Friday 4 May 2012

वैचारिक कीड

आज वाचनात अनिता पाटील यांचा ब्लॉग आला ...अनिता पाटील हि खरच स्त्री आहे का कोणी स्त्रियांच्या नावामागे लपून अकलेचे तारे तोडत आहे याविषयी मी काही लिहिणार नाही कारण विचारांना लिंग नसते ...विचार हे विचार असतात ...या ब्लॉग मधून सतत आणि कायम ब्राह्मणद्वेष जोपासला ,पसरवला आणि पाळला जातो असे सर्व पोस्त पाहिल्यानंतर सहज लक्षात येते ..अनेकदा फेसबुक वर संचार करत असताना आणि विविध ग्रौप शी संलग्न असताना असे काही कार्यकर्ते दिसून येतात कि त्यांचे विचार आणि मते हे बाधित असतात ..कितीही समजावण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्या डोक्यापर्यंत जात नाही याचे काय कारण असू शकते याचे प्रत्यंतर सदर ब्लॉग वाचल्यावर येतो.... सर्व धर्म समभाव किंवा जातीभेद टाळा अशा शिकवणी शाळेत आणि घरात दिल्या जात असताना आपल्या मनाची दारे बंद करून घेणे याहून करंटेपणा तो काय ? समाजातील सर्व वाईट गोष्टीना ब्राह्मण जात आणि हिंदू धर्म यांना जबाबदार ठरवून आपली कर्तव्ये नाकारायची आणि सतत दोषारोप करत राहायचे यात कोणती हुशारी ? सध्या समाजसेवक /समाजसुधारक म्हणजे काहीही कार्य न करता हिंदू धर्मावर टीका करत राहणे असा एक कलमी कार्यक्रम राबवला जात आहे त्यामुळे समाजाची सेवाही होत नाही आणि सुधारणाही होत नाही पेरली जातात ती फ़क़्त दुहीची बीजे ....

                              आज जो ब्लॉग वाचला त्यात लग्नाचा नाजूक विषय जातीयवादाच्या चिखलातून हाताळलेला होता ...अनेकदा विविध ब्राह्मण ग्रौप वर वावरत असताना "आंतरजातीय विवाह " या स्वरूपाच्या पोस्त पहिल्या कि माझी सटकते ...कारण प्रत्येक ग्रौप वर हाच विषय निरनिराळ्या अंगाने चर्चिला जातो आणि अंती मुलीना दोषी मानून त्यांचे संस्कार आणि जीवनशैली यांच्यावर ताशेरे ओढून आपला अहं सुखाऊन घेण्याचा प्रयत्न चालू असतो ... पण आज तो ब्लॉग वाचल्यानंतर वैचारिक दरिद्रीपणा म्हणजे काय असतो आणि क्षुद्रता हि जात /धर्म यात नसून ती विचारात असते याचा आणखी एकदा प्रत्यय आला ...कोणी कोणाशी लग्न करावे हा जयचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो पण जेव्हा त्याला राजकारणाची किनार मिळते तेवा तो चिंतेचा विषय बनतो ..पाटील यांच्या कथेनुसार एका ब्राह्मण मुलीने आंतरजातीय विवाह केला असेल तर त्याचा इतका गवगवा करायचे कारण काय ? आणि तो मुलगा मुलीच्या वडिलांना ५ लाख रुपये देतो तुमच्या मुलीशी माझे लग्न करा अशी मागणी घालतो आणि त्या व्यवहारास वडिलांचा नकार , पिशाच्य प्रथेनुसार केलेला मुलीचा कौमार्यभंग , अपहरण करून केलेले लग्न या गोष्टींचे समर्थन करून त्या बहादूर घोरपडे ( कथेमधील नायक ) याचे समर्थन केले जाते हे अत्यंत हीन विचार आहेत ...सदर मुलीच्या इच्छा ,तिचे मन ,तिच्या भावना ,तिचे कौमार्य आणि तिचे आयुष्य याचे खंडन होत असताना एक स्त्री जर या प्रकारचे समर्थन करत असेल तर याहून दुर्दैव ते काय ? असे ब्लॉग वाचून कधीकधी वाटते कि काय साधले महानपुरुषांनी ..समाजाशी आणि प्रस्थापित कर्मठ समाजव्यवस्थेशी झगडून मनाचे स्थान मिळवून दिले ते यासाठीच का ? ब्राह्मण आणि हिंदू समाज आता कर्मठपणा सोडून सर्वाना आपलेसे करत आहेत तर अशा परकेपणाच्या आणि असुरी आनंदाच्या भिंती बांधून दुरावा कायम राखण्याच्या प्रयत्न कशासाठी करायचा ......
                                प्रसारमाध्यमांचा वापर करताना माणसाचा विवेक जागृत हवा ..कारण वापरत असलेला प्रत्येक शब्द देत असलेले प्रत्येक उदाहरण आणि लिहित असलेला प्रत्येक लेख हा कोणाच्या तरी मनावर आणि विचारांवर परिणाम करत असतो ..आपल्या जातीचे आणि धर्माचे कितीही कट्टर समर्थक असला तरी दुसर्या जातीधर्माचा द्वेष करायची शिकवण देऊन कोणीही महान होत नसतो ...पुढच्या पिढीस आपण चागले विचार याहून काहीही देऊ शकत नाही ... रोगट आणि पूर्वग्रह दुषित विचारसरणीने समाजाचे आणि देशाचे काही हित होणार आहे असे ज्यांना वाटत असेल त्यांनी देश सोडला तरी काही हरकत नाही ..एका जातीला कमी लेखून दुसरी जात कधीही श्रेष्ठ होत नसते ...त्यामुळे अशा नीच आणि हुच्च विचारसरणीचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या समाजकंटक वृत्तीचा सर्वांनी यथाशक्ती निषेध करावा ....अजूनही बरेच बोलता येईल पण कायदा त्यांच्या बाजूने असल्याने हात बांधले गेले आहेत .....

No comments:

Post a Comment