Friday 9 March 2012

मोठेपणी लहानासारख का वागता येत नाही ?

एखादी गोष्ट कितीही हवी असली तरी हट्ट करता येत नाही ,मिळाली तरी 


हरकून जाता येत नाही ,नाही मिळाली तरी भोकाड पसरून रडता  येत 


नाही ,फुलपाखरे पकडत बागेत हिंडता येत नाही ,५० पैसे देऊन रस्त्याच्या 


कडेला बसलेल्या सुरकुतलेल्या चेहेऱ्याच्या म्हातारीकडून तिखट -मीठ 


टाकून आवळे /चट्टा मट्टा घेता येत नाही ,घरून खाऊ चा डबा आताशी 


मिळतच नाही ,२३ चा पाढा ,प्रमेय ,गुणाकार .भागाकार ,बडबडगीते 


असे "अवघड " काही आता परीक्षेत येतच नाही,कोणाकडेही पाहून 


निरागसपणे हसता येत नाही ,समोरच्याने काहीही केले तरी एका  


कॅडबरी साठी त्याला माफ करता येत नाही ,नाती तीच असली तरी 


नात्यातील गोडवा मात्र अनुभवता येत नाही खरच मोठेपणी 


लहानासारख का वागता येत नाही ?



लहान असताना बाबांसारखा इन शर्ट करून त्यांचे पायात न बसणारे बूट 


घालून मोठे झाल्याची हौस पूर्ण व्हायची ..आता तर लहान कपडेच बसत


नाहीत आणि जबाबदाऱ्या च्या ओझ्यापुढे हौस पूर्ण करायला वेळच 


मिळत नाही ...फार्म व्हील ,अंग्री बर्ड खेळायच्या जमान्यात विटी दांडू ,


गोट्या खेळायलाच मिळत नाहीत ,शाळे बाहेर थांबणाऱ्या ज्या "गारेगार " 
वाल्याच्या गोळ्याचे आकर्षण होते त्याच माणसाकडे जाऊन  आज 


गोळा खाणे प्रतिष्ठेत बसत नाही मोठेपणी लहानासारख का वागता येत


 नाही ?मोठेपण हे कोळ्याने स्वताभोवती बांधलेल्या जाळ्या प्रमाणे 


असते ...बांधत असताना खूप उत्साहाने पुढे जातो पण मध्यात


 आल्यावर स्वप्नपूर्ती झाल्याच्या अविर्भावात चौफेर पाहतो तर स्वताच 


स्वताभोवती बांधून घेतलेली बंधने दिसतात ...जाळ्याच्या मध्यभागी 


बसून सुख कोणत्या कोपऱ्यात अडकते का याची वाट पाहण्या पलीकडे 


हातात काही राहातच नाही म्हणूनच कदाचित मोठेपणी लहानासारख 


वागता येत नाही......

No comments:

Post a Comment