Thursday 1 March 2012

जेव्हा iron tablet मध्ये iron सापडते

भारतीय समाज व्यवस्थेत आणि वैद्यकीय क्षेत्रात "वैद्यांची " जागा "डाक्टर "ने घेतल्यापासून समाजातील बहुन्तांशी वर्गाचा आणि जवळपास सर्वच डाक्टर वर्गाचा वैद्याकडे आणि आयुर्वेदाकडे पहायचा दृष्टीकोन नकारात्मक रीतीने बदलला ...अमी जे करतो ते पूर्व आणि पुण्य ...आयुर्वेदिक वैद्य करतो ते पश्चिम आणि पाप असा समज सर्वांचाच झाला ...पण काळ हे सर्वांचेच औषध असते ...काळाच्या महिम्याने पुन्हा जगाला आयुर्वेदाची महती समजायला लागली आणि पुन्हा जग  आयुर्वेदाकडे आकर्षिले गेले ..तरीखी काही खडूस आणि संकुचित विचारसरणीचे लोक संधी मिळेल तिथे  आयुर्वेदावर टीका करायला तयारच असतात ...म्हणजे पदवी मिळाल्यावर आपल्याला आयुर्वेदावर बोलायचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि अमी तो पार पडणारच अशा अविर्भावात हे लोक वावरत असतात...आम्ही जेवा एखाद्या हॉस्पिटल मध्ये कामासाठी जातो तेवा ते प्रत्यक्ष काही बोलले नाहीत तरी त्यांची कुत्सित नजर बरेच काही बोलून जाते ... त्यांचे "आयुर्वेदिक औषध ला इफेक्ट नसतो तर साइड  इफेक्ट कोठला असणार ?" असा प्रश्न निश्चितच मेंदूकडे जाणारा रक्ताचा प्रवाह वाढवतो आणि त्यामुळे होणारी "प्रतिक्षिप्त " क्रिया थांबवण्यास फार कष्ट घ्यावे लागतात...

                   या सर्वांचा आक्षेप आयुर्वेदाच्या औषध  निर्माणावर असतो....आयुर्वेदात काही औषधात धातू वापरले जातात ...त्यामुळे मानवाच्या शरीरावर वाईट परिणाम होतात ,मूत्रपिंड निकामी होतात इत्यादी इत्यादी ...अजूनही ब्रिटीश इत्यादी देशात आयुर्वेदाच्या "धातू" कल्पना मान्यता नाही ... याचवेळी तुमच्या "स्टेरोईड्स" चे काय हो ? असा प्रश्न विचारला कि तुमच्या बँकेचा खाते क्रमांक सांगा असा विचारल्यासारखे  चिडतात आणि अंगावर धावून येतात ...आयुर्वेदात जरी धातूंचा अगदी महाविशांचा वापरही काही औषधात केला आहे ...पण अनेक क्रिया करून त्यातील वाईट गुण हे काढून टाकलेले असतात ....त्यामुळे मानवी शरीरावर त्याचा कोणताही वाईट परिणाम झाल्याचे अजून तरी निदर्शनास आलेले नाही....पण पटले तर मग कसे ? याचा प्रत्यय मध्यंतरी "सकाळ" वृतापात्रामध्ये "वाचकांच्या " प्रतीक्रीयेमधून आला...एका क्ष (alopathic ) डाक्टर आणि य (आयुर्वेदिक ) वैद्य यांच्यातील वैचारिक लढा आणि पर्यायी दोन शास्त्रातील लढा पाहायला मिळाला ...यातून अजूनही लोकांची आयुर्वेदाविषयी असलेली मानसिकता बदललेली नाही का ? अशी शंकाही मनात उपस्थित झाली.....
                  आयुर्वेदात "सामानाने सामानाची वृद्धी होते " असा एक सिद्धांत सांगितला आहे ..म्हणजे समज मांस धातूचा क्षय झाला असेल तर मांस/उडीद इत्यादी समान गुणाच्या पदार्थांचे सेवन केले असता तो क्षय भरून निघतो असे साधे सोपे तत्व आहे ..... सध्या जगात बराच पसरलेला anemia याला आयुर्वेदाच्या परिभाषेत "पांडू रोग " म्हणतात आणि याच्या चिकित्सेत नवायास लोह ,वंग भस्म, ताम्र भस्म ,कासीस भस्म ,आरोग्यवर्धिनी,सुतशेखर ,मंडूर वटक यांसारखे कल्प सांगितले आहेत ..पांडू कमी करण्यासाठी "लोह " हा महत्वाचा धातू मानला आहे ..लोह म्हणजे सामान्य भाषेत "लोखंड ".... आयुर्वेदात पांडू रोगासाठी जे कल्प सांगितले आहेत त्यातील एकही कल्प "लोह चुंबकाकडे आकर्षित झाला आहे "असे ऐकले आहे का ? कारण जर एखाद्या घटकात "धातू" असेल तर तो चुंबकाकडे आकर्षित झाला पाहिजे न ..पण हि किमया विदेशी औषधांनी सध्या करून दाखवली आहे ... सामानाने सामानाची वृद्धी होते न ? मग iron वाढवायचे आहे न मग घाल iron......XOLUFER- XT या गोळीमध्ये 117 MG FREE METALLIC IRON PARTICLES सापडले आहेत जे लिहिलेल्या प्रमाणापेक्षा १९३% जास्त आहेत....म्हणजे हि गोळी लोह चुंबक जवळ ठेवली तर चुंबकाकडे आकर्षिली  जाते...FDA चे सूत्र सांगते "SUCH TABLETS CAN DAMAGE ONE'S KIDNEY ,LIVER BESIDES CAUSING INTERNAL INJURIES " आता यावर काय बोलायचे ??

                कोणतेही शास्त्र हे कधीच वाईट किंवा मागासलेले नसते ...कोणत्याही शास्त्राचा अनुयायी प्रगत किंवा अप्रगत असतो...ते शास्त्र विकसित करण्यासाठी त्याच्या मूळ पुरुषांनी प्रचंड कष्ट आणि संशोधन केले असते ....त्यामुळे त्यांचा  आदर प्रत्येकाने केला पाहिजे ..प्रत्येक शास्त्रास काही मर्यादा आहेत त्या मर्यादांचा स्वीकार करून राहिलेली मोकळी जागा दुसर्या शास्त्राच्या मदतीने भरून काढली पाहिजे ...शास्त्र कोणतेही असो अंतिम उद्देश असतो मानवजातीचे कल्याण आणि हे करत असताना एकमेकावर दोषारोप करत बसणे हे निश्चितच भूशावः नाही.....दुसर्यावर टीका करताना आपल्या मध्ये काय चालू आहे हे पाहण्याचा चिकित्सकपणा आणि दुसर्या शास्त्रातील चांगल्या गोष्टींचा स्वीकार करण्याचा मोठेपणा जेव्हा प्रत्येकाच्या अंगात येईल ( हा नियम  सगळ्याच शास्त्राच्या व्यायासायीकाना लागू आहे )तेव्हाच " सर्वे सन्तु निरामयः " हा हेतू साध्य होईल आणि मानवजातीचे कल्याण होईल .....

No comments:

Post a Comment