Friday 23 March 2012

व्यर्थ गेले का बलिदान ?

आयुष्य किती जगले यापेक्षा ते कसे जगले यास अनन्य साधारण महत्व आहे .... लाचारीने प्राणांची भिक मागून आणि आयुष्याला सुद्धा आयुष्याचा कंटाळा येई पर्यंत जगणे यात काय तो मोठेपणा ? स्वताच्या देशासाठी , स्वातंत्र्यासाठी , ध्येयासाठी आपल्या सर्वस्वाचा आणि आयुष्याचा सुद्धा त्याग करणे यात खरे मोठेपण .... भारताच्या स्वातंत्र्यासाठी कोवळ्या वयात स्वताच्या प्रांणांची आहुती देणाऱ्या भगतसिंग ,राजगुरू आणि सुखदेव यांची आज " दुर्लक्षित " जयंती ..... कारण स्वतंत्र भारतात ज्या लोकांच्या पश्चात जयंती साजरी करण्याचे भाग्य  मिळते त्या यादीत  या ३ नावाना किंवा कोणत्याही "जहाल " मतवादी नेत्यास स्थान नाही .... अहिंसा आणि उपोषणाने षंढ केलेल्या समाजास "सशस्त्र क्रांतीचे " झणझणीत अंजन सोसेल कसे ? मतांचे राजकारण होत नसल्याने सरकारला त्यांचे महत्व समजेल कसे ? २ गल्लीच्या दादाची पोस्टरे लाऊन गाव घाण करणाऱ्या कार्यकर्त्यांना या वीर पुरुषांची पोस्टरे लावायची समज येणार कसे ? १/२ नग्न नट्यांचे पूर्ण पान फोटो छापणाऱ्या वृत्तपत्रास यांचा फोटो छापायला सांगणार कोण ? अरे का केले यांनी बलिदान ? का स्वातंत्र्याच्या धगधगत्या कुंडात आपले देह हसतमुखाने झोकून दिले ? व्यर्थ गेले का बलिदान . ?
           

               नाही बोलणार त्यांच्या कार्या विषयी , नाही उलगडणार त्यांचा जीवनपट , नाही मांडणार त्यांची मते , नाही सांगणार त्यांचे महत्व कारण आम्हाला जाणूनच घ्यायचे नाही ....आमची तशी इच्छाच नाही ....कारण भारतास ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिले त्यांच्या यादीत यांना मनाचे स्थानच नाही ... आम्ही रमतो ते चेश्मे गोळा करण्यात आणि पत्रे सांभाळण्यात ....काही लोकांच्या वंशजांची चापलुसी करण्यात आम्ही धन्यता मानणार .... मिळाले स्वातंत्र्य मिळाले पण स्वातंत्र्याचे खरे शिल्पकार मात्र दुर्लक्षितच राहिले ..आजही एक मोठा  तरुण वर्ग यांच्या पासून प्रेरणा घेतोय , यांना आदर्श मानतोय ,यांचे जीवन समजून घेतोय ...त्यामुळे सरकारने कितीही " काँग्रेसी " पणा केला तरी यांचे कर्तुत्व झाकून ठेवता येणार नाही ...... तात्या म्हणतातच " मुलामुलींची वीण वाढवणे आणि चार काटक्या जमवून घरटी बांधणे याला का संसार म्हणायचे ? असला संसार चिमण्या आणि कावळेसुद्धा करतात ....हजारो जणांच्या घरातून सोन्याचा धूर निघावा म्हणून स्वताची चार चूल बोळकी फोडून टाकणे याचे नाव संसार " तर अशा संसार करणाऱ्या महान त्यागी त्रीमुर्तीना सलाम !!

No comments:

Post a Comment