Monday 12 March 2012

१९ वर्षे न्यायाच्या प्रतिक्षेची !!

१२ मार्च १९९३ ! भारतीय लोकशाही ,समाजजीवन , अहिंसा ,शांतता या सर्वाना छेद देणारा ....भारताच्या सुवर्ण  इतिहासाची काळसर किनार !! आणि एका मोठ्या आणि निंद्य घटने नंतर लागोपाठ घडलेली हिडीस घटना ...६/१२/१९९२ ला बाबरी मशीद पडल्या नंतर लगेचच ३ महिन्यात मुंबई मध्ये बॉम्ब स्फोट घडवून आणणे म्हणजे देवासाठी माणसाना मारण्यासारखे आहे ...हे स्फोट का झाले ? याच्या मागे कोण होते ? कोणी घडवून आणले ? यामागचा हेतू काय होता ? हे सर्व माहित असूनही १९ वर्षे खटल्याचे मुख्य आरोपी सापडत नाहीत आणि त्यादृष्टीने ठोस आणि वास्तवात पावले उचलली जात नाहीत हा भारतीय लोकशाहीचा ,न्याय व्यवस्थेचा ,तपास यंत्रणेचा ,सर्वच राजकीय पक्षांचा आणि या राजकीय पक्षांकडे देशाची सूत्रे देऊन स्वतः निवांत बसणाऱ्या मतदारांचा हा दारूण पराभव आहे ...आणि या पराभवाचे पडसाद पुढील कधी दशके उमटतील हे सर्वाना माहित असतानाही तेरी भी चूप या प्रकारे जे कार्य चालू आहे ते लज्जास्पद आहे !! 
             मुंबई ! महाराष्ट्राची राजधानी ..देशाची आर्थिक राजधानी आणि २१ साव्या शतकातील "सोन्याचे अंडे देणारी कोंबडी "....अशा या मुंबई मध्ये १२ मार्च १९९३ रोजी झवेरी बझार, प्लाझा सिनेमा ,सेनचुरी बझार, एअर इंडिया इमारत ,काठा बझार, सी रॉक हॉटेल ,सहारा एअर पोर्ट ,हॉटेल जुहू ,प्लाझा थेटर ,लकी पेट्रोल पंप (शिवसेना भवन जवळ ) ,वरळी, बॉम्बे स्टोक ,पासपोर्ट ऑफिस या ठिकाणी झालेले साखळी बॉम्बस्फोट माणुसकीला काळिमा फासणारे होते ...या भीषण स्फोटात २५७ लोक मरण पावले तर ७१३ लोक जखमी झाले ...एकूण १९३ जणांना अटक ,पैकी २७ टाडा कोर्ट ने सोडले ,दाउद,मेनन सह ३० जण  फरारी ,१२ आरोपींना फाशी ,२० आरोपींना  जन्मठेप ,तिघांना १४ वर्षे ,एकाला १३ वर्षे ,१२ जणांना १० वर्षे ,चौघांना ९ वर्षे ,चौघांना ८ वर्षे ,सात जणांना ७ वर्षे ,पंधरा जणांना ६ वर्षे ,15 जणांना  ५ वर्षे आणि पाच जणांना ३ वर्षे अशी शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे ....गांधीगिरी शिकवणारा संजय जामिनावर आहे ..हे सर्व छोटे मासे आहेत..खटल्यातील  मुख्य आरोपी दाउद आणि मेनन अजूनही फरारी आहेत हि चिंतेची बाब आहे ..कारण १९९३ नंतर भारतात जे काही अतिरेकी हल्ले ,घातपात झाले .बॉम्ब स्फोट झाले त्यात यांचा प्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष सहभाग कायम राहिला आहे ...हातात असणारा अगणित पैसा ,राजकारण्यांची साथ ,आणि भरकटलेल्या तरुणांच्या अस्थिर मनाचा फायदा घेण्याची विकृत कला यांच्या मिलाफाने भारतात घातपात करण्यात हे यशस्वी होतात ...असे असतानंही दाउद ने अमेरिकेच्या व्हाइट हाउस वर हल्ला करावा ,मग अमेरिकेने पाकिस्तानात /दुबई येऊन लादेन /उद्दाम सद्दाम सारखे दाउद ला मारावे आणि आपल्या बुडाखाली लागलेली आग अटलांटिक समुद्राच्या खाऱ्या पाण्याने विझवावी अशी दिवास्वप्ने पाहत वर्षे काढायची .....
            मुंबई वरचा हल्ला  करणारे किंवा स्फोटात सहभागी असेलेले सर्व मुस्लीम आहेत ....मेनन ,दाउद ,शोऐब घन्सार ,अस्घर मुकादम ,शहानवाझ कुरेशी ,अब्दुल घनी तुर्क ,परवेझ शेख ,नसीम बरमारे ,मुश्ताक तरानी इत्यादी....१९९३ चा हल्ला असो वां आजपर्यंत झालेला कोणताही घातपाती हल्ला असो ( साध्वी प्रज्ञा चे काढलेले तुम सोडले तर ) सर्व हल्ल्यात मुस्लिमांचा सहभाग ठळकपणे दिसून येतो...त्यांचा हल्ल्यातील सहभाग ,राष्ट्रगीत न म्हणायची मस्ती , पाकिस्तानचे झेंडे फडकवायची मुजोरी अशा घटना पहिल्या कि भारतास ते आपला देश मानतात कि नाही असा प्रश्न पडल्या खेरीज राहत नाही....धर्मांध घरात जन्मलेला ,मदरशात वाढलेला ,मशिदीत रमलेला आणि मुल्ला /मौलवी यांच्या "धर्माच्या " प्रसाराने आणि प्रचाराने भरकटलेला मुस्लीम समाज ...अर्थात सर्व समाजाला नावे ठेवायचे कारण नाही ..जिना पासून कलाम पर्यंत  सन्माननीय अपवाद आहेतच...परंतु बहुसंख्य मुस्लीम समाजात जिहाद या नावाखाली जे काही चालू असते ते शांतता आणि मुस्लीम धर्म विघातक आहे ..कारण कुराण मध्ये जिहाद म्हणजे एखाद्या गोष्टीविरुद्ध केलेला सर्वोत्तम लढा असे वर्णन आहे ...पण आपल्या सोयीचा अर्थ सांगून तरुणांना उत्तेजित करण्यात येते ..कोणताही धर्म दुसर्या धर्माचा अनादर करायला सांगत नाही ,हिंसा शिकवत नाही किंवा करायला भाग पडत नाही....धर्माचा आणि धर्माच्या शिकवणीचा मुख्य हेतू असतो तो समाजातील विघातक आणि विनाशक वृत्तींचा नाश करून शांतता प्रस्थापित करणे ...पण माणसाची जेवा धार्मिक कडून धर्मांध कडे वाटचाल सुरु होते तेवा धर्मात सांगितलेली तत्वे आणि केलेले संस्कार गळून पडतात आणि सुरु होतो तो संहार..... त्यामुळे ९३ च्या हल्ल्यातील मुख्य आरोपींना त्यांच्या धर्माचा ,जातीचा विचार न करता अटक करून शासन झालेच पाहिजे ...कारण धर्माचे नाव घेऊन ते धर्मविरोधी वागत आहेत आणि स्वधर्मीय लोकांकडे संशयाची ए.के .४७ रोखत आहेत ....यावर शासनाने आणि सर्व धर्मीय प्रमुखांनी विचार करायला हवा....९३ च्या स्फोटात मृत्युमुखी  पडलेल्या सर्वाना श्रद्धांजली "संभाजी  " या कादंबरीत एक सुंदर वाक्य आहे "कर्जाची बाकी, विस्तवाचे न विझलेले निखारे आणि शिल्लक शत्रू या तिन्ही गोष्टी वाढत जातात आणि अंती धोकादायक ठरतात " हे सरकार ला समजेल का ? आणि १९ वर्षानंतर न्याय मिळेल का ?

2 comments:

  1. वैद्य अंकुर र. देशपांडे, सप्रेम नमस्कार आणि नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
    आपला वरिल लेख "१९ वर्षे न्यायाच्या प्रतिक्षेची !!" आवडला. परंतु त्यात आपण "जिना पासून कलाम पर्यंत सन्माननीय अपवाद आहेतच" असे म्हंटले आहे यातील जीना हे जर भारताच्या फाळणीतील एक शिल्पकार जीना असतील तर आपण या वाक्याचा पुनश्च विचार करावा. त्या बॅरिस्टर जीनाने "प्रत्यक्ष कृती"ची हाक देउन हिंदू समाजावर जे अनन्वित अत्याचार केले त्याला तोड नाही.
    तसेच "धर्माचे नाव घेऊन ते धर्मविरोधी वागत आहेत" हे वाक्य तात्विकदृष्ट्या चुकीचे आहे. 'सुहास मजुमदार' यांचे "जिहाद" हे पुस्तक वाचल्यास लक्षात येइल की हे सर्व आतंकवादी हे 'त्यांच्या' धर्मानुसारच वागत आहेत.
    असो, आपण चांगलं लिहिता, मनापासून लिहिता, ते अविरत चालू ठेवा. माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा.
    प्रसाद करकरे
    मुंबई

    ReplyDelete