Sunday 3 November 2013

दिवाळी "ती " आणि "ही".....


दिवाळी म्हणजे अंधकार भेदून जाणारा प्रकाशाचा सण...मग तो आसमंत मधील असो वा मना मधील .."तमसो मा जोतीर्गामय" हि उक्ती सार्थ ठरवणारा हिंदू धर्म मधील महत्वाचा आणि मानाचा सण....धन्वंतरी पूजन,लक्ष्मिपुजन,पाडवा,भाऊबीज अशा सणांनी नटलेले आणि मंतरलेले दिवस....किल्ला ,फटाके ,गोड धोड (मनापासून आणि वजन वाढीचा विचार न करता खाणे ) आताशी होत नसले तरी दिवाळीचा आनंद मात्र तसूभरही कमी होत नाही ......चकली खात असताना सहज डोक्यात विचार आला कि मागच्या वर्षी असेच बागेत बसून चकली वर ताव मारत होतो यंदाही मारत आहे मग या १क वर्षात बदल तो काय झाला ? ? आणि मग विचारांची चक्रे फटाक्याच्या चक्रा  सारखी गोल गोल फिरू लागली ...


वर्ष २०१० भारतात अमेरिकेचा पंतप्रधान येणार म्हणून खेड्यातल्या बायका पण घर समोर जरा जास्तीच मन लाऊन सडा रांगोळी करत होत्या...साहेबाना काय द्यायचे ,त्यांचा ताफा ,सुरक्षा सगळ्याची रसभरीत वर्णने वर्तमानपत्रे आणि वृत्तवाहिन्यावर येत असल्याने सर्वांनाच "आपला " कोणीतरी कुंभमेळ्यात हरवलेला सागा सोयरा २० साल बाद आपल्याला भेटायला येतोय अशा अविर्भावात ७ स्टार हॉटेल पासून ते वडाच्या पारावर चंची मधून तंबाखू खाताना चर्चा आणि विचारविमर्श चालू होता जसे काही बी.बी.सी वाले यांची मुलाखत घायला येणार आहेत...पण आमचे तत्कालीन "आदर्श " मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना न चितळ्यांची बर्फी गोड लागेना न काका हलवाई यांचा लाडू न लक्ष्मीनारायण चिवडा ची चव समजेना ....आता इतक्या "आदर्श " मुख्यमंत्र्यास अशी "अजीर्णाची" लक्षणे दिसू लागल्यावर काळजीवाहू पक्षाश्रेष्टी त्यांना सुट्टीवर पाठवणारच होते ..पण ओबामा येणार होते म्हणून कळ काढली ....यावेळी अशोकरवाना यु इतना तुम मुस्कुरा रहे हो ...गाणे पुरेपूर पटले असणार...ओबामा गेले आणि पाठोपाठ अशोकराव हि गेले....आणि महाराष्ट्रावर पृथ्वी यांचे राज आले...पण तेवा पासून जो समस्यांचा ससेमिरा चालू आहे त्यामुळे दिवाळी का दिवाळे ?असा प्रश्न पडू लागला आहे ...मावळ येथे शेतकऱ्यांवर झालेला गोळीबार, कितेय्क दिवस सडून मात्र झालेला कांदा आणि सरकारची आडमुठी भूमिका ,अजित पवार यांची नाकेबंदी ,गरज नसताना झालेला शिवशक्ती आणि भीमशक्ती चा मिलाप, राज आणि उद्धव यांचे खजगीतील चव्हाट्यावर आलेले खाजगी वाक्युद्ध ,निकामी झालेले पण वारंवार दिशा भरकटणारे  नारायणास्त्र ,महाभारत मधील संजय पेक्षा दूर दृष्टी असणारे निरुपयोगी निरुपम ,आझमगड चे मुकादम आजमी यांची मुक्ताफळे , गोपीनाथराव यांचा "कोणी घर देता का घर " हा एकपात्री कार्यक्रम ,लुंगीवाले चिदंबरम आणि साफारीवले मुखर्जी यांच्यात लुटू पुटु ची लढाई ,रामदेव बाबा यांचे चिरडलेले आंदोलन, जम्मू विधानसभेत अफजल गुरु यास मुक्त करायची मागणी यासारखा घटनांनी भारतात लोकशाही कोठे चालली आहे असा प्रश्न मला नकीच पडला ....

२०१० च्या दिवाळीत अण्णा हजारे हे नाव किती लोकांना माहित होते हो ? या दिवाळीत तर त्यांच्या नावाच्या पणत्या पण आल्या आहेत ..माणसाला देवपण कसे येते आणि पळ्या कर्तुत्वाने आलेय देवपणाची माती कशी होते याचे उत्तम उदाहरण म्हणजे अण्णा हजारे....रामदेव बाबा यांनी स्त्रीवेष धारण करून सोडलेले उपोषण अण्णा यांनी पुढे रेटले आणि त्यांना न भूतो न भविष्याती प्रसिद्धी मिळाली ...स्वतः उपाशी राहून (?) बेदी बाई आणि केजरीवाल अण्णा यांचं हाती लढाईचा सुकाणू देऊन समाजकारण सोडून राजकारणात घुसले आणि मी म्हणेल तीच पूर्व असे वागून लोकशाही ला झुकवू लागले...तेथेच आपले देवपण त्यांनी गमावले ...भूषण यांचेवर झालेली चप्पल फेक असो वा अग्निवेश आणि सिंघ यांनी सोडलेली टीम असो, किंवा लालू प्रसाद यांना दिलेले ७ ८ मुले असणार्यांना ब्रह्मचार्याचे महत्व काय समजणार असे सवंग उत्तर असो अण्णा आता बिथरले हे मात्र नक्की ...पण या दिवाळीत अण्णा यांचा विचार करावा लागतो हे मात्र नक्की...

यंदाच्या दिवाळी मध्ये "आहे रे " वर्ग कडे पैसा प्रचंड झाला आहे ...यंदा कोठे फार्म होऊसें घ्याचे,विदेशवारी कोठे करायची ,नवीन घर किती लाखाचे घायचे ,चारचाकी कोणती घ्यायची ,प्लास्मा घ्यायचा कि एल. सी .दि अशा चर्चा मंडई  मध्ये गेल्यावर मेथीची जुडी घ्यायची का पालक ची इतक्या सहजतेने चालू आहे ...पैसा आला पण नैतिकता मात्र पार रायला गेली आहे ....सगळेच दम मारत आहेत किंवा दम टाकत आहेत...सतत होणार्या रेव पार्ट्या , मराठी कलाकारांनी पुण्यात घातलेला धुमाकूळ आणि त्याचे केलेले समर्थन ,सुपर बईक साठी मित्राच्या मदतीने आजी चा खून, ९० वर्षाच्या बाई वर बलात्कार,लहान मुलांचे लैंगिक शोषण, सौदी अरेबिया मध्ये सिनेमात काम केले म्हणून मारण्यात आलेले बाईला फटके,हिंजवडी येथे उचाशिक्षित २५ वर्षाच्या तरुणीवर झालेला पाशवी बलात्कार इत्यादी या घटना खरः विचार करायला भाग पडतात कि समाज आज कोठे जात आहे ? समाजात काही चांगल्या घटना नक्कीच होत असतात पण अशा घटना अजूनही होतात आणि समाजाचा काही ठराविक वर्ग अशा घात्नांनाचे समर्थन करत असतो हा प्रकार नक्कीच निंदनीय नाही  का ?? जशी  वर्षे वाढत आहेत तसे हे प्रकार पण वाढत आहेत...समाजाची नितीमत्ता मात्र वेगाने घसरत आहे....
या सगळ्याचा वैताग आला म्हणून कला क्षेत्र कडे वळलो ....या वर्षी अमला कायम रेडी असणारा जिंदगी मध्ये परत कधी न मिळणारा बोडी गार्ड मिळाला ...अनेक सिनेमे येऊन गेले येत आहते पण तद्दन गल्लाभरू सिनेमा च्या गर्दीत समांतर चित्रपट सृष्टी आता गायब होत आहे....अनेक वर्षे वाट पहावी लागते तरीही एखाधा आशयघन चित्रपट किंवा गाणे आईकायला मिळत नाही , नाटकेही आता प्रेक्षकांची आवड पाहून लिहिली जातात एखादा विषय आणि त्यातून येणारा आशय अशी समृद्ध परंपरा आता लोप पावत आहे का काय अशी भीती वाटू लागली आहे ...यात सुख मानायचे म्हणून का काय अशा भोसले यांचा गिनीज बुक मध्ये झालेला समावेश ,रत्नाकर मतकरी यांना मिळालेला भावे पुरस्कार, विहीर चित्रपटास मिळालेला अंतर राष्ट्रीय सन्मान अशा घटनांनी समाधान मानतोच आहे तोपारेंत सांगलीत भरणाऱ्या नाट्यसंमेलना साठी  अध्यक्ष पद साठी चालू असणारी लढाई पाहून काय बोलावे समजेना कारण नाटक करणारीच जर नाटकं करायला लागली तर सामान्यांनी काय करायच ? २०१० ची दिवाळी आणि २०११ ची दिवाळी यातील सर्वात मोठा  फरक म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन तेवा गरोदर नवती आणि आता आहे ....प्रसार्माध्यामना कोणत्याही विषयाची इतकी प्रसिद्धी करायची सवय आहे कि अजून १ २ महिन्याय्नी तिच्या गरोदर पानाच्या बातम्या पाहून गरोदर नसलेल्या स्त्रियांना पण प्रसूती वेदना येऊ लागतील का काय अशी शंका घ्यायला जागा आहे ...याच वर्षी भालचंद्र यांच्या मिशा वाढायला जितकी वर्ष लागली असतील त्याहून १ २ महिने जास्ती चर्चेत असणारी आणि काही नेम नसलेली नेमाडेंची "हिंदू " हि कादंबरी "अखेर " प्रकाशित झाली .....बराच प्रयत्न करून अजून ती वाचायचा काही योग आला नाही .....बाकी फ़क़्त ज्ञानपीठ मिळायचा बाकी असणारे पुरुषोत्तम उर्फ हिजडोत्तम खेडेकर यांची पुस्तके पाहून आणि वाचून या वर्षी मला फु बाई फु . कॉमेडी एक्ष्प्रेस्स यासारखे कार्यक्रम पहायची वेळ आलीच नाही ,आणि फ़क़्त साड्या दागिने कुंकू लावायची पद्धत सोडली तर विषय सारखाच असणार्या हिंदी आणि मराठी मालिका पाहण्याची इच्छा झालीच नाही....फ़क़्त अमिताभ यांचा करिष्मा यादगार राहिला......

या वर्षी पण सच्चू चे महाशतक झालेच नाही पण ८० कोटी च्या घरात मात्र तो राहायला गेला आणि न्यूस वाल्यांना ८ दिवस चघळायला विषय मिळाला ,भारता मध्ये एफ १ , जिंकेलेला विश्वचषक ,त्यामागोमाग साहेबाने उडवलेला धुव्वा , त्याची परतफेड म्हणून आपल्या गल्ली मध्ये हरवण्याचा केलेला भीम पराक्रम ,जेकोवीच चा डंका ,आशियायी करंडक जिंकून आल्यावर हॉकी पतुना दिलेले १० २० हजार आणि त्यांनी झालेला अब्रू चा पंचनामा याने क्रीडा क्षेत्र संमिश्र राहिले तरी सुखावह आहे ...

यंदा पेव फुटले ते भ्रष्टाचाराचे ..२०१० मध्ये चर्चेत असणारा भ्रष्टाचार आता सार्वजनिक झाला..आजचे लक्ष्मीपूजन सर्व लक्ष्मीपुत्र एकत्रित रित्या तिहार च्या देवालयात करतील त्यामुळे लक्ष्मी माझ्या सारख्या गरीब घरी येईल का काही याची मला काळजी वाटत आहे .....एका मागोमाग एक भ्रष्टाचाराची प्रकाराने उघडकीस येत आहेत ....राजा , जाणता राजा , टग्या , माडीवरून खाली आलेले कलमाडी येदिरुप्पा ,चिदंबरम ,अशोकराव इत्यादी यांची नवे काढत गेली तर यादी कमी पडेल....उगीच भारतीय पैसा परदेशातून अनन्य पेक्षा पुण्यातील deccan / f.c महाविद्यालय मध्ये पुरातत्व विभागाचे जे अभ्यासक्रम घेतले जातात त्यांच्या विद्यार्थ्यांना अजंठा वेरूळ ,मावळ खोरे अशा रुक्ष भागात फिरवण्या पेक्षा बारामती ,लातूर ,नांदेड ,पुणे ,बेंगळूरू अशा ठिकाणी "संशोधनास " पाठवावे .....म्हणजे ती संपत्ती पाहून पद्मनाभ स्वामी दृष्टांत देतील कि ६ वी खोली उघडून टाका .....यांच्या तुलनेत माझ्या कडे काहीच नाही ....म्हणजे हद्दपा मोहेंजदडो नाही सापडले तरी "भारतात सोन्याचा धूर येत होता " हे वाक्य सप्रमाण सिद्ध होईल.....मागच्या दिवाळीत इतके लक्ष्मीपुत्र नवते अमला फ़क़्त मित्तल माहित होते ...यंदा हे सर्व समजले...

या साधक बाधक गोष्टी चालू असताना काही लोक यंदा सोडून गेले ...मग ते पतोडी असो ,हुसेन ,जॉब्स ,शम्मी कपूर इत्यादी शुभ प्रसंगी दुखद आठवणी काढू नयेत म्हणून काही बोलत नाही ....पण यंदा दिवाळी साजरी करायची कशी हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे....गाडी घायची आहे पण पेट्रोल परवडत नाही ,तेल महाग ,गस महाग ,फराळ महाग ,सोने चांदी तर बोलायला नकोच ,त्यात दिवसाला २६/३१ रुपये पुरतात हा सरकारचा जावई शोध यामुळे दिवाळी साजरी करायची कशी ? त्यात महाराष्ट्र मध्ये वीज टंचाई इतकी आहे कि दिवे लागले कि दिवाळी या थाटात काम चालू आहे...महागाई किती पण वाढो आहे रे वर्गास काही फरक पडत नाही पण नाही रे वर्गाने काय करायचे ? चतुर्थ श्रेणी कामगारांनी कशी साजरी करायची दिवाळी ? मॉल मधून हजारो चे मोल चुकवून विकत घेतलेला आनंद तरीही असमाधान आणि दिवाळी साठी माझ्या मुलांसाठी मी काही करू शकत नाही हे असणारे दुक्ख किंवा यंदा मी मुलांना (स्वत काही नाघेता /उपाशी राहता ) काहीतरी घेतले याचे समाधान याची सांगड कोठे घालणार आहे आपण ? त्यांच्याकडे नाही आणि आपल्याकडे आहे म्हणून नाही तर एक सामाजिक जाणीव म्हणून थोडे फारतरी  दानप्रत्येकाने "गुप्तपणे " करावे....आणि बाकीच्यांना पण दिवाळी करू द्यावी....

राहिला प्रश्न माझा....मागच्या दिवाळीत मी तृतीय वर्षाचा विद्यार्थी होतो यंदा मी वैद्य आहे ....काही घटनांनी काही लोकांनी माझे आयुष्य बदलून टाकले ...काही लोक आयुष्याच्या महत्वाच्या टप्प्यावर कायमचे सोडून गेले त्यांची उणीव पदोपदी जाणवत असते ...पण दृष्टीकोन बदलला आहे त्यामुळे असह्य गोष्टी सुसह्य होत आहेत...किंवा तसे म्हणावे लागत आहे .....काही चांगल्या गोष्टी हाहातून घडतात ,काळात नकळत लोकांना आनंदी ठेवण्याचा प्रत्न करतो त्यामुळे एक वेगळेच समाधान मिळते ....वैयक्तिक असो वा सार्वजनिक चांगल्या २ गोष्टी घडल्या कि वाईट ४ गोष्टी घडणारच....ते आपल्या दृष्टीकोनावारच असते कि काय घ्यायचे आणि काय सोडायचे ....१०० ग्राम जिंदगी है संभालके 

....... शुभ दीपावली
वैद्य .अंकुर रविकांत देशपांडे ( २६ ऑक्टोबर २०११ ) 

No comments:

Post a Comment