Monday 31 December 2012

दुध की दारू ?

 हा प्रश्न केवळ ३१ डिसेंबरलाच का पडतो हा माझ्यासमोरील सर्वात मोठा प्रश्न आहे ... असा प्रश्न पडणारा मी एकटाच की अनेकांना खाजगीत पडणारा प्रश्न सार्वजनिक ठिकाणी मांडणारा मी एकटाच ? नाही म्हणजे आपला बच्चन सांगतो " दारू पिनेसे लिवर खराब होता है  " किती मोठा सामाजिक संदेश न ? तरीही आपण त्याच्याच भाषेत उत्तर देतो " थोडी सी तो पिली है ...चोरी तो नही की है " ..... कौन कमबख्त केहता है के हम आदत की वजहसे पिते है हम तो पिते है के यहा आ सके तुम्हे देख सके  , उसे भूल सके ...इसलिये ....हमका पीनी है पीनी है हमका पीनी है .... लोग केहते है मै शराबी हु तुमने भी शायद यही सोच लिया...सोच लिया ?? हम्म तो फिर ....यारो  मुझे माफ करो मै नशेमे हु ....मै शराबी मै शराबी ...... !! कूल बडी ..... कोणता ब्रांड तुझा ?? अर्र ...अजून बिअर मधेच आहे डीअर bi a man .... अबे ....तू ड्रिंक नाही करत ? मग काय घेतो ? बोर्नविटा की होर्लेक्स ? चू ..आहेस बे तू .... चल ३१ आहे कमीतकमी ब्रीझर तरी ट्राय मार ...तू जिच्यावर लाईन टाकतो ना  ती वोडका मारते ...साला समज तिला डेट वर घेऊन गेला तर काय पाजणार ? फ्रुटी ?? हा हा हा हा ...... व्यर्थ आहेस रे तू ...चा मारी दारू जर इतकी महत्वाची आहे तर हे लोक " दुध " का वाटत आहेत ?? आणि ते पण केवळ १२ वाजे पर्यंत ? म्हणजे दारूची दुकाने १.३० पर्यंत उघडी आणि दुध केवळ १२ पर्यंतच ...१२ नंतर दुध प्यायचे असेल तर थर्मास भरून आणायला हवा पण ज्या जीन्स च्या खिशात मोबाईल " कोम्बावा " लागतो तेथे थर्मास कसा मावेल ? श्या बाबा .....३१ सेलिब्रेट तर करायचा आहे पण दारू पिउन की दुध पिउन ??
                                     काय करायचे ? असा प्रश्न अनेकांना पडला असेल ...ज्यांनी कधीच पिली नाही त्यांना पिण्याचे एक कारण  आणि जे नेहमीच घेतात त्यांना एक निमित्त ... आपल्या जीवनशैलीने , बदललेल्या विचारसरणीने , सामाजिक चौकटीने आणि ढासळत चाललेल्या मूल्यांनी पुरवलेले एक निमित्त ! काहीही काय राव ... मी घेतो /घेते म्हणजे काय माझ्यावर संस्कार नाहीत काय ? आणि तू कोण आरोप करणार आमच्यावर ?बघून घेऊ आमचे आम्ही ...कधी फेसाळता प्याला लावला आहेस ओठाला ? आहेस कोणत्या जगात ....आता दारू पिणे "इन " आहे ..गावठी विचार आहेत तुझे ..दारू म्हणजे ऑरेंज किंवा संत्र ची हातभट्टी , कडमडत चालणारा झिंगा आहे कोणत्या तरी गटारीकडे अस्ताव्यस्त पडलेला किंवा बायकोने फरपटत घरी नेलेला दारुडाच माहित तुला...मी बघ ...५ क्वार्टर पिल्या तरी व्यवस्थित गाडी चालवत घरी जातो ..कळत पण नाही कोणाला ...अरे हातभट्टी वरून आठवले , आणायची का आज ? "थ्रिल " यार .... तू ऐकू नको हा ....दारू नावाने पण चढेल तुला ... ** या चौकात दुध वाटप आहे बघ जा जा ...आईचा पदर पकडून आणि दूदू पी हा ....हा हा हा ... काय समजतो बे ?? मला आईला आईकून घेतो म्हणून जास्तच माजला आहेस ... ए  आण रे ती बाटली ...दाखवतोच तुला माझ्यातला दम ..... बाटली रिकामी ...दम सिद्ध आणि आणखी एक तळीराम तयार ...असे किती तळीराम आज तयार होतील ?केवळ स्वतः मधील "दम " सिद्ध करण्या आधी त्यानाही प्रश्न पडत असेल दुध की दारू ?
                                    माहित नाही .....आणि माहित असले तरी करणार काय ?सध्याचे जग व्यक्ती स्वातंत्र्य ,अभिव्यक्ती स्वातंत्र्य याचे आहे ... आपल्या सोयीचे नियम तयार करण्याचे आणि गैरसोयीचे नियम मोडण्याचे सर्वाना स्वातंत्र्य आहे . आयुष्य -तारुण्य याचा आनंद घेण्याच्या कल्पना -संकल्पना बदलल्या आहेत . मेणबत्ती आणि दुध संस्कृतीचे झेंडे खांद्यावर घेऊन अनेक हवसे नवसे गवसे कार्यकर्त्यांची एक जमात उदयाला येत आहे .वर्षभर धर्म ,संस्कृती आणि आप्तवचन यांना जुने जाऊद्या मरणा लागुनी याप्रमाणे जाळून किंवा पुरून टाकणार्यांना अचानक ३१ डिसेंबर ला पुरलेले मूडदे पुन्हा खोदून काढायची हुक्की येते ... ज्या संस्कृतीला बुरसटलेली ,मागास अशी नावे ठेऊन आपल्याला "मॉड " ठरवायची सवय असते त्यांना अचानक कळवळा येतो आणि चौकात कट आउट लागतात " संस्कृतीचे रक्षण करा ..दारू नको दुध प्या " ...मग ही सर्व मंडळी गटारी ला कोठे असतात ?किंवा प्रत्येक दारूच्या दुकानासमोर यातील काही कार्यकर्ते वर्षभर सामोपदेशानाचे कार्य का करत नाहीत ? जसे अमृत एकदाच पिल्यावर  आयुष्यभर पुरते तसेच दुध ३१ ला पिल्यावर वर्षभर दारू प्यायला आपण मोकळे का ? कि केवळ acidity होऊ नये म्हणून आधी दुध घ्यायचे आणि वर दारू प्यायची ...असे असतानाही दुध की दारू हा प्रश्न राहतोच ...
                                    दुध ..... हे जर इतकेच महत्वाचे आहे ..आणि ते "मोफत " वाटायला तुमच्याकडे पैसा आहे तर मुंबईत ४०% कुपोषित कसे ?क्राय च्या अहवालानुसार ४४ % शाळात चांगले अन्न मिळत नाही , भूक निर्देशांका नुसार भारत ८८  देशांच्या यादीत ६६ क्रमांकावर कसा ,महाराष्ट्रातील १३ लाख मुले कुपोषित कशी ,भारतातील अपुऱ्या वजनाच्या मुलांची संख्या जगात सर्वाधिक कशी ,अन्न पुरवठ्याबाबतीत बिहार आणि झारखंड झिम्बाम्ब्वे आणि हैती च्या मागे कशी save the children ( dec -jan 2011 ) यांच्या अहवालानुसार भारतातील ३०% कुटुंबाना जेवणात कपात करावी लागते ,२५% मुले उपाशी कशी ?नागरिक विकासाच्या बाबतीत १८७  देशात भारताचा १३४ क्रमांक कसा ? कारण मूळ प्रश्ना पर्यंत आपण जातच नाही .... जितके मरत आहेत तितके मरुदेत .... फ़क़्त जाताना " मत " देऊन जाऊदेत ... फुटकळ कार्यकर्त्याला नगरसेवक व्हायचे असते ,नगरसेवकाला आमदार ,आमदाराला खासदार , खासदाराला मंत्री आणि मंत्र्याला पुढचे डोहाळे त्यामुळे संधी साधून आपल्याला बदलत चाललेल्या संस्कृतीचा किती तिटकारा आहे , अजूनही आम्ही ,आमचा पक्ष किती भारतीय संस्कृतीला गच्च पकडून आहोत हे कोणत्या तरी वृत्तपत्राच्या रकान्यात फोटोसह येण्यास प्रश्न निर्माण केला जातो " दारू की दुध "....
                                       माझा विरोध दुध वाटपाला नाही ...तर विरोध आहे संधिसाधूपणाला .... महत्व आहे ते हेतूला ..महत्व आहे उपाशी झोपणाऱ्या अनेक अबालवृद्धाना ...महत्व आहे लस्सी किंवा दुधाच्या दुकानाबाहेर दीनवाण्या नजरेने सर्वांकडे दुध दुध म्हणून  भिक मागणाऱ्या लहान मुलांना , आपला पान्हा आटल्यावर बाळाला जिवंत ठेवण्यासाठी सिग्नल वर हात पसरून पैसे गोळा करणाऱ्या मातेला ,  महत्व आहे विषमतेला ...ज्या घरात मांजरे आणि श्वान लिटर लिटर दुध गट्टम करतात आणि  २५० मिली दुधाच्या पिशवीत संपूर्ण दिवस काढणाऱ्या कुटुंबाला  ... महत्व आहे आंदोलनात दुधाचे tanker फोडून आपला राग व्यक्त करणाऱ्या हुच्च मानसिकतेला , विरोध आहे केवळ चौकात उभे राहून दुध वाटणाऱ्या लोकांना , विरोध आहे गरजूव्यक्ती पर्यंत न पोहोचणाऱ्या मानसिकतेला ...पण काय करणार जे लोक हजारो रुपयांची दारू घेऊ शकतात ते ४० रुपयांचे दुध घेऊ शकतात त्यांना गरज असते केवळ "सामोपदेशनाची " आणि कुपोषित बालकांना गरज असते दुधाची ...आपल्यात नेमके उलटे होते ... पण तरीही मला प्रश्न पडतोच ....१२ पर्यंत दुध पिणारे /वाटणारे १२ नंतर काय पितात ?? " दुध की दारू ?? " 
                         

No comments:

Post a Comment