंग ठेवणारा कलाकार . . कधी हातात पाईप आणि पिस्तुल धरून दहशत माजवणारा ,'टोकियो मै रेहते हो पर टोकनेकी आदत नही गयी "असे  अचूक टायमिंग ने विनोद मारणारा  ,कधी पैशाचा गर्व असलेला बाप तर कधी चाचा . . भूमिका अनेक असल्या आणि भूमिकांची गरज वेगळी असली तरी आपल्या भेदक नजरेने आणि भन्नाट डायलॉग ने प्राण यांनी त्या भूमिका अजरामर केल्या .  "शेर खान आजका काम कलपर नही छोडता " , ' जी चाहता है तुझे गंदे नाली के किडे की तरह मसल दु ,मगर मै अपने हाथ गंदे करना नही चाहता " , ''मुसलमान के यहा परवरीश , हिन्दुओन्से दोस्ती और अंग्रेजोंके शौक रहे है मेरे  " , "राशन पर भाषण  बहुत है पर भाषन पर कोई राशन नही ,सिर्फ ये जब भी बोलता हु ,ज्यादा ही बोलता हु समझे ? " अशा एका पेक्षा एक संवादाने चित्रपटसृष्टीत अजरामर झालेल्या प्राण यांनी १२ जुलै ला अखेरचे 'पेक अप ' केले . . .

                       
खलनायक हा देखील नायक असतो किंवा खलनायकास पहायलाही गर्दी होऊ शकते याचे उदाहरण म्हणजे प्राण . . . अनेक नायकांच्या यशस्वी कारकीर्दीतील  खलनायक  आणि पडत्या काळात मदतीचा हात देणारा नायक ! "संत्री दरवाजा खुला रखो फिर आऊंगा . . . " असा संवाद ज्यानेच फेकावा आणि 'यारी है इमान मेरा " या गाण्यावर बेधुंध होऊन त्यानेच नाचव . केवळ आणि केवळ अभिनयाच्या जोरावर चित्रपट सृष्टी गाजवणाऱ्या मोजक्या कलावंतापैकी प्राण आघाडीचा शिलेदार . १०० कोटी क्लब असल्या तद्दन फालतू समीकरणात न अडकता ३५० चित्रपटातून आपल्या अभिनयाचे खणखणीत नाणे वाजवणारे प्राण ! त्यांच्या आणि माझ्या पिढीत माझ्या वडिलांच्या वयाचे अंतर असले तरीहि ते मला आपले वाटतात . भावतात . त्यांचे भेदक डोळे मलाही घाबरवतात . त्यांना मी प्रथम पहिले ' शराबी ' मधे . . बेवडा विकी  , मुनीमजी ,मीना या त्रिकूटावर वचक ठेवणारा गर्विष्ठ बाप . अमिताभ डायलॉग वर डायलॉग मारत असताना केवळ चेहेऱ्यावर उमटणाऱ्या भावना , दबलेले आवंढे आणि उत्तरार्धात रंगवलेला असहाय्य बाप प्राण ने असा काही रंगवला की मी आजही शराबी केवळ प्राण साठी पाहतो . जंजीर ,शराबी , डॉन , कालिया , अमर अकबर , दोस्ताना , शेहेनशाह या 'अमिताभच्या ' म्हणून ओळखल्या जाणार्या चित्रपटात प्राण यांचा वाटाही तितकाच मोठा होता . बेशिस्त राजेश खन्ना सोबत यापुढे काम करणार नाही ही प्रतिज्ञा त्यांनी प्राणपणे जपली । त्यांचा उपकार , विक्टोरिया नं . २०३ अजूनही पाहता आला नाही हे माझे दुर्दैव . शतकातला सर्वोत्कृष्ट खलनायक मला पाहायला  मिळाला हे माझे भाग्य . . .
                         
प्राण हा माझ्या पिढीचा अभिनेता -खलनायक नाही . मद्रास कट सिनेमे लाऊन टीआरपी गोळा करणाऱ्या वाहिन्या त्यांचे 'अजरामर ' चित्रपट कधी दाखवणार नाही . दाखवलेच तर रंगीत आणि भडक बघायची सवय असलेल्या माझ्या पिढीला ते बघवणार नाहीत . कारण खलनायक म्हणजे अशक्य हवा म्हणजे नायकाला पांचटगिरी करता येईल . तो बलदंड नाही की त्याच्या अभिनयाला शरीरयष्टी हा 'सक्षम ' पर्याय ठरू शकेल . बीचवर मद्याचा प्याला घेऊन पडलेला खलनायक आणि समुद्रातून बिसलेरीच्या पाण्याने अंघोळ करून बिकीनीतून येणारी "हॉटी " त्याच्या सिनेमात नाही . बेड सिन्स तर नो वे . त्याच्या मागे गाड्यांचा ताफा नाही . चिप्स खाऊन मोकळा पुडा फोडावा तसे तो गाड्या फोडत नाही . गोळ्यांचा पाऊस आणि रक्ताचा सडा पाडत नाही . हेलीकोपटर मधून चालत्या गाडीत (किंवा उलटे ) उड्या मारत नाही . चेहेऱ्यावर एकही घाव नाही . मग तो माझा 'हिरो -विलन ' कसा असू शकेल ? फिल्म मध्ये हे तर हवेच न ? या मानसिकतेला प्राण कधी समजणारच नाही कारण प्राण समजायला जाण असावी लागते . दृष्टी सोबत दृष्टीकोनही असावा लागतो . तो असेल तरच 'प्राण ' गेल्याचे दुक्ख होईल . . अमरीश पुरी आणि प्राण नसते तर खलनायक म्हणजे काय हे मला कधी समजलेच नसते . . विजय हा नेहमीच सत्याचा -प्रेमाचा होतो या 'स्वप्नरंजित ' विचारसरणीवर आपली चित्रपटसृष्टी (दुर्दैवाने ) चालत असल्याने खलनायक मारणार हे कथेच्या लेखनातील एकमेव 'फिक्स ' गोष्ट असते जी कधी 'एडीट ' होत नाही . खलनायक कुत्ते की मौत मरत असताना हिरो आणि आपण दोघेही आनंदी असतो . कारण एकदा विलन मेला की सिनेमा संपला (हुश्श ) . .मारत मारत अनेकांची कारकीर्द घडते आणि मरत मरत किंवा मार खात अनेकांची कारकीर्द मरून जाते . संपते . प्राण सारखे काही मोजके कलाकार असतात जे हिरो पेक्षा अधिक लक्षात राहतात . मरूनही अजरामर होतात . पिढी कोणतीही असो . . ते नेहमीच 'एवरग्रीन ' राहतात . . 
                       प्राण ने चित्रपटसृष्टीला देखणा खलनायक दिला असेल , चित्रपटसृष्टीने मानाचा फाळके पुरस्कार , सरकारने पद्म पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला असेल , त्यांच्या घराची २ दालने  पुरस्कारांनी भरलेली असतील पण याहून मला प्राण महत्वाचा वाटतो . त्यांनी मला जीवनाचा मंत्र दिला . शराबी मध्ये जेव्हा ते म्हणतात " आजकी दुनियामे अगर जिंदा रेहना है , तो दुनिया के बटन अपने हात मै रखने पडते है " हेच आजच्या दुनियेत सुरु आहे . प्रत्येकाचे बटन दुसऱ्याच्या हाती . स्वत्व , निष्ठा , इमानदारी आणि प्रेम यालाही बटन लागले आहे . स्वार्थाचे . आपल्या हाती केवळ बटन आहे जसे पोलिसाच्या कमरेला पिस्तुल असते . असल्याचे समाधान आणि न वापरता येण्याचे दुक्ख देणारी वस्तू . म्हणूनच मला बेदरकार आणि सच्चा 'शेरखान ' अधिक भावतो . . .दुसऱ्याला दुसरा न मानणारा , सर्व काही आपल्यालाच हवे या मानसिकतेतून बाहेर पडत "शेरखान की शादी नाही  हुई तो क्या हुवा बाराते बोहोत देखी है ' म्हणत काळजाला हात घालणारा माणूस पुन्हा होणे नाही . . .  यापुढे छेदी सिंग , जयकांत शिक्रे अनेक होतील पण त्याला शेरखान ची सर नसेल . . आजच्या बॉलीवूड च्या भाषेत सांगायचे तर ' सुवर झुंड मै आते है  'शेर (खान ) अकेला " . . . . पेक अप !!


( कोणत्याही अभिनेत्याला सुवर म्हणायचा हेतू नाही )  #pran 

No comments:

Post a Comment