Thursday 8 March 2012

महिलांचा लढा.....महिलांचा दिवस !!

" अपनी जगह से गिरकर

काहीके  नही रहते

केश ,औरत और नाखून

अन्वय करतेथे किसी श्लोक का ऐसे

हमारे संस्कृत टीचर

और मारे डर के जाती थी

हम लडकिया अपनी जगह पर !!

जगह ? जगह क्या होती है?

यह वैसे जान लिया था हमने

अपनी पेहली  कक्षा  मै ही

याद था हमे एक एक अक्षर आरंभिक पाठोन्का

" राम पाठशाला जा -राधा खाना पका

राम आ बताषा खा - राधा झाडू लागा

भैया अब सोयेगा -जाकर बिस्तर बिछा

आहा नया घर है

राम देख यह तेरा कमरा है

"और मेरा ?"

ओ पगली

लडकिय हवा धुप मिटटी होती है

उनका कोई घर नहीं होता

जिनका कोई घर नहीं होता

उनकी भला होती है कोनसी जगाह??



कवितेच्या काही ओळी बरेच काही बोलून जातात ,समाजाची मानसिकता स्पष्ट करतात ,शब्दांनी मनावर किती खोलवर आघात होतात ते सांगून जातात ,स्त्रियांविषयी इतकी वर्षे आणि काही अंशी आजही काय विचार करण्यात येतो बोलून जातात ,स्त्रियांचे समाजातील (चुकीचे )स्थान अधोरेखित करून जातात ....या ओळी एका स्त्रीनेच लिहिल्या असल्याने त्यास वेगळे महत्व येते ...आजपर्यंत स्त्रियांवर कळत नकळत किती अन्याय झाला आहे सांगून जातात ...आणि आजपर्यंत खरच आपण .आपल्या समाजाने स्त्रियांना त्यांच्या हक्काचे आणि योग्यतेचे काहीच दिले नाही याची खंत मनास देऊन जातात ...

                     हिंदुस्तान ! वैदिक संस्कृतीचे माहेरघर ...देव भूमी ..पुण्य भूमी ! या भूमीतल्या कितेक पंडितांनी आपल्या पंडीत्याने जगाला स्मितीत करून सोडले अशा पंडितांच्या ध्यानी स्त्रीशक्ती येऊ नये आश्चर्य आहे न ? याच देशात दोन स्त्रियांवरील अत्याचारामुळे ,अपमानामुळे रामायण आणि महाभारत घडले तरी अन्यायी आणि अत्याचारी वृत्तीचा नाश न होता अजूनही स्त्रिया अत्याचार सोसत आहेत ? वैदिक काळाच्या सुरुवातीला पतंजली यांच्या म्हणण्या नुसार स्त्रियांना शिक्षणात समान स्थान होते ...मैत्रेयी, गार्गी यांनी ते सिद्धही केले होते ..पण त्यांच्याच वंशज असणाऱ्या स्त्रियांना अनेक शतके शिक्षणाची दारे बंद व्हावीत ? देवांची माता अदिती , ,सरस्वती दुर्गा ,काली इत्यादी स्त्रियांची मनोभावे पूजा करत असताना घरातील स्त्री ची मात्र खेटराने पूजा बांधावी ? पुरुषाने भोगवादी जीवन कंठावे आणि मरून जावे आणि जाताना कोवळ्या वयात लग्न झालेल्या लग्नाचा अर्थही माहित नसलेल्या बालिकेस सती म्हणून सोबत घेऊन जावे ? स्त्रियांस विनाकारण पडदा पद्धतीमध्ये अडकून ठेवावे ? एखाद्या स्त्रीस "देवदासी " करून आयुष्यात कष्टांचे डोंगर उभे करावेत ? या घटना आपल्याच देशात झाल्या याचे राहून राहून आश्चर्य वाटते ....कितेक कर्तुत्ववान स्त्रिया आपल्या देशात या आधी होऊन गेल्या....देल्ही चालवणारी रजिया सुलतान असो, गोंड राणी दुर्गावती असो ,आम्रपाली असो,कृष्णभक्त मीराबाई असो  किंवा अगदी आताच्या काळातील जिजाऊ असो....पुरुषांच्या बरोबरीचे किंवा पुरुशाहुनही श्रेष्ठ असे कर्तुत्व करूनही कवितेतील "लडकीया  हवा धुप मिटटी होती है उनका कोई घर नहीं होता जिनका कोई घर नहीं होता उनकी भला होती है कोनसी जगाह??" अशी परिस्थिती राहिली याचा राहून राहून खेद वाटतो....

                     घोर साचलेल्या अंधारात प्रकाशाची एक तिरीप महत्वाची वाटते ...ती एक सुरुवात असते ...काळोखाच्या अंताची ,लक्ख प्रकाशाची ,उज्वल भविष्याची आणि एका नव्या आयुष्याची ....स्त्रियांवरील या अत्याचारांना वाचा फुटल्याने आणि अनेक समाजसेवकांनी समाजाच्या ,कर्मठपणाच्या विरोधात जाऊन अतुलनीय कार्य केल्याने आजच्या स्त्रीचे काही अंश तेवा दिसायला लागले....राजा राम मोहन रॉय यांनी १८२९ साली संमत करून घेतलेला सती बंदीचा कायदा असो किंवा ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी १८५६ मध्ये संमत करून घेतलेला पुनर्विवाहाचा कायदा असो वा मोहमद अली जिना यांनी १९२९ साली संमत करून घेतलेला बालविवाहाचा कायदा असो...हे कायदे म्हणजे भारत पारतंत्र्यात असूनही स्त्रियांना स्वातंत्र्य मिळाल्याचे समाधान देणारे होते ...अनेक वर्षांच्या रूढी ,परंपरा,बुरसटलेले विचार ,शास्त्रांचा आणि स्मृतींचा आपल्या सोयीनुसार काढलेला अर्थ, विनाकामाचा कर्मठपणा यांची जळमटे काढून त्यांना मुक्त केल्याचे श्रेय त्या समाजसुधारकांना द्यावेच लागेल.. त्यामुळेच मला कधी कधी  प्रश्न  पडतो इतका कर्मठपणा कवटाळून मिळवले काय ? एकट्या मनुस्मृतीला दोष देऊन स्वतः नामानिराळे राहण्याचे कर्तुत्व गाजवण्यात कोण मोठा शहाणपणा ?मनुस्मृती हि काही फ़क़्त स्त्रियांवर बंधने लादण्यासाठी लिहिली न्हवती ...त्यात जे काही नियम होते ते त्या काळासाठी योग्य होते कालांतराने त्यात सुधारणा होण्याची गरज होती ती झाली नाही यात दोष कोणाचा ? मनुचे काही श्लोक सांगतो -

.शोचन्ति जामयो यत्र विनश्यत्याशु तत्कुलं ! न शोचन्ति तु यत्रैता वर्धते तधि सर्वदा !! (जेथे स्त्री शोक करते ते कुळ त्वरित नाश पावते ,जेथे स्त्री शोक करत नाही ते कुळ वैभवाला जाते )

२.जमायो यांनी गेहानी शपन्त्य प्रती पूजिताः ! ता नि कृत्याहातानीव विनश्यति समन्ततः !!( ज्या घरात स्त्रियांचा छळमुळे तळतळाट होतो ते घर पिशाच्यानी बाधित झाल्याप्रमाणे सर्वस्वी नाश होते .

३.तस्मादेतः सदा पूज्या भूषनाच्य दानशणै : !भुतिकमैनरैनित्यं सत्करेषुत्सवेषु च !! (ज्या पुरुषाला आपले व आपल्या कुटुंबाचे कल्याण व्हावे वाटते त्याने सदैव कुलस्त्रीयाना आदरणीय  मानून त्यांची अलंकार ,वस्त्रे ,चांगले खाद्य पदार्थ देऊन पूजा करावी ,उत्सव प्रसंगी त्यांचा सत्कार करावा )

यावरून हे   सिद्ध होते कि धर्माचे अनुयायी आपल्या स्वार्थासाठी धर्माचा आणि रुढींचा कसा वापर करून घेतात ....१८५२ साली फुले यांनी लावलेल्या शाळा रुपी रोपट्याचे रुपांतर आज भारताच्या सर्वोच्च पदी आणि लोकसभेच्या अध्यक्षपदी एका महिलेची निवड झाल्याने वटवृक्ष झाला आहे ...मध्यंतरीच्या काळात लक्ष्मि बाई,कित्तूर चेन्नामा ,लक्ष्मि सेहगल ,सरोजनी नायडू ,भिकाजी कामा ,आनंदीबाई जोशी यांसारख्या स्त्रियांनी कर्तुत्वाची परंपरा मानाने फडकवत ठेवली ...

          स्वातंत्र्या नंतर स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात आणि प्रत्येक आघाडीवर जी भरीव कामगिरी केली आहे त्यातील काही स्त्रियांची नवे इथे लिहिली तर इतरांचे श्रेय आणि कष्ट कदाचित नाकारल्यासारखे होतील...कारण राष्ट्रीय -अंतर राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध नसलेली पण "बाटली मुक्त गावासाठी " सक्षम पणे लढणारी स्त्री हि सुद्धा कार्तुत्वावानाच नाही का ? अभिनयापासून राजकारणापर्यंत ,कले पासून क्रीडे पर्यंत ,समाजकारणापासून अर्थकारणा पर्यंत ,लेखीकेपासून पत्रकारीतेपर्यंत अनेक क्षेत्रात कर्तुत्वाचे मानदंड स्त्रियांनी घालून दिले आहेत ...हे गुण ,चिकाटी.कौशल्य ,बुद्धिमत्ता स्त्रियांच्या अंगी न्हवतीच का ? निश्चितच होती पण त्याला वाव नाही मिळाला ...स्त्रियांकडून फ़क़्त अपेक्षा केली गेली...मुलगी म्हणून मायेची ,बहिण म्हणून त्यागाची ,मैत्रीण म्हणून आधाराची ,प्रेयसी म्हणून प्रेमाची ,पत्नी म्हणून  सुखाची...पण तिच्या मनाचा आणि गुणांचा विचार फार कमी वेळा झाला आणि जेव्हा तो झाला तेवा कितेक शतके निघून गेली होती...काळ बदलला वेळ बदलली समाज कितीही पुढारलेपणाचे नाटक करत राहिला तरी समाजाची मानसिकताही तीच राहिली परिणामी स्त्रियांवरील अत्याचार चालूच राहिले फ़क़्त प्रकार बदलले ...२००९ साली बलात्काराच्या २१,३९७ तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत...म्हणजे जवळपास ५३ बलात्कार रोज होतात ,लैंगिक छळ च्या महाराष्ट्रात ११८० तक्रारी नोंद आहेत ,भारतात आजही हुंड्या साठी १ विवाहिता दर तासाला जाळली जाते २०१० मध्ये ८३९१ घटनांची नोंद आहे ..आणि हुंड्याचे दरही मुलाच्या शिक्षणा नुसार ठरतात शेतकरी असेल तर १ लाख आणि आई.ए,एस असेल तर ५० लाखापर्यंत ( मध्ये झालेले स्टिंग ओप्रेशन पहिले असेलच ) ...स्त्रीभ्रूण हत्या हा तर सर्वात चिंतेचा विषय आहे ..अशिक्षित अशिक्षित म्हणून तर अतिशिक्षित अतिशिक्षित म्हणून स्त्रीभ्रूण हत्या करतातच..."लेनसेट "या नियतकालिकात टोरांटो विद्यापीठाने केलेले एक सर्वेक्षण प्रसिद्ध झाले आहे ...त्यांच्या मतानुसार गेल्या ३ दशकात भारतात ४२ लाख ते १ कोटी २१ लाख स्त्री भृणांची हत्या झाली आहे ..परळीला मुलींचे गर्भ रस्त्यावर फेकून द्यायची घटना तर क्रौर्याची परिसीमा गाठणारी होती ...त्यामुळे स्त्रियांसमोर आव्हाने आजही आहेत पण बऱ्याच सामाजिक संघटना मुळे,सामाजिक कार्यकर्त्यांमुळे ,कडक नियमांमुळे आणि स्वतः स्त्री सक्षम झाल्याने हा लढा थोडा सुसह्य झाला आहे असे म्हणायला हरकत नाही ..

         सुरुवातीची कविता  आणि वरची परिस्थिती वाचल्यावर ,अनुभवल्या वर ,कल्पना केल्यावर अणि वास्तव किती भयंकर असेल याचा अंदाज बांधल्यावर अंगावर सरसरून काटा येतो....जन्मापासून ते मृत्यु पर्यंत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे गुलामगिरीत बांधल्या गेलेल्या ,अपेक्षांच्या भराने वाकलेल्या ,मर्यादेच्या साखळदंडाने बांधलेल्या ,हेटाळणी ने गांजलेल्या ,पुरुषी अहंकारापुढे काही प्रमाणात झुकलेल्या आणि इतके असून आज जगावर राज्य करणाऱ्या ..स्त्रियांचे जीवन हे एखाद्या नदीसारखे असते ..कोणी वंदा कोणी निंदा आपले कार्य चालूच असते ...१९०९ पासून चालू झालेला स्त्रीदिन खरेतर मोठ्या उत्साहाने साजरा करायला हवा ...कारण स्त्री अशी एक गोष्ट असते  जिला आपण  नेहमीच "गृहीत " धरतो....तिच्या मनाचा ,भाव विश्वाचा ,मानसिकतेचा आणि अपेक्षांचा क्वचितच विचार करतो ..आज स्त्रियांनी जे सामाजिक स्थान प्राप्त केले आहे त्यामागे शतकांचा लढा आहे ,सहन केलेला अन्याय आहे , त्यागाची परिसीमा आहे आणि पुरुषी मक्तेदारीचा केलेला पराभव आहे ...म्हणूनच असावा एक स्त्रीदिन .....स्त्रियांच्या मायेला ,प्रेमाला,आपुलकीला ,कर्तव्याला,धीराला ,खंबीरतेला ,चातुर्याला ,बुद्धीला ,शौर्याला ,आणि कर्तुत्वाला सलाम करण्यासाठी..... 

No comments:

Post a Comment