Saturday 1 September 2012

एका लग्नाची (थोडक्यात संपलेली ) दुसरी गोष्ट


आईक हा शब्द आता कालबाह्य झालाय " लिसन " म्हटल्या शिवाय आता ऐकूच येत नाही ..एखाद्या गोष्टीला उत्तम /छान म्हणायचे असेल तर "बढीया " म्हणल्या शिवाय "कॉम्प्लिमेंट " दिल्या सारखे वाटत नाही ,..आपल्या लगचे /प्रेमाचे किस्से सांगताना "आमच थोड वेगळ आहे " असे - दा बोलल्याशिवाय किस्सा पूर्णच होत नाही , आई -मॉम- ममा यांच्या पंक्तीत "आयडी " हा शब्द मानाने विराजमान झालाय ,प्रेमी युगुलात " बोगनवेल -प्रभूतल्या " इन आहे ,वाहिनीचे "वाहिनुडी " असे नामांतर स्वीकारले गेले आहे ,सतत बौद्धिक देणाऱ्या व्यक्तीस "ज्ञाना " तर कविता करणाऱ्या मुलीस "कुहू " ही नवी टोपण नावे मिळालीत , आता मित्र -मैत्रिणी "पार्टी " करायला जात नाहीत तर "आनंद लुटायला " जातात , लाडक्या व्यक्तीस आता "गब्बू " नावाने हाक मारली जाते...  १६/०१/२०११ या दिवशी सुरु झालेल्या एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेने अवघ्या दीड वर्षात सर्वाना आपलेसे केले आहे ..कॉलेज च्या कट्ट्यावर ,चहा च्या टपरीवर ,फेसबुक च्या वॉल वर ,खेळाच्या ग्राउंड वर ,मिटिंग च्या टेबल वर ,रेल्वे च्या डब्यात आणि एस .टी.च्या गर्दीत अनेकांच्या तोंडी एकच विषय ..." लिसन काल एका लग्नाची मध्ये काय झाले ?" " ज्ञाना सारखा काय बोलतो रे ? " " " घना किती दुष्ट आहे यार " " सगळे पुरुष सारखेच " " मला पण यु .एस .ला जायचं पण माझ्या घरच्यांना पण असेच वाटत असेल काय ?" सर्व आयुष्य आणि चर्चेचे विषय बनलेली "एका लग्नाची दुसरी गोष्ट " आता संपली आहे ....
                         एक मालिका आपणास काय देते ?? मनोरंजन ? वेळ घालवायचे साधन ? चर्चेचा विषय ? का कधी कधी मानसिक त्रास ? पण याचवेळी एखादी मालिका ज्यांना आजीचा सहवास लाभला नाही त्यांना आधुनिक माई आजी देत असेल ,"दिग्या -वल्लभ " सारखे काका "माऊ- वल्ली " सारख्या काकू देत असेल ,ज्ञाना सारखा वैचारिक भाऊ आणि कुहू सारखी नटखट बहिण देत असेल , पपा सारखा मित्र आणि प्राची आत्या सारखी मैत्रीण देत असेल ,श्रीपाद काका सारखा वैचारिक आधार आणि देवकी सारखी आई देत असेल तर घरो घारीच्या घना -राधा ला आणखी काय हवे ?वयाचे आणि वेळेचे बंधन पाळता सर्वच ठरत ही मालिका लोकप्रिय होते आणि आपणही काळेवाडी चा सदस्य असून त्यांच्या सुख दुक्खाशी आपण बांधील आहोत असे नाते निर्माण करून जाते ..खरच या मालिकेचे सर्वच काही वेगळेच होते ...
                           २०१० मध्ये आलेल्या मुंबई-पुणे -मुंबई या चित्रपटाच्या कथेने ,स्वप्नील -मुक्ता जोडीने ,कधी तू या गाण्याने आणि पुणे विरुद्ध मुंबई या उत्तरोत्तर रंगत जाणाऱ्या खुमासदार वादाने रंगलेला चित्रपट पुढे काय होणार ? असा प्रश्न उपस्थित करून संपतो ...त्यामुळे या चित्रपटाच्या पुढच्या भागाची सार्वानाच प्रतीक्षा होती पण सर्वाना सुखद धक्का देत त्यांचे झालेले लग्न आणि लग्ना आधीच्या /नंतरच्या मजा किंवा पुणे -मुंबई संस्कृतीतील फरक यापुरताच विषय मर्यादित   ठेवता ,सध्याच्या तरुण पिढीपुढे लग्न करताना निर्माण होणाऱ्या समस्या त्यावरील उपाय म्हणून "contract marriage " कडे पहायचा त्यांचा दृष्टीकोन असा आव्हानात्मक विषय मालीकारुपात यशस्वीपणे मांडण्यात दिग्दर्शक -कलाकार यांना यश आले आहे ..मालिका म्हंटले की सासू -सून यांची भांडणे ,नायक -नायिका याचे विवाहबाह्य संबंध ,असाध्य रोगांशी सुरु असलेला साध्य लढा ,पुनर्जन्म ,खानदानी /घरभेदी शत्रू -त्यांची कट कारस्थाने आणि त्यानंतर दिल्या जाणाऱ्या "शिक्षा " हा सध्याचा मराठी मालिकांचा प्रवाह एका लग्नाची ने भांडणे -भानगडी -शिक्षा टाळून  मोडला आहे ...
                               ६२ मुली नाकारणारा घनश्याम आणि ७२ मुले नाकारणारी राधा या मूळ पात्रांवर आधारित मालिका ..दोन भिन्न स्वभाव ,विचार,ध्येय  ,आवडी -निवडी , आयुष्याबद्दलची मते आणि जगण्याची पद्धत ,कौटुंबिक पार्श्वभूमी असलेले घनश्याम -राधा एकत्र आल्यावर त्यांच्या आयुष्यात होणारे बदल म्हणजे एका लग्नाची ....ते बदल दाखवताना पाणी पुरी खायचा प्रसंग ,राधा चा स्वयंपाक करायचा प्रसंग ,घना -राधा जवळ येण्याचा प्रसंग आणि नंतरची त्यांची मानसिकता या  लहान लहान प्रसंगाचा खुबीने वापर केला आहे ... त्यांच्यातील अव्यक्त प्रेमापासून ते वैचारिक मतभेदापर्यंत सर्व काही सामंजस्यपूर्ण  आणि नैसर्गिक वाटते ... कोठेही कृत्रिमपणा आणायचा प्रयत्न केला नसल्याने प्रेक्षक मालिकेशी समरस होतो आणि विशेष प्रसंगी कानावर पडणारे "तुझ्या विना " हे गाणे अनेकांच्या भावनेला हात घालते ...या मालिकेतील सर्वच पात्रांचे काम मोजके आणि समर्पक होते ...कोणत्याही पात्राचा कंटाळा येणार नाही तसेच काही सेकंद साठी का असेना एका भागात मालिकेतील जवळपास सर्व पात्रे दाखवण्याची दक्षता दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी  घेतली होती ..मालिकेची गरज म्हणून घेतलेली "माउली- मानव -सोनिया -अभिर " हे आपले छोटेखानी काम खुबीने करतात ..वास्तविक  " contract marriage " सारखा आधुनिक विषय हाताळताना दिग्दर्शकास पंचतारांकित  कुटंब दाखवणे सहज शक्य होते कारण असे प्रकार मोठ्या घरात होतात असा सामान्य जणांचा अंदाज असतो पण तुळशी कट्ट्याने सुरु होणारी काळे वाडी आणि जुन्या धाटणीचे घर दाखवल्याने   मनस्विनी ने सोपे -नैसर्गिक संवाद लिहिल्याने ही कथा आपल्याच परिचयाच्या कोणत्या तरी घरात घडत असून आपणही त्याचा एक भाग आहोत ही भावना प्रेक्षकास मालिकेशी बांधून ठेवते ....
                            हिंदी /मराठी वाहिन्यांवर अनेक मालिका ठराविक विषय घेऊन सुरु होतात पण जसा प्रेक्षकांचा प्रतिसाद वाढेल तशी  कथा वाढवली जाते आणि मालिका भरकटते ..जसे आमटी सुंदर झाली आहे असे कोणी म्हंटले की ती सर्वाना बरेच दिवस पूरवठी पडावी म्हणून त्यात पाणी ओतत राहायचे आणि मूळ चव कायम आहे अशा भ्रामक समजुतीत वरपत राहायचे ...मालिका यशाच्या शिखरावर असताना ,लोकांची रुची कायम असताना आणि अजून मालिकेचा कंटाळा आला नसताना मालिका थांबवण्याचा निर्णय स्तुत्य आहे ..कारण आमटी असो मालिका आवडते म्हणून रोज घेतली की त्याचे एक दिवस अजीर्ण होते ...त्यामुळे मूळ विषयची चव अजून जिभेवर रेंगाळत असताना मालिका बंद करण्याचा निर्णय  चव आणखी वाढवणारा आहे ...अनेक वर्षे लक्षात राहील ही गोष्ट ..काही महिने सवई नुसार .३० ला टी.व्ही . लावण्यात येईल , आता कोणती मालिका पहायची याचा शोध घेण्यात येईल ,देवकी काकू चा परिचित स्वर अनेकांना पुन्हा ऐकावासा वाटेल आणि कालांतराने प्रेक्षक नव्या मालिकेशी समरस hotil पण एका लग्नाची (थोडक्यात sampleli  ) दुसरी गोष्ट या मालिकेची उणीव नक्कीच  भासत   राहील ...कारण या मालिकेत नक्कीच काहीतरी  "वेगळ होत

3 comments:

  1. wa,saglyanchya manat ya malikebaddal je aahe te mast utaravlas ya lekhatun.mast.

    ReplyDelete
  2. ekdam majhya manatala bolalas.....may be mahagadi starcast suddha malika na rakhadawanyacha karan asu shakel...kahi ka asena changala badal ahe ha marathi serials making madhye...Unch maza zoka suddha ashich na rakhdawata chalu ahe....mast watate bore na karanarya malika....

    ReplyDelete