Friday 23 August 2013

बातमीला एक दिवस वाटलं . . आपण बातमीत याव

बातमीला एक दिवस वाटलं 

आपण बातमीत यावं 
आठ कॉलमच्या प्रतिष्ठेच्या जागेत
ऐसपैस पसरावं 
एक दोन कॉलमना हिणवावं 
चार पाच कॉलमना जळवावं 
बातम्यांच्या राज्यावर आपणच राज्य कराव
बातमीला एक दिवस वाटलं 
आपण बातमीत याव


आपल्या डौलदार शब्दांकडे अन
समर्पक छायाचित्राकडे पाहून
प्रतिस्पर्धी पेपरातील बातम्यांची विकेट पडावी
शेजारच्या बातम्यांची मान आदराने तुकावी
असे स्वप्न बातमीला पडलं 
बातमीला एक दिवस वाटलं 
आपण बातमीत याव 

दिवस गेले आठवडे उलटले महिने सरले 
बातमीला बातमी मिळेना 
बातमी बातमीत काही येईना 
आठ कॉलमचा मोह सुटता सुटेना 
बातमीला एक दिवस वाटलं 
आपण बातमीत याव 

देवाला घातले साकडे 
देवीला बोलला नवस 
अंधश्रद्धा निर्मूलनाच्या बातमीवर 
बुवा बाबाची बातमीने केली मात 
बातमी चालू लागली मंदिरा आश्रमाची वाट 

देवाच्या साधनेला फळ येईना 
हजार रुपये चार कोंबड्या 
दोन बोकड अन १११ नारळ देऊनही 
देव काही फळेना 
देशात सव्य असे काहीच घडेना 

देव अपयशी ठरल्यावर 
बातमीला आठवला अनिष्टदेव 
तंत्र मंत्र जादूटोणा करण्यात सरू लागला वेळ 
कोण मारतय कोण मरतंय 
कोण बुडतंय कोण बुडवतय 
कोण संपतंय कोण संपवतय 
याकडच बातमीच लक्ष लागलं 
बातमीला एक दिवस वाटलं 
आपण बातमीत याव 

अखेर आला तो दिवस 
बातमीला बातमी मिळाली 

देवाची अन अनिष्ट देवाची उपासना फळाली 
आठ कॉलमची बातमी मुखपृष्ठावर झळकली 
पण . . . . . 
कोण्या जाहिरातीच्या 'जेकेट ' ने झाकोळली 

प्रकाशात यायचे श्रेय जाहिरातीने लाटले 
बातम्यांच्या राज्याचे नवे राजे उदयाला आले 
बातम्यांचे आठ कॉलम जाहिरातीनीच व्यापले 
म्हणूनच . . . 
बातमीला एक दिवस वाटलं  
आपण बातमीत याव

No comments:

Post a Comment