दिनांक १६/०३/२०१२ ..... वेळ सकाळची ....चर्चेचे विषय २.... पहिला अर्थसंकल्पाचा आणि दुसरा सचिन च्या महाशतकाचा ! दोन्हीही विषय तितकेच महत्वाचे आणि मनाच्या जवळचे .... सवई प्रमाणे कॉंग्रेस ने २ हातानी दिले आणि ४ हातानी काढून घेतले ...या दुक्खात भारतीय जनसागर असताना १.३० मिनिटांनी सचिन रमेश तेंडूलकर याचे मिरपूर मैदानाच्या २२ यार्ड खेळपट्टीवर आगमन झाले ... आश्वासक सुरुवात करताना ४ खणखणीत चौकार मारून आशेचा किरण दाखवला .....आणि बघता बघता शतकांचे महाशतक करून कॉंग्रेस सरकार ला "फुल्या फुल्या " वाहणाऱ्या लोकांना स्वतावर " स्तुतीची फुले " वाहायला भाग पाडले... या "सोनियाच्या " दिनाचे अप्रूप सचिन पेक्षा सोनियाला जास्ती असणार ...प्रणव दादांनी निराशा केल्यानंतर ...बाबा राहुल कोठल्या तरी कोपऱ्यात दिग्गी गुरुजी सोबत पंतप्रधान - पंतप्रधान खेळत असताना ... विरोधी पक्ष योर्कर वर योर्कर टाकत असताना पोराला आवरायचे का पक्षाला सावरायचे या द्विधा मनस्थिती मध्ये असणाऱ्या बाईंचे काम सचिन ने हलके केले .....सचिन तेंडूलकर परंपरेत न बसणारे पण सगळ्या जगाला उत्सुकता असणारे महाशतक आज साजरे झाले ....सचिन निवृत्त हो म्हणणारे "अरे सचिन ? अजून १५ शतके करू शकतो " म्हणायला लागले ...तुटून पडणारी प्रसार माध्यमे पुन्हा ठरलेला कार्यक्रम फ़क़्त एक शतक वाढवून दाखवू लागले ... सचिन ला भारत रत्न मिळालाच पाहिजे या चर्चेला पुन्हा उधाण आले ...आणि सचिन ने शतक केले कि भारत हरतो हे सिद्ध करण्यासाठी संघ सहकारी झटू लागले ...हे सर्व होत असताना एक माणूस मात्र शांत होता ...प्रेमा इतकीच टोकाची टीकाही सहन केलेली मानसिकता ,आणि जवळपास २२ वर्षे क्रिकेट खेळल्याने आलेली परिपक्वता आपल्या वागण्यातून दाखवत होता .... नुसते शतक केले तरी मैदानावर " डान्स इंडिया डान्स " सादर करणारे अनेक "शतकवीर " आपण पहिले आहेत ...पण शतकांचे शतक करूनही खेळापेक्षा आणि संघा पेक्षा आपला आनंद मोठा नाही या भावनेने नेहमीच्या शैलीत bat आणि हेल्मेट हवेत उंचावून शांतपणे कौतुकाचा स्वीकार करणारा "महा शतकवीर " आज आपण पहिला ..... सचिन रमेश तेंडूलकर !!

१८८ कसोटी सामने १५,४७० धावा ,५१ शतके आणि ६५ अर्ध शतके ,४५ बळी ...४६२ एकदिवसीय सामने १८३७४ धावा ,४९ शतके (नाबाद २०० चा विश्व विक्रम ) ,९५ अर्ध शतके ,१९४ षटकार,१५४ बळी , २९२ प्रथम श्रेणीय सामन्यात ७८ शतकांसह २४३८९ धावा , १९९८ मध्ये १२ शतके ,१९९६ ,१९९९ ,२०१० मध्ये ८ शतके ... एका वर्षात कसोटी मध्ये १ हजार पेक्षा जास्ती धावा करायची कामगिरी ६ वेळा तर एकदिवसीय सामन्यात ७ वेळा ,सलग १८५ एकदिवसीय सामने ,सौरव गांगुली सोबत सलामीला २१ शतकीय आणि २३ अर्ध शतकीय भागी सह ६६०९ धावा ,२८ वेळेला नव्वदीत बाद ,एकदिवसीय सामन्यातील सर्वाधिक सामनावीर (६२) आणि मालिकावीर(१७),आई.सी.सी .नामांकनात अव्वल १० मध्ये गेली १० वर्षे राहणारा एकमेव ,२००२ मध्ये ब्राडमन नंतरचा कसोटीपटू म्हणून सन्मान, २००३ मध्ये विस्डेन कडून अव्वल एकदिवसीय खेळाडू चा सन्मान ,जागतिक क्रिकेट मध्ये ३३,००० पेक्षा जास्ती धावा करणारा एकमेव ,द्रविड सोबत एकदिवसीय मधील ३३१ धावांची सर्वोच्च भागी ,आणि कसोटी व एकदिवसीय मधील सर्व विक्रम नावावर असलेला ,१९९४ मध्ये अर्जुन ,११९७ मध्ये विस्डेन क्रिकेटर ऑफ ईअर., १९९७ पद्मश्री ,१९९८ राजीव गांधी खेलरत्न ,२०१० आई .सी .सी क्रिकेटर ऑफ ईअर ,आई.सी.सी वर्ल्ड टेस्ट XI २००९.२०१० ,आई .सी ,सी वर्ल्ड ओ.डी.आई XI २००१.२००४.२००७.२०१० ,२०११ असे अनेक जागतिक विक्रम नावावर असताना "महाशतक" ते काय ? म्हणजे अगदी काळ ते झाल्यावरही सचिन म्हणाला कि कोठेही गेले कि सर्व १०० व्या षटका बद्दल बोलत आधीच्या ९९ शतकांबद्दल कोणीच बोलत नाही ....सचिन ने चाहत्यांच्या मानसिकतेवर बरोबर स्ट्रेट DRIVE मारला आहे ..आपली मानसिकताच असते कि महान माणसाकडून भव्य दिव्यच अपेक्षित असते ..आपल्यात तर "शतकाला " प्रचंड महत्व आहे अगदी आशीर्वाद देताना "शतायुषी भव " बोलताना " १०० वर्षे आयुष्य आहे बघ " ,सुवर्ण मोहोत्सव , चित्रपटाने १०० दिवस काढले कि जल्लोष इत्यादी गोष्टींमुळे शतकाला वलय आहे ...आणि जर शतकांचे शतक होणार असेल तर त्याला "महावलय" प्राप्त होणारच.....याचा सचीन वरही निश्ह्चीत परिणाम झाला ..१ शतकासाठी १ वर्ष वाट पाहावे लागले ... आपल्या समाजाची एक हुच्च मानसिकता असते एखादी वस्तू /माणूस आपल्या मनापर्यंत काम करत आहे तोपर्यंत तिचे कौतुक करायचे आणि तसे झाले नाही कि सरळ मोडीत घालायचे , खराब फॉर्म असो वा फेरारी असो टीका करत राहायचे .... सचिनचे महाशतक होत नाही हे पाहून अनेकांनी निवृत्त व्हायचा सल्ला दिला पण १९९९ मधील पाठीची दुखापत ,२००१ मध्ये टाचेची दुखापत ,२००२ सालची हाम स्ट्रिंग ची दुखापत ,२००४ टेनिस एल्बो ,२००६ खांदा ,२००७ गुडघा दुखापत यातून सावरून मैदानावर धावांचा पाऊस पडत असणाऱ्या तेंडल्या ला थांबणे माहीतच नवते !!

Waaah... Farach chhan! :)
ReplyDeleteNehmipramanne apratim............vasttavdarshi...........marvalous!
ReplyDelete