Sunday 2 September 2012

पुतना मावशीचे प्रेम ......

दिनांक १०/०८/ २०१२ पासून आपण मराठी चित्रपट सृष्टीचे किती निस्सीम  चाहते आहोत ,मराठी चित्रपटसृष्टीच्या भवितव्याची आणि ऐतिहासिक ठेव्याची आपणास किती काळजी आहे हे दर्शवण्यासाठी लता मंगेशकर यांच्या विरोधात टीकेची झोड उठवून मराठी माणूस कर्तव्यपूर्तीचा आनंद साजरा करत आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने त्यांच्यावर दिवाणी दावा दाखल केला आहे . ज्या "ऐतिहासिक जयप्रभा स्टुडीओ " च्या विक्रीवरून हे रणकंदन चालू आहे त्याचा इतिहास मात्र दुर्लक्षिला जात आहे ...
सन १९३४ मध्ये छ.राजाराम महाराज यांनी " कोल्हापूर सिनेटोन " नावाने सुरु केलेला स्टुडीओ १९४४ साली भालजी पेंढारकर यांनी विकत घेतला ...१९४४-१९४८ कालावधीत उत्तम तऱ्हेने सुरु असलेला स्टुडीओ १९४८ साली गांधी हत्ये नंतर माधवराव बागल यांच्या उपस्थितीत  जाळण्यात आला ... यावेळी कलेपेक्षा जात कशी वरचढ ठरली ? स्टुडीओ जाळल्यानंतर कर्जबाजारी झालेल्या पेंढारकर यांचे कर्ज कमी करायच्या वेळी रसिक प्रेक्षक कोठे होते ? जळालेला स्टुडीओ लता मंगेशकर यांनी विकत घेतला नसता तर भालजी पेंढारकर यांचे काय झाले असते ?? पेंढारकर यांना कर्जातून बाहेर काढून जयप्रभा पूर्ववत करणाऱ्या लता मंगेशकर यांचे आता होत असलेल्या विरोधाच्या तुलनेत कितपत कौतुक झाले ? स्टुडीओ ची दुरवस्था होत असताना ,अत्यानुधिक सोयी सुविधा नसल्यामुळे चित्रीकरण पुण्या -मुंबई कडे जात असताना रसिक प्रेक्षक /महामंडळे कोठे होती ? ज्या स्टुडीओ च्या विक्रीने अस्मितेचा प्रश्न उपस्थित झाला आहे त्या स्टुडीओ ची माहिती साधी " wikipidia " वर लिहिण्याचेही कष्ट कोणी घेतले नाहीत ..चित्रीकरण होत नसताना स्टुडीओ चा पांढरा हत्ती सांभाळणे सोपे काम आहे का ? परंतु या साऱ्या पैलूंचा विचार न करता त्यांच्यावर केवळ टीकेचा भडीमार सुरु आहे .... रसिकांना ऐतिहासिक वास्तूंची इतकीच किंमत असेल तर त्यांनी किंमत मोजून तो स्टुडीओ खरेदी करावा आणि तेथे जे स्थापन करायचे आहे ते करावे ....म्हणजे मंगेश्काराना पैसा मिळेल आणि रसिकांना त्यांची आवडती वास्तू मिळेल ...परंतु यातील काहीच न करता केवळ ऐतिहासिक म्हणून त्याच्यावर शिक्का मारायचा ,सरकारजमा करायची आणि ती वास्तू ढासळत असल्याचे शांतपणे पाहत बसायचे ...त्यामुळे अशा गोष्टीना राजकीय वळण देऊन आपली रसिकता सिद्ध करण्यासाठी पुतना मावशीचे प्रेम दाखवायची काही गरज नाही .....

No comments:

Post a Comment